Monday, February 5, 2018
आपुलीच प्रतिमा होते..
थंडीची मजा लुटू या!
थंडी आल्हाददायक असली तरी काहींना हे दिवस परीक्षा
पाहणारे वाटतात. या लोकांना थंडी जरा जास्तच त्रास देते. बाकीचे थंडीची मजा लुटत
असताना हे स्वेटर आणि शालींचं ओझं बाळगत घरात बसून राहतात. आपल्याला अन्य
लोकांपेक्षा जास्त थंडी वाजणं, थंड वातावरणाचा
जास्त त्रास होणं हे शरीरात लोहाची कमतरता असल्याचं लक्षण आहे. लोहाच्या
कमतरतेअभावी शरीरातील सर्व भागांपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकत नाही, परिणामी थंडीचा जास्त त्रास होतो. म्हणूनच ही समस्या असेल तर आहारात
उष्णता वाढवणार्या काही घटकांचा आवर्जून समावेश करायला हवा. या प्रयत्नात खजूराचा
वापर महत्त्वाचा ठरतो.
खजूरामध्ये लोहाबरोबरच फायबरची मात्राही असते. त्यामुळे बद्धकोष्ठता
दूर होण्यास याची मदत होते. बीटरुट मध्ये लोह आणि फोलिक अँसिडची पर्याप्त मात्रा
असते. त्याचप्रमाणे याच्या सेवनाने रोगप्रतिरोधक शक्ती वाढते. थंडीत आवळ्याचं
सेवनही लाभदायक ठरतं. थंडीत चहा-कॉफी ऐवजी गरमागरम सूप घेणं फायदेशीर ठरतं.
ल्लथंडी आल्हाददायक असली तरी काहींना हे दिवस परीक्षा पाहणारे वाटतात. या लोकांना
थंडी जरा जास्तच त्रास देते. बाकीचे थंडीची मजा लुटत असताना हे स्वेटर आणि शालींचं
ओझं बाळगत घरात बसून राहतात. आपल्याला अन्य लोकांपेक्षा जास्त थंडी वाजणं, थंड वातावरणाचा जास्त त्रास होणं हे शरीरात लोहाची कमतरता असल्याचं लक्षण
आहे. लोहाच्या कमतरतेअभावी शरीरातील सर्व भागांपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकत
नाही, परिणामी थंडीचा जास्त त्रास होतो. म्हणूनच ही समस्या
असेल तर आहारात उष्णता वाढवणार्या काही घटकांचा आवर्जून समावेश करायला हवा. या
प्रयत्नात खजूराचा वापर महत्त्वाचा ठरतो.
खजूरामध्ये लोहाबरोबरच फायबरची मात्राही असते. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास याची मदत होते. बीटरुट मध्ये लोह आणि फोलिक अँसिडची पर्याप्त मात्रा असते. त्याचप्रमाणे याच्या सेवनाने रोगप्रतिरोधक शक्ती वाढते. थंडीत आवळ्याचं सेवनही लाभदायक ठरतं. थंडीत चहा-कॉफी ऐवजी गरमागरम सूप घेणं फायदेशीर ठरतं.
खजूरामध्ये लोहाबरोबरच फायबरची मात्राही असते. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास याची मदत होते. बीटरुट मध्ये लोह आणि फोलिक अँसिडची पर्याप्त मात्रा असते. त्याचप्रमाणे याच्या सेवनाने रोगप्रतिरोधक शक्ती वाढते. थंडीत आवळ्याचं सेवनही लाभदायक ठरतं. थंडीत चहा-कॉफी ऐवजी गरमागरम सूप घेणं फायदेशीर ठरतं.
प्रसाधनं वापरताना..
सुगंधाची न्यारी दुनिया
आपल्याला लुभावते. पण, सुगंध दीर्घकाळ
टिकावा यासाठी प्रसाधनांमध्ये अल्कोहोल घातलं जातं हे विसरता कामा नये. शँपू,
क्रिम, लोशन्स, टोनर्समध्ये
सुगंध दीर्घकाळ टिकण्यासाठी अल्कोहोल मिसळलं जातं. यामुळे त्वचा कोरडी पडणं,
खाज येणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अल्कोहोल फ्री
उत्पादनं घेण्यावर भर द्या. अल्कोहोल नसलेलं प्रॉडक्ट मिळत नसेल तर कमीत कमी
अल्कोहोल असलेलं प्रॉडक्ट घ्या.
साध्या टिकल्या, सिंदूरसोबतच मस्कारा, आयलायनर यातही घातक रसायनं असतात. पारा हा त्यातला एक महत्त्वाचा घटक असतो. आयलायनर, मस्कारातल्या पार्यामुळे डोळ्यांभोवती खाज सुटणं, पापण्या पातळ होणं यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. हेअर कलर आणि हेअर डायमध्ये अमोनिया हे घातक रसायन असतं. यामुळे त्वचा बाधित होऊ शकते. याव्यतिरिक्त आरोग्यविषयक इतर काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अमोनिया फ्री हेअर डाय आणि सल्फेट फ्री शँपू वापरण्याला प्राधान्य द्या. फेअरनेस तसंच इतर फेस क्रिम्समध्ये हायड्रोक्विनॉन असा एक घटक असतो. ब्लीचसाठी वापरण्यात येणार्या या घटकामुळे त्वचेला अँलर्जी होऊ शकते. या घटकाच्या अतिरिक्त वापरामुळे त्वचेवर पांढरे डाग पडू लागतात. म्हणूनच काळजी घ्यावी.
अंगावर काटा आणणार्या 'धार्मिक परंपरा'
वेगवेगळ्या देशांमधील परंपरा
वेगवेगळ्या आहेत. काही परंपरा नक्कीच सुखावणार्या आहेत. काही देशांमधील परंपरा
अगदीच विचित्र आहेत. जगभरात काही परंपरा अशा आहेत, ज्यामुळे
तुम्ही तोंड वासून उभे राहाल. अशा काही परंपराविषयी आम्ही या ठिकाणी माहिती देत
आहोत. ही माहिती वाचून नक्कीच तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील..
भुतानमधील
रात्रीच्या शिकारी
भूतानमधील 'बोमेना' या
भागात युवक प्रेम व लग्न करण्यासाठी शिकारीचा बहाणा करून रात्रीच्या वेळी
कुमारिकांच्या घरात शिरकाव करतात. हे तरुण या कालावधीत मुलीच्या कुटुंबीयांना
दिसल्यास त्या मुलीसोबत त्याचे लग्न ठरविले जाते अन् शिक्षा म्हणून मुलीच्या
वडिलांच्या शेतीची कामे करावी लागतात. आधुनिक काळात ही परंपरा चर्चेचा विषय ठरली
आहे. हा महिलांवर अत्याचार असल्याचा आरोप करण्यात येत आहे.सॅटेरे-मॅवे प्रजाती
अमॅझोनियन समुदायामध्ये जेव्हा मुले वयात येताना स्वत:ला सिद्ध करावे लागते. बुलेट अँट या प्रजातीच्या मुंगळ्यांनी वेढलेले हातमोजी घालावे लागतात. औषध व भाजलेले अन्न जोडलेले हे बुलेट अँटचे हातमोजे हातात घालून मुले सुमारे 10 मिनिटे नृत्य करतात. या काळात युवकांना बुलेट अँटच्या दंशाच्या प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. या समुदायातील प्रत्येकाला आयुष्यात किमान २0 वेळा या प्रकाराला सामोरे जावे लागते.
थाईपुसम
दक्षिण भारतात आणि दक्षिण पूर्व आशिया भागात हा सण साजरा केला जातो. भगवान मुरुगन यांनी दैत्यावर केलेली मात याप्रित्यर्थ हा सण साजरा केला जातो. भक्तगण स्वत:ला शरीराच्या विविध भागात टोचून घेतात. काही जण आपल्या पाठीला हुक अडकावून गाड्याही ओढतात. यामुळे त्यांच्या अंगावर जखमा होतात.
लग्नानंतर बंदी
इंडोनेशियातील तिडाँग जमातीमध्ये नवीन लग्न झालेल्या जोडप्यास लग्नानंतर तीन दिवस स्वच्छतागृह वापरण्यास परवानगी नसते. जर हा नियम तोडला तर त्यांच्या आयुष्यात दुर्दैवी घटना घडतील अशी अख्यायिका आहे. त्यात मृत्यूचाही समावेश आहे. त्यांचे नातलग त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात. तीन दिवसानंतर ते अंघोळ करतात आणि नैसर्गिक विधी करू शकतात.
मृतांचा वापर
व्हेनेझुएला आणि ब्राझील देशात अमेझॉनच्या जंगलात यानोमामी जातीमध्ये पुरलेल्या माणसांची राख आणि हाडे एकत्र गोळा करून त्याचे सूप तयार केले जाते. त्यानंतर ते संपूर्ण परिवार ते पितात. यानोमानी यांच्या अनुसार यामुळे हरविलेल्या त्यांच्या प्रिय व्यक्तीचा आत्मा त्यांच्यामध्ये राहतो. तो त्यांना आशीर्वाद देतो.
मुलांना उंचावरून फेकणे
गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही भागात लहान मुलांना मंदिरावरून सुमारे 15 ते 30 फूट उंचीवरून फेकले जाते. खाली ब्लँकेटमध्ये भक्त झेलतात. लहान मुलांसाठी हे चांगले असते असे म्हटले जाते. मात्र याचा आता विरोध सुरू झाला आहे.
दात कोरणे
आपल्याकडे स्वच्छतेसाठी नखे काढली जातात. बालीमधील पुरुष आणि महिला लग्नाच्या वेळी दात कोरतात. चमकीले दात हे राग, लोभ, मत्सर यावर मात करतात असे म्हटले जाते. अर्थात हे करताना प्रचंड त्रासदायक अनुभव असतो. हे काम डेंटिस्टकडून नव्हे तर सुताराकडून केले जाते.
आर्थिक गुलामगिरीकडे जगाची वाटचाल
अलिकडेच एक सर्व्हेक्षणाचा अहवाल वाचण्यात आला. सार्या जगातील
गरिबांकडे जेवढी संपत्ती आहे, तेवढी संपत्ती जगातल्या अवघ्या
62 कुबेरांकडे आहे. हा अहवाल वाचला की, थक्क व्हायला होतं. जग कोणत्या दिशेला चाललं आहे, आणि
भाविष्यात किती मोठा धोका जगापुढे वाढून ठेवला आहे, याचा
अंदाज बांधणं अशक्य आहे. श्रीमंत व गरिबांमधील वाढती
दरी ही जगातील अनेक समस्यांपैकी एक सर्वांत मोठी आणि महत्त्वाची आणि धोकादायक समस्या
आहे, त्यातही आणखी चिंतेची बाब म्हणजे दिवसेंदिवस ही दरी अधिकच वाढत चालली आहे. बाजारीकरणाच्या युगात
जागतिक पातळीवर स्वीकारण्यात आलेल्या आर्थिक उदारीकरणाचे हे परिणाम आता समोर येत
आहेत. भांडवलशाहीचे हे महाभयंकर अपत्य आहे, असे आता म्हटले जात आहे. गुलामगिरीच्या मानसिक अवस्थेतून जग मुक्त झालेले
असताना पुन्हा आर्थिक विषमतेतून आर्थिक गुलामगिरीकडे जगाची वाटचाल होणार की काय,
अशा आता भीती व्यक्त केली जात आहे.
काही बोटावर मोजता येतील एवढया लोकांकडेच संपत्तीचे प्रचंड
केंद्रीकरण झाले आहे. एकीकडे गरिबांची अवस्था अधिकाधिक बिकट होत असताना
श्रीमंतांच्या तिजोरीचे ओझे मात्र वाढतच चालले आहे. या सर्वेक्षणानुसार या जगातील
अवघ्या 62 धनाढय लोकांची संपत्ती ही सुमारे अर्धा ते 1.76 खबर डॉलर एवढी वाढली आहे. गेल्या 12 महिन्यांमध्ये
जगातील सर्वांत श्रीमंत आणि सर्वांत गरिबांमधील दरी सर्वाधिक वाढली असल्याने यावर
विचार करण्याची गरज आहे. 2011 साली जगातील 388 श्रीमंतांकडे जगातील अध्र्या गरिबांच्या संपत्तीएवढी संपत्ती होती. पण ही
दरी वाढत केली आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेल्याने पुढे अवध्या 177 श्रीमंतांकडे तेवढी संपत्ती जमा झाली. ही तङ्गावत पुढे वाढत गेली आणि 2014 मध्ये हा आकडा 80 वर आला. म्हणजे केवळ 80 श्रीमंतांकडे तेवढी संपत्ती जमली होती. गेल्या वर्षी हा आकडा 62 झाल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे. श्रीमंत व्यक्ती आपल्या हातातील
सत्तेचा उपयोग संपत्ती गोळा करण्यासाठी, अधिकार गाजविण्यासाठी
व संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी करीत आहे. आज ज्यांच्याकडे कसलीही पत नाही म्हणजे
बँकेकडून पैसा-कर्ज मिळवण्यासाठी लागणारी गहाण-तारण ठेवण्यासाठी एकही वस्तू
नसलेल्यांची संख्या जगात 30 टक्के एवढी झाली आहे. आजच्या
भांडवलधारी युगात गरिबाला श्रीमंत होण्यासाठीचे हात कापून टाकले आहेत. त्यामुळे
गरिंबांना सुखा-समाधानाने जगण्याचा अधिकार नाहीच का, असा
प्रश्न पडतो.
आर्थिक विषमता कमी झाल्याशिवाय जगामध्ये स्थायी स्वरूपात शांतता
नांदणार नाही याचाही विचार भांडवलशाही समाजाने करावा लागणार आहे. निराधार, निराश्रीत, गरीब आणि कष्टकरी समाजासाठी संयुक्त
राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून मात करण्यासाठी आपल्या कमाईतून काही भाग मोठया
श्रीमंत देशांनी खर्च करावा. ज्यातून ’दारिद्रयमुक्त जग’ ही संकल्पना साकारता
येईल. कारण जोपर्यंत दारिद्रय आहे, तोपयर्ंत आपण मानव या
पृथ्वी ग्रहावर ताठ मानेने जगू शकणार नाही. श्रीमंत राष्ट्रांनी आपल्या तिजोरीतील
काही हिस्सा दारिद्रय विषमतेची दरी दूर करण्याच्या या कामासाठी वापरायला
हवा.जगातल्या या कुबेरांनी मोठा हिस्सा दारिद्र्य निर्मुलनांसाठी द्यायला हवा.
सगळ्या देशांनी मिळून त्यांच्यावर दवाब आणायला हवा.शिवाय आपल्या देशासह जगातल्या
नागरिकांनी योग्य कर भरला. तर सर्व देशातील शासनांकडे
दरवर्षी अब्ज डॉलरचा निधी उपलब्ध होईल. ही रक्कम जगभरातील अनेक गरीब मुलांचे
आरोग्य सुधारण्यासह अन्य समस्या निराकरासाठी उपयोगाचे होईल.
आरोग्य राखण्यासाठी..
स्पर्धेच्या युगात आरोग्य
अबाधित राखणे आणि फिट राहणे हे एक आव्हानच आहे. त्यासाठी काही गोष्टींची काळजी
घेणे आवश्यक असते. तरुणांना फिटनेस मिळवायचा असेल तर आहाराच्या पद्धतीत बदल केले
पाहिजेत. मैद्याचे पदार्थ, तेलकट, तुपकट
आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळायला हवे. चहा, कॉफी, कोक अशा तरल पेयांमुळेही तब्येतीचे नुकसान होते. आरोग्य उत्तम रोखण्यासाठी
आठवड्यातून एकदा उपवास करावा. त्यादिवशी केवळ लिंबूपाणी प्यावे अथवा फळांचे सेवन
करावे. इतर दिवशी सतत काहीतरी खात राहण्यापेक्षा दिवसातून दोनदा व्यवस्थित जेवावे.
शक्य असेल तेव्हा जेवणाऐवजी दूध आणि फळाचे सेवन करावे. त्यामुळे प्रतिकारशक्ती
वाढते आणि कोणताही आजार जडण्याची शक्यता कमी होते. आहाराला व्यायामाची जोड मिळणे
आवश्यक असते. त्यादृष्टीने दररोज नियमित व्यायाम करायला हवा. यामध्ये योगा,
ध्यानधारणा आणि सूर्यनमस्कारांचा समावेश असेल तर उत्तम. अशा प्रकारे
आहार आणि व्यायाम यांचे संतुलन राखता आले तर आरोग्य अबाधित राहण्यास मदत होते.
वेळ कसा घालवावा
बरेचदा पती कामाच्या निमित्ताने
बाहेरगावी राहत असतो. अशा वेळी पत्नी एकटी पडते. वेळ कसा घालवावा हे तिला कळत
नाही. अशा वेळी योग्य पर्याय म्हणून मदत होते ती इंटरनेटची. करण्यासाठी आजकाल
विविध अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. त्याशिवाय घरच्या घरी कोणाच्याही मदतीने इंटरनेट
शिकता येते. काही काळासाठी समाजाभिमुख होण्यासाठी इंटरनेट हा चांगला पर्याय ठरतो.
गर्भवती महिलांना पडणार्या प्रश्नांची नेमकी उत्तरे देण्यासाठी बर्याच वेबसाईट्स
उपलब्ध असतात. त्या ठिकाणी सल्ला आणि मार्गदर्शनाबरोबरच प्रेम, दिलासा मिळतो. त्याशिवाय येणार्या अडचणींवर मात करण्यासाठी
घरातील ज्येष्ठ महिलांचा सल्लाही मिळतोच.
संध्याकाळचा वेळ घालवण्यासाठी बागेत जाण्याचा पर्याय कमी येतो. शिवाय रात्रीच्या वेळी वेबकॅमच्या सहाय्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून नवर्याशी प्रत्यक्ष बोलणेही शक्य होते. गप्पा मारण्यासाठी, मते व्यक्त करण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर करणेही शक्य आहे. महिलांना स्वत:चा वेळ सार्थकी लावण्यासाठी इंटरनेटचा पर्याय हमखास कामी येतो. पतीशी बोलण्यात काही अडचणी येत असतील तर त्यासाठी ई-मेलचा आधार घेता येतो. अशा प्रकारे जोडीदार दूर असला तरी त्याच्या संपर्कात राहणे शक्य आहे. शिवाय जोडीदार बरोबर नसल्याने येणारा एकटेपणा दूर करण्यासाठी हे मार्ग अंगिकारायला हवे.बरेचदा पती कामाच्या निमित्ताने बाहेरगावी राहत असतो. अशा वेळी पत्नी एकटी पडते. वेळ कसा घालवावा हे तिला कळत नाही. अशा वेळी योग्य पर्याय म्हणून मदत होते ती इंटरनेटची. करण्यासाठी आजकाल विविध अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. त्याशिवाय घरच्या घरी कोणाच्याही मदतीने इंटरनेट शिकता येते. काही काळासाठी समाजाभिमुख होण्यासाठी इंटरनेट हा चांगला पर्याय ठरतो. गर्भवती महिलांना पडणार्या प्रश्नांची नेमकी उत्तरे देण्यासाठी बर्याच वेबसाईट्स उपलब्ध असतात. त्या ठिकाणी सल्ला आणि मार्गदर्शनाबरोबरच प्रेम, दिलासा मिळतो. त्याशिवाय येणार्या अडचणींवर मात करण्यासाठी घरातील ज्येष्ठ महिलांचा सल्लाही मिळतोच.
संध्याकाळचा वेळ घालवण्यासाठी बागेत जाण्याचा पर्याय कमी येतो. शिवाय रात्रीच्या वेळी वेबकॅमच्या सहाय्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून नवर्याशी प्रत्यक्ष बोलणेही शक्य होते. गप्पा मारण्यासाठी, मते व्यक्त करण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर करणेही शक्य आहे. महिलांना स्वत:चा वेळ सार्थकी लावण्यासाठी इंटरनेटचा पर्याय हमखास कामी येतो. पतीशी बोलण्यात काही अडचणी येत असतील तर त्यासाठी ई-मेलचा आधार घेता येतो. अशा प्रकारे जोडीदार दूर असला तरी त्याच्या संपर्कात राहणे शक्य आहे. शिवाय जोडीदार बरोबर नसल्याने येणारा एकटेपणा दूर करण्यासाठी हे मार्ग अंगिकारायला हवे.
संध्याकाळचा वेळ घालवण्यासाठी बागेत जाण्याचा पर्याय कमी येतो. शिवाय रात्रीच्या वेळी वेबकॅमच्या सहाय्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून नवर्याशी प्रत्यक्ष बोलणेही शक्य होते. गप्पा मारण्यासाठी, मते व्यक्त करण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर करणेही शक्य आहे. महिलांना स्वत:चा वेळ सार्थकी लावण्यासाठी इंटरनेटचा पर्याय हमखास कामी येतो. पतीशी बोलण्यात काही अडचणी येत असतील तर त्यासाठी ई-मेलचा आधार घेता येतो. अशा प्रकारे जोडीदार दूर असला तरी त्याच्या संपर्कात राहणे शक्य आहे. शिवाय जोडीदार बरोबर नसल्याने येणारा एकटेपणा दूर करण्यासाठी हे मार्ग अंगिकारायला हवे.बरेचदा पती कामाच्या निमित्ताने बाहेरगावी राहत असतो. अशा वेळी पत्नी एकटी पडते. वेळ कसा घालवावा हे तिला कळत नाही. अशा वेळी योग्य पर्याय म्हणून मदत होते ती इंटरनेटची. करण्यासाठी आजकाल विविध अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. त्याशिवाय घरच्या घरी कोणाच्याही मदतीने इंटरनेट शिकता येते. काही काळासाठी समाजाभिमुख होण्यासाठी इंटरनेट हा चांगला पर्याय ठरतो. गर्भवती महिलांना पडणार्या प्रश्नांची नेमकी उत्तरे देण्यासाठी बर्याच वेबसाईट्स उपलब्ध असतात. त्या ठिकाणी सल्ला आणि मार्गदर्शनाबरोबरच प्रेम, दिलासा मिळतो. त्याशिवाय येणार्या अडचणींवर मात करण्यासाठी घरातील ज्येष्ठ महिलांचा सल्लाही मिळतोच.
संध्याकाळचा वेळ घालवण्यासाठी बागेत जाण्याचा पर्याय कमी येतो. शिवाय रात्रीच्या वेळी वेबकॅमच्या सहाय्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून नवर्याशी प्रत्यक्ष बोलणेही शक्य होते. गप्पा मारण्यासाठी, मते व्यक्त करण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर करणेही शक्य आहे. महिलांना स्वत:चा वेळ सार्थकी लावण्यासाठी इंटरनेटचा पर्याय हमखास कामी येतो. पतीशी बोलण्यात काही अडचणी येत असतील तर त्यासाठी ई-मेलचा आधार घेता येतो. अशा प्रकारे जोडीदार दूर असला तरी त्याच्या संपर्कात राहणे शक्य आहे. शिवाय जोडीदार बरोबर नसल्याने येणारा एकटेपणा दूर करण्यासाठी हे मार्ग अंगिकारायला हवे.
सांगलीतील वस्तू संग्रहालय
सांगली संस्थानचे राजे श्रीमंत
चिंतामणराव पटवर्धन यांनी संग्रहित केलेल्या या वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन १९५४
साली भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले.
१९७६ पासून हे संग्रहालय महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय
विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. संग्रहालय आकारमानाने लहान असले तरी त्यातील
कलाकृती, खास करून संग्रहालयातील चित्रसंपदा
अतिशय समृद्ध व मौल्यवान आहे.
दोन परदेशी चित्रकार जेम्स
वेल्स आणि ए. एच. मुल्लर यांची तैल रंगातील चित्रे हे या संग्रहालयाचे वैशिष्ट्ये
आहे. जेम्स वेल्स या चित्रकाराने १७९0
ते १७९२ दरम्यान प्रेसिंडेंट चार्ल्स मॅलेट यांच्या शिफारशीने भारतातील अनेक
संस्थानिकांची चित्रे प्रत्यक्ष त्यांच्या दरबारात हजर राहून चितारली होती.
त्यातील सवाई माधवराव पेशवे व नाना फडणवीस या इतिहास प्रसिद्ध व्यक्तींची त्यांनी
चितारलेली मूळ चित्रे या संग्रहालयात पहावयास मिळतात. वंशाने र्जमन असणार्या
ए.एच.मुल्लर या चित्रकाराने रामायणावर आधारित चितारलेली १५ अप्रतिम तैल रंगातील
चित्रे या संग्रहात प्रदर्शित केलेली आहेत. ए. एच. मुल्लर हे चित्रकार
चित्रकलेच्या सर्व विषयात उदा. पोर्टेट काँपोझिशन, लँन्डस्केप,
पुस्तकात छापावयाची चित्रे यात निष्णात होते. तरी पण फिगर काँपोझिशन
त्यांना स्वत:ला जास्त आवडत होते असे वाटते. व्यक्तींच्या चेहर्यावरील भाव ते
नितांत सुंदर चित्रीत करीत असत हे या संग्रहालयातील 'रामाचे
सीतेस वनवासातील निवेदन' व 'राजकन्या
ब्राम्हणाच्या मुलास दान देत असतांना' या चित्रावरून दिसून
येते. या चित्रास त्या काळी बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्ण पदक देखील मिळाले होते.
मुल्लर या चित्रकाराच्या
समकालीन म्हणता येतील असे भारतीय चित्रकार रावबहाद्दूर धुरंधर यांची देखील पंचवीस
चित्रे या संग्रहालयात प्रदर्शित केलेली आहेत. त्यामध्ये, तैलरंग, जलरंग व क्रेझॉन पेन्सिल,
पावडर शेडिंग अशा विविध चित्र प्रकारातील चित्रे येथे आपणांस
पहावयास मिळतात. मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये धुरंधरांनी विद्यार्थी
म्हणून प्रवेश घेतला आणि स्वत:च्या कर्तृत्त्वावर ते जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या डायरेक्टर
पदापर्यंत पोहोचले. डॉ.अवनींद्रनाथ टागोर यांचे सहाध्यायी जी. पी. गांगुली यांचे
एक अप्रतिम चित्र तैलरंगातील या संग्रहालयात आहे, ते म्हणजे 'धुक्यातील आगगाडी'. इटली येथील पिसाच्या झुकत्या
मनोर्याची मार्बलमधील प्रतिकृती तसेच फत्तेपूर सिक्री येथील मुस्लीम संत सलीम
चिस्ती यांच्या कबरीची मार्बल मधील प्रतिकृती आहे. या प्रतिकृती असून देखील
संबंधित वस्तूंच्या वैशिष्ट्यांसह परिपूर्णतेने साकारण्यात आल्या आहेत. भारतीय
प्राचीन संस्कृती प्रमाणेच युरोपीय कलेवर सर्वाधिक प्रभाव असलेली प्राचीन संस्कृती
म्हणजे ग्रीक संस्कृती होय.
केवळ कलेच्या बाबतीतच नव्हे तर
युरोपातील आचार, विचार, तत्त्वज्ञान
व जीवन यावरील ग्रीक संस्कृतीची छाप आजतागायत कायम आहे. हे ऐतिहासिक सत्य आहे.
ग्रीकांनी मूर्ती कलेत इतर कोणत्याही संस्कृतीपेक्षा अत्यंत परिपूर्ण व उल्लेखनीय
प्रगती केलेली आपणास पहावयास मिळते. त्यांच्या जीवन विषयक कल्पनेला अनुसरून ग्रीक
मूर्ती शिल्प मानव केंद्रित आहे. या महान प्राचीन संस्कृतीमध्ये सॉक्रेटिस सारखे
तत्वज्ञ व विचारवंत होऊन गेले. पेरिक्सीस व अलेक्झांडर या सारखे महान शासक होऊन
गेले. त्यांचे पुतळे, ग्रीक शिल्पकलेचे नमुने या संग्रहालयात
पाहू शकतो. या संग्रहालयातील आणखीन एक महत्त्वाची वस्तू म्हणजे विजयनगरच्या कृष्ण
देवरायाचा ताम्रपट! हा ताम्रपट संस्थान काळातील शिरहट्टी तालुक्यातील तुंगभद्रा
नदीच्या काठी वसलेल्या बिदरहल्ली या गावी एका शेतकर्यास शेत नांगरताना सापडला. तो
तेथून आणून या संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. या ताम्रपटाचा काळ शाली वाहन शके
१४३४ अंगिसर संवत्सर अश्विनशु १५ वार सोमवार आहे. त्या दिवशी चंद्रग्रहण असून
त्या निमित्त केलेल्या दानाचा मजकूर त्यामध्ये समाविष्ट आहे. त्याची इंग्रजी तारीख
२५ सप्टेंबर १५१३ अशी आहे. या ताम्रपटाचे वाचन प्रसिद्ध इतिहास तज्ज्ञ म. गो.
दीक्षित यांनी केले आहे.
या संग्रहालयात प्रवेश करताच, आयर्विन पूलाचे लाकडी मॉडेल आणि राणी व्हिक्टोरिया राणीचा
मोठा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा मोठा पुतळा आहे. जिन्यावरून वर जाताच राजेसाहेबांनी
मारलेला १0 फूट लांबीचा ढाण्यावाघ आहे. तसेच पदरेशातून
आणलेल्या नाण्यांच्या प्लास्टर मधील प्रतिकृती इथे ठेवण्यात आल्या आहेत. काचेचे
चमचे, कलात्मक ड्रेसिंग टेबल, चित्याचे
कातडे याबरोबर पुरुषोत्तम मावजी यांच्या संग्रहातील चिता, तळसंगी
तलावातील छोटी व मोठी मारलेली मगर इथे आहे. तर आबालाल रहमान यांच्या शिवाजी अश्वारोहन
हे तैल रंगातील चित्र, श्री भवानी मातेचा साक्षात्कार ही
दुर्मिळ चित्रे असून चित्रकार लोटलीकर यांचे गंगा आपले अपत्य गंगानदीच्या पात्रात
अर्पण करतांना शंतनुराजा यांचे तैल रंगातले चित्र संग्रहीत केले आहे.
डॉक्टरी व्यवसाय आणि ग्राहक संरक्षण
मध्यंतरी डॉक्टर मंडळी
अव्वाच्या सव्वा बील आकारतात आणि रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना लुटतात.
याबाबत बराच गदारोळ उठला होता,मात्र
शासनाच्या नेहमीच्या दुर्लक्ष करण्याच्या पद्धतीमुळे हा विषयदेखील आंदोलन किंवा
डॉक्टरांविरोधात उभे राहिलेल्या लोकांना तडीस न्हेता आला नाही. ज्या डॉक्टरी
व्यवसायाकडे लोक अतिशय सांगलीतील वस्तू संग्रहालयआदराने पाहतात त्या क्षेत्रातही
इतक्या टोकाचे लुटीचा आणि गैरप्रकाराचा प्रकार होत आहे, विशेष म्हणजे या पेशातील लोकांच्या अशा प्रकारच्या वागणुकीमुळे या
क्षेत्रावर सामान्य माणसाचा विश्वास उडाल्याचे दिसून येते. या वैद्यकीय क्षेत्रात
गर्भलिंग चिकित्सापासून ते अवैध गर्भपातापर्यंत तसेच डॉक्टरांकडून उकळल्या जाणार्या
बेसुमार शुल्कापासून ते डॉक्टरांना मिळणार्या औषधी कंपन्यांच्या लाचेपर्यंत अनेक
प्रकार मोठय़ा प्रमाणात होत असतात, जी शरमेची व चिंताजनक बाब
ठरते आहे. वैद्यकीय हा व्यवसाय जरी असला
तरी त्याची अन्य व्यवसायांशी तुलना करता येत नाही. कारण समाजातले असे काही व्यवसाय
असतात की त्याची नीतीमत्ता हेच भांडवल असते आणि असे व्यवसाय जगवणे, टिकवणे किंवा चालवणे ही समाजाची महत्त्वपूर्ण जबाबदारी ठरत
असते.
शिक्षक, डॉक्टर, विविध प्रकारची धार्मिक कार्ये
करणार्या व्यक्ती या सर्वांचा श्रद्धा, नीतीमत्ता, निष्ठा या गोष्टींशी अधिक संबंध येत असतो आणि त्यांनी त्याचा सन्मान करावा
तसेच संवर्धन करावे, अशी अपेक्षा असते. मात्र, दुर्दैवाने आजच्या स्पर्धेच्या आणि व्यापारी युगामध्ये या सगळ्याच
गोष्टींना धाब्यावर बसवण्याचे काम होत आहे आणि कोणत्याही पद्धतीने पैसा कमवणे हे
एकमेव उद्दिष्ट ठेवल्या जाते. मागील काही वर्षात वैद्यकीय व्यवसाय जास्त
चर्चेमध्ये आला आहे आणि म्हणून रुग्णालयांमध्ये डॉक्टरांवर हल्ले करण्याचा
प्रकारही वाढत असलेल्याचे पाहायला मिळते. काही वैद्यकीय इन्स्टिट्यूटमधील
डॉक्टरांनी पुढाकार घेऊन या व्यवसायातल्या कट पॅ्रक्टिसला विरोध करण्याचे धाडस
दाखवल्याचे दिसते अणि तसेच औषधी कंपन्यांकडून डॉक्टरांना मिळणार्या लाचेविरोधात
काही डॉक्टरांनीच आवाज उठवला होता. ही गोष्ट सामाजिकदृष्ट्या आणि एकूणच वैद्यकीय
व्यवसायाची प्रतिष्ठा जपणारी ठरते. कारण आजच्या या स्पर्धेच्या युगात
डॉक्टरांनासुद्धा पैशाचा मोह दाखवून औषध कंपन्या जेव्हा आपला माल खपवण्याचा
प्रयत्न करतात, तेव्हा डॉक्टर हे औषधी कंपन्यांना विकले गेले
आहेत, असे चित्र निर्माण होते. आपली औषधे विकली जावीत म्हणून
डॉक्टरांना खरेदी करण्याचा प्रकार एकूणच नीतीमत्तेचा लिलाव मांडणारा ठरतो.
काही
महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने औषधी कंपन्यांविरुद्ध जोरदार मोहीम सुरू केली होती.
त्या कंपनीच्या कार्यालयांवर आयकर विभागाने धाडी होत्या. त्यावेळेला मोठय़मोठय़ा
डॉक्टर्सला रोख स्वरूपात पैसे देण्याचा प्रकार आणि विविध प्रकारच्या सवलती
देण्याची आमिषे दाखवून रुग्णांच्या माथी औषधे मारण्याचेही उद्योग उघडकीला आले
होते. याचा अर्थ औषधांची गुणवत्ता तसेच परिणामकारकता लक्षात न घेता रुग्णांच्या
काही अंशी जीवाशी खेळ करताना हा प्रकार नीतीमत्तेचा बाजार ठरतो. उलट डॉक्टरांनी
कोणते औषध चांगले आहे, याची खातरजमा केली पाहिजे. ज्या
औषधांचा रुग्णांच्या आजारावर परिणाम होत नाही, त्या
औषधांविरुद्ध तक्रार करण्याची गरज आहे. परंतु आज समाजामध्ये असा एकही डॉक्टर सापडत
नाही, ही दुर्दैवी बाब ठरते. याकरिता राज्याच्या अन्न आणि
औषध प्रशासन विभागाला पुढाकार घेऊन दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याची गरज आहे.
म्हणूनच ज्या रुग्णांवर उपचार होतात. त्यांना एक माणूस म्हणून न वागवता एक ग्राहक
म्हणून जेव्हा डॉक्टरांकडून वागणूक मिळत असते त्या वेळेला या सामाजिक
अध:पतनाविरुद्ध प्रचंड संताप निर्माण होत असतो.
आजपर्यंत आपल्या समाजाला या
गोष्टींची कल्पना नव्हती तसेच त्याबाबत माहिती करून घेण्याची इच्छाही नव्हती. कारण
डॉक्टरांविषयी त्यांच्या मनामध्ये विश्वास होता. डॉक्टर अपल्याला फसवणार नाहीत
किंवा चुकीची औषधे देणार नाहीत, याबाबत
लोकांच्या मनामध्ये श्रद्धा बाळगली जात होती. मात्र, आज ही
परिस्थिती पाहायला मिळत नाही. कट प्रॅक्टीस करून रुग्णांनाच लुबाडण्याचा हा
प्रकार समाजातील विघातक प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारा ठरतो. या पद्धतीने होत
असलेला औषधी कंपन्यांकडून होणारा गैरप्रकार अधिक कठोरपणे शोधून काढण्याची गरज आहे,
असे वाटते. तसेच त्यावर प्रभावी उपाय राबविले गेले पाहिजे. केवळ
आयकर विभागाने धाडी घातल्याने कोणताही वचक निर्माण होणार नाही. प्रत्यक्ष कारवाई
करणारे कडक कायदे तसेच नियम तयार केले पाहिजे. त्याशिवाय डॉक्टरांना हाताशी धरून
आपले मार्केटिंग करण्याचा हा प्रकार थांबणार नाही.
आरोग्य क्षेत्रामध्ये आणखी एक
प्रकार बोकाळल्यामुळे या व्यवसायातील स्पर्धा प्रचंड वाढलेली पाहायला मिळते.
मेडिक्लेम पॉलिसी काढल्यानंतर औषधांवर होणारा खर्च हमखासपणे हॉस्पिटल्स किंवा
डॉक्टरांना मिळत असतो, ते लक्षात घेऊनच औषधांचा देखील
भडीमार केला जात असतो. मेडिक्लेममुळे हॉस्पिटल्स अणि औषधी कंपन्या यांचे उखळ
पांढरे झाल्याचे दिसून येते. या वैद्यकीय क्षेत्रात वाढलेली नफाखोरी कोणकोणत्या
मार्गाने रचता येईल याचा गंभीरपणे विचार व्हायला पाहिजे. म्हणूनच अशा प्रकारची
व्यापारी प्रवृत्ती वैद्यकीय क्षेत्रात वाढीला लागणे तसेच त्याला डॉक्टरांकडून
संरक्षण मिळणे घातकच आहे. डॉक्टरी व्यवसायाला ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत
आणणे आवश्यक ठरते.
Subscribe to:
Posts (Atom)






