जत तालुक्याला प्राचीन काळापासूनचा इतिहास आहे. अगदी चालुक्य घराण्यापासूनच्या राजांच्या अनेक पाऊलखुणा तालुक्याच्या अंगाखाद्यावर आजही दिमाखाने मिरवीत आहेत.सांगली जिल्ह्यात अनेक संस्थानिक हो ऊन गेले. सांगली, मिरज व तासगाव येथील पटवर्धन घराण्याबरोबरच जतच्या डफळे घराण्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या संस्थानिकांच्या अनेक महत्त्वाच्या वास्तू आजही आपणास पाहावयास मिळतात.
जत हे संस्थानिक
डफळेंच
गाव.या तालुक्यावर चारशे वर्षे राज्य करणार्या डफळे संस्थांनच्या स्पष्ट खाणाखुणा आजही पाहायला
मिळतात. डफळे
संस्थानचा अगदी 1930 मध्ये बांधण्यत आलेला सुंदर राजवाडा आजही अत्यंत दिमाखात उभा आहे.
ब्रिटिश वास्तूशास्त्रज्ञांनी त्याची उभारणी केली आहे. तसाच आणखी एक छोटेखनी वाडा अनिलराजे
डङ्गळे यांचाही अहे. अनिलराजे यांनी संस्थानकालीन ऐतिहासिक वस्तूंचा एक प्रचंड संग्रह
आपल्या वाड्यात जतन करून ठेवला आहे. आज अनिल्रजे हयात नाहीत, पण त्यांचे चिरंजीव शार्दूलराजे
त्याची देखभाल करीत आहेत.
जतचा जुना राजवाडा
सतराव्या शतकात बांधला आहे. पूर्ण माती व दगडाने बांधलेल्या वाड्यात सागवानी लाकडाचा
भरपूर वापर केला आहे. ते लाकूड आजही चारशे वर्षांनंतरही चांगल्या स्थितीत आहे. जुन्या
कमानी, बुरुज आजही डफळापूर,
उमराणी, जाडरबोबलाद, बिळूर आदी गावांमध्ये दिसतात. उमराणी गावातला वाडा आजही वापरात
आहे. हे गाव म्हणजे इतिहासाचा चालता बोलता साक्षीदार आहे. या गावात हेमाडपंथी शैलीतील
अनेक मंदिरे आहेत. अत्यंत सुंदर रचना असलेली ही मंदिरे हजार वर्षाच्या इतिहासाच्या
साक्षीदार आहेत. शेड्याळ,कोळगिरी गावातदेखील अशी मंदिरे आहेत. वाळेखिंडी गावात तत्कालिन
कोरलेल्या शिळा एका मंदिरात संग्रही आहेत.
जत शहरापासून
पश्चिमेला किल्ले रामगड हा प्राचीन किल्ला आहे. शिवकालीन पूर्व किल्ल्यात त्याचा समावेश
होतो.या छोट्याशा पण दुर्गम किल्ल्याची आज
दुरवस्था झाली आहे. या किल्ल्यावरून किल्ल्याखली वसलेल्या गावाला रामपूर असे नाव पडले
आहे. हे गावही आता राज्यात विकासाच्याबाबतीत आघाडीवर आहे. या गावात अनेक योजना राबवण्यात
आल्या आहेत. स्वच्छता,हागणदारीमुक्त आदी योजनंची या गावाने बक्षीसे पटकावली आहेत.
जत तालुक्यात
काही ऐतिहासिक किल्ले, वाडे आहेत, तशी मंदिरेदेखील आहेत. ही सगळी सुप्रसिद्ध आहेत.
लिंगायत धर्माचे जागतिक तीर्थस्थळ या ठिकाणी आहे.लिंगायत धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या
धानम्मा देवीचा जन्म या तालुक्यातल्या उमराणी गावी झाला. त्यांचे वास्तव्य गुड्डापूर
या गावी होते. या ठिकाणी धानम्मादेवीचे मंदिर आहे. गुड्डापूरला त्यामुळे अनन्यसाधारण
महत्त्व प्राप्त झाले आहे.या ठिकाणी कर्नाटक व आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक
येत असतात. इथे फार मोठी
यात्रा भरते. दररोज इथे अन्नदान होत असते. गुड्डापूरपासून काही अंतरावरच श्रीक्षेत्र
संगतीर्थ आहे. याठिकाणी श्री. धानम्माचा विवाह झाला होता. त्यामुळे या क्षेत्रालाही
भाविकांमध्ये महत्त्व प्राप्त झाले आहे.
जत शहराजवळ ऐतिहासिक
यल्लमादेवीचे मंदिर आहे.इथे महाराष्ट्रासह अन्य राज्यातूनही लाखो भक्त येत असतात. मार्गशीर्ष
महिन्यात देवीची मोठी यात्रा भरते. जतच्या दक्षिणेला डोंगररांगा आहेत. यातला एक डोंगर
अंबाबाईचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. यावर श्री अंबाबाईचे मंदिर आहे. अलिकडच्या काळात
या मंदिराला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रभाकर जोग, अशोक शिंदे, राजन जाधव, सुभाष
कुलकर्णी आदींचा या मंदिराला महत्त्व प्राप्त करून देण्यात मोलाचा वाटा आहे. सभोवताली
वनीकरण विभागाची हिरवीगार झाडी आहेत. शासनाने या परिसराला पर्यटन दर्जा प्राप्त व्हावा,
यासाठी निधीदेखील दिला आहे.
याशिवाय कोळगिरी
सिद्धेश्वर, उमराणी येथील मल्लिकर्जून मंदिर, बिळूर येथील काळभैरव, बसवेश्वर मंदिर,
बनाळी येथील बनशंकरी, उमदी येथील मल्लिकार्जून, भाऊसाहेब महाराज आदी मंदिरे प्रसिद्ध
आहेत. डफळापूर
येथील एकविरा मंदिर प्रसिद्ध आहे. धनगर कुलाळवाडी
येथील म्हातारबा मंदिर धनगर समाजाचे श्रद्धास्थान आहे. इथली भाकणूक प्रसिद्ध आहे. असा
हा जत तालुका अनेक अमूल्य ठेव्यांनी संपन्न आहे.
No comments:
Post a Comment