Monday, February 5, 2018

गुणकारी फ्लॉवर


     आपल्याकडील आहारात फ्लॉवरच्या भाजीचा समावेश आवर्जून केला जातो. ही बारमाही मिळणारी भाजी आहे. देशातल्या अनेक भागात फ्लॉवर पिकविला जातो. ही भाजी न आवडणारी व्यक्ती विरळाच. आपल्याला अनेक भाज्यांचे गुणधर्म माहित असतात. पण, फ्लॉवरमधले औषधी गुण आजवर लपूनच राहिले. वनवासींमध्ये या भाजीचं फार महत्व आहे. फ्लॉवरमधल्या औषधी गुणधर्माबाबत अभ्यास सुरू आहे. या भाजीतले अनेक घटक आरोग्य उत्तम राखायला मदत करतात. तर जाणून घेऊ यात फ्लॉवर कोणत्या रोगांवर प्रभावी ठरतो ते. फ्लॉवरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिनं, कबरेदकं, लोह, , , क ही जीवनसत्व, आयोडिन, पोटॅशियम आणि काही प्रमाणात तांबं इतके पोषक घटक असतात. आपल्या आरोग्याला आवश्यक अशा घटक पदार्थांनी समृद्ध अशी ही भाजी आहे.

     गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या भागातल्या आदीवासी समाजात फ्लॉवरचा औषध म्हणून वापर केला जातो. हिरड्यांमधून रक्त येत असेल तर फ्लॉवरच्या पानांचा रस त्यावर प्रभावी ठरतो. कच्चा फ्लॉवर खाल्ला तर हिरड्यांवरची सूज कमी होते. पोटाच्या तक्रारींवरही फ्लॉवर उत्तम. दररोज रिकाम्या पोटी फ्लॉवरचा रस प्यायला तर कोलायटीस आणि पोटाचे इतर विकार दूर होतात. गळ्याला सूज आली असेल तर त्यावरही फ्लॉवरच्या पानांचा रस गुणकारी ठरतो. गळ्याच्या इतर विकारांवरही हा रस प्रभावी आहे. कच्चा फ्लॉवर स्वच्छ धुवून चावून-चावून खावा. यामुळे रक्त शुद्ध होतं. रक्त शुद्ध झाल्याने त्वचेचे अनेक विकारही दूर होतात. भरपूर प्रमाणात लोह आणि प्रथिनं असल्याने शरीराला भरपूर उर्जा आणि बळ मिळतं. यामुळे आपण दिवसभर उत्साही राहू शकतो. 
     रात्री झोपण्याआधी फ्लॉवरचा रस प्यावा.  यामुळे बद्धकोष्ठतेच्या तक्रारी दूर होतात आणि पोट साफ होऊन जातं. कावळीच्या रुग्णांना फ्लॉवर आणि गाजर यांचा रस सम प्रमाणात एकत्र करून द्यावा. बराच फायदा होतो. गुजरातमधल्या डांग आदिवासींच्या म्हणण्यानुसार हा रस हात-पाय आणि हाडांच्या दुखण्यावरही उपयुक्त ठरतो. तर असा हा फ्लॉवर. दिसायला जितका आकर्षक तितकाच औषधी गुणधर्मांनी समृद्ध. त्यामुळे काय असतं फ्लॉवरमध्ये असं कोणी विचारलं तर फ्लॉवरच्या या गुणधर्मांची माहिती नक्की द्या.

दात ठेवा शुभ्र..
दात शुभ्र असणे फार गरजेचे आहे. काही जण इतरांविषयी दाताच्या रंगावरून निष्कर्ष काढतात. म्हणून हे उपाय करा आणि पांढरे शुभ्र दात ठेवा. जेवल्यानंतर अनेकदा दातांमध्ये अन्नकण अडकतात. मात्र हे अन्नकण पिनने, काडीने कधीही काढू नका. यामुळे दातांना इजा होऊ शकते. त्यामुळे असे उपाय करू नका.
मोसमी फळे किंवा कच्च्या भाज्यांचा आहारात समावेश करा. कारण, शरीराला पौष्टिक सत्व देण्यासोबतच ते दातही पांढरे करतात.
गरम खाणे खाल्ल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नका. यामुळे जबड्यावर परिणाम होतो. काही वेळेस दात हलू लागतात.
दातांच्या मजबूतीसाठी आपल्या आहारात कॅल्शिअम आणि क जीवनसत्व असणार्‍या पदार्थांचा समावेश करा. संत्रे, मोसंबी यांसारखी फळे आणि आवळा, दही, पनीर, नारळ, मोड आलेली कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करा.
महिलांनी मासिक पाळीच्या काळात दातांची खास काळजी घेणे आवश्यक आहे. कारण या काळात होणार्‍या हार्मोनल बदलांचा परिणाम दातांवरही होऊ शकतो.


No comments:

Post a Comment