बादशहा बिरबल दरबार्यांना विचित्र प्रश्न विचारत असे. त्याने एकदा बिरबलला विचारले," बिरबल, मला एकाच माणसाच्या अंगात तीन तर्हेचे तीन गुण दाखवू शकशील?"
बिरबल म्हणाला," का नाही हुजूर! एकाच माणसाच्या अंगात पोपट, वाघ आणि गाढवाचे गुण दाखवू शकतो. पण आज नाही, उद्या. बादशहांनी परवानगी द्यावी."
बादशहाने होकार भरला. दुसर्यादिवशी बिरबलाने एका माणसाला पालखीत बसवून आणले.त्याने नुकतेच नशापान केले होते. बादशहाला पाहताच त्याने हात जोडले आणि म्हटले, हुजूर माफी असावी. मी फार गरीब आहे हो, मला माफ करा."
बिरबल बादशहाला म्हणाला," हुजूर, याचा अंगात पोपट शिरला आहे, बरं का! म्हणून हा पोपटाची बोली बोलतो आहे."
त्या माणसाला आता आणखी नशा चढली. तो बादशहाकडे बोट करीत म्हणाला," तू दिल्लीचा बादशहा झालास म्हणून जास्त शहाणपट्टी मारू नकोस. शहाणपणा दाखवायचं काही काम नाही. आम्हीदेखील आमच्या घराचे बादशहा आहोत."
बिरबल म्हणाला," बादशहा सलामत, या वेळेला हा वाघाची डरकाळी फोडतोय."
काही वेळाने मात्र त्यांना काहीच बोलता ये ईना. नशा आता त्याच्या अंगात चांगलीच भिनली होती. त्याला धड चालता ये ईना, ना बोलता ये ईना. बेलकांडे खात तो एका कोपर्याला जाऊन पडला.तोंडाने मात्र काहीबाही बरळत होता.
बिरबल म्हणाला," आता या माणसाला लाथ मारली तरी ती खाईल. असाच लोळत राहिल. म्हणजे आता त्याच्यात आणि गाढवात काहीच फरक राहिलेला नाही."
यावर बादशहा जाम खूश झाला. हसतच तो बिरबलाकडे गेला. त्यावेळी त्याचा हात कंठहारावर होता.
No comments:
Post a Comment