Monday, February 5, 2018

अंगावर काटा आणणार्‍या 'धार्मिक परंपरा'


     वेगवेगळ्या देशांमधील परंपरा वेगवेगळ्या आहेत. काही परंपरा नक्कीच सुखावणार्‍या आहेत. काही देशांमधील परंपरा अगदीच विचित्र आहेत. जगभरात काही परंपरा अशा आहेत, ज्यामुळे तुम्ही तोंड वासून उभे राहाल. अशा काही परंपराविषयी आम्ही या ठिकाणी माहिती देत आहोत. ही माहिती वाचून नक्कीच तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील.. 
भुतानमधील रात्रीच्या शिकारी
भूतानमधील 'बोमेना' या भागात युवक प्रेम व लग्न करण्यासाठी शिकारीचा बहाणा करून रात्रीच्या वेळी कुमारिकांच्या घरात शिरकाव करतात. हे तरुण या कालावधीत मुलीच्या कुटुंबीयांना दिसल्यास त्या मुलीसोबत त्याचे लग्न ठरविले जाते अन् शिक्षा म्हणून मुलीच्या वडिलांच्या शेतीची कामे करावी लागतात. आधुनिक काळात ही परंपरा चर्चेचा विषय ठरली आहे. हा महिलांवर अत्याचार असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सॅटेरे-मॅवे प्रजाती
अमॅझोनियन समुदायामध्ये जेव्हा मुले वयात येताना स्वत:ला सिद्ध करावे लागते. बुलेट अँट या प्रजातीच्या मुंगळ्यांनी वेढलेले हातमोजी घालावे लागतात. औषध व भाजलेले अन्न जोडलेले हे बुलेट अँटचे हातमोजे हातात घालून मुले सुमारे 10 मिनिटे नृत्य करतात. या काळात युवकांना बुलेट अँटच्या दंशाच्या प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. या समुदायातील प्रत्येकाला आयुष्यात किमान २0 वेळा या प्रकाराला सामोरे जावे लागते.
थाईपुसम
दक्षिण भारतात आणि दक्षिण पूर्व आशिया भागात हा सण साजरा केला जातो. भगवान मुरुगन यांनी दैत्यावर केलेली मात याप्रित्यर्थ हा सण साजरा केला जातो. भक्तगण स्वत:ला शरीराच्या विविध भागात टोचून घेतात. काही जण आपल्या पाठीला हुक अडकावून गाड्याही ओढतात. यामुळे त्यांच्या अंगावर जखमा होतात.
लग्नानंतर बंदी
इंडोनेशियातील तिडाँग जमातीमध्ये नवीन लग्न झालेल्या जोडप्यास लग्नानंतर तीन दिवस स्वच्छतागृह वापरण्यास परवानगी नसते. जर हा नियम तोडला तर त्यांच्या आयुष्यात दुर्दैवी घटना घडतील अशी अख्यायिका आहे. त्यात मृत्यूचाही समावेश आहे. त्यांचे नातलग त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात. तीन दिवसानंतर ते अंघोळ करतात आणि नैसर्गिक विधी करू शकतात.
मृतांचा वापर
व्हेनेझुएला आणि ब्राझील देशात अमेझॉनच्या जंगलात यानोमामी जातीमध्ये पुरलेल्या माणसांची राख आणि हाडे एकत्र गोळा करून त्याचे सूप तयार केले जाते. त्यानंतर ते संपूर्ण परिवार ते पितात. यानोमानी यांच्या अनुसार यामुळे हरविलेल्या त्यांच्या प्रिय व्यक्तीचा आत्मा त्यांच्यामध्ये राहतो. तो त्यांना आशीर्वाद देतो.
मुलांना उंचावरून फेकणे
गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही भागात लहान मुलांना मंदिरावरून सुमारे 15 ते 30 फूट उंचीवरून फेकले जाते. खाली ब्लँकेटमध्ये भक्त झेलतात. लहान मुलांसाठी हे चांगले असते असे म्हटले जाते. मात्र याचा आता विरोध सुरू झाला आहे.
दात कोरणे
आपल्याकडे स्वच्छतेसाठी नखे काढली जातात. बालीमधील पुरुष आणि महिला लग्नाच्या वेळी दात कोरतात. चमकीले दात हे राग, लोभ, मत्सर यावर मात करतात असे म्हटले जाते. अर्थात हे करताना प्रचंड त्रासदायक अनुभव असतो. हे काम डेंटिस्टकडून नव्हे तर सुताराकडून केले जाते.

No comments:

Post a Comment