Monday, February 5, 2018

रोज खाओ अंडे


     थंडीमध्ये शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी त्याचबरोबर प्रोटीनची पर्याप्त मात्रा मिळवण्यासाठी अंड्याच्या सेवनाला प्राधान्य दिलं जातं. मात्र, वेगवेगळ्या वयोगटातल्या व्यक्तींनी अंड्याचं सेवन करताना काही नियम पाळणं गरजेचं आहे. 
     तज्ज्ञांच्या मते २५ वर्षे हे व्यक्तीच्या वाढीचं वय असतं. त्यानंतर त्याची प्रौढत्वाकडे वाटचाल सुरू होते. या वाढीच्या वयामध्ये अंड्याचे सेवन विशेष लाभकारक आहे. मात्र, चाळीशीच्या आसपास आपल्या आरोग्याची तपासणी करूनच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार अंड्याचे सेवन करावे. तुम्ही वजन कमी करू इच्छित असाल आणि त्यासाठी प्रोटीन डाएटचा पर्याय अवलंबत असाल तर अंड्याचा पांढरा बलक सेवनात हवा. 

     या भागामध्ये कॅलरीजची पर्याप्त मात्रा असते त्याचा शरीराला विशेष लाभ मिळतो. अशा प्रकारे कुठलंही नियोजन नसणार्‍या व्यक्तींनी अंड्यातील पिवळा बलक अवश्य खावा. कारण यामध्ये विविध व्हिटॅमीन्सची मात्रा असते. अंडी डीप फ्राय करून खात असाल तर जाडीला आमंत्रण देताय हे लक्षात घ्या. तळल्यानंतर अंड्यातील कोलेस्टेरॉलची मात्रा वाढते आणि जाडी वाढण्यास कारक ठरते. त्याचबरोबर या क्रियेमध्ये अंड्यामधील पोषणमूल्य कमी होतं. अंडी फ्राय करून, बराच वेळपर्यंत उकडून खाणं अयोग्य आहे. 
1. शरिरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी अंडी महत्त्वाचं काम करतात. 
2. अंड्यांपासून मोठ्या प्रणाणात प्रोटीन मिळतात. 
3.थंडीत दररोज 2 अंडी खायला हवी.
4. पंचविशीनंतर प्रौढत्वाकडे वाटचाल सुरू होते त्यामुळे अंड्याचं सेवन फायदेशीर असतं.
5. वयाच्या 40 वर्षानंतर आरोग्याप्रमाणे अंड्याचं सेवन करावं.
6. वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांनी पांढरा बलक सेवन करावा. त्यामध्ये कॅलरीज योग्य प्रमाणात असतात.
7. अंडी डीप फ्राय करून खाल्याने शरिरातील फॅट वाढतात. अंडी तळल्यानंतर त्यातील कोलेस्टरॉलचं प्रमाण वाढतं. त्यामधील पोषणमूल्य कमी होतात.
8. अंडी फ्राय करून किंवा अती उकडून खाणं अयोग्य आहे. जरा वेळ उकडून किंवा हाफ फ्राय करून खाणे अधिक लाभदायक ठरतं.
9.वजन कमी असणाऱ्यांनी अंड्यातील पिवळा भाग खावा. कारण यामध्ये विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात.

No comments:

Post a Comment