Monday, February 5, 2018

जॅकी श्रॉफ


 बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉ फ   यांनी आपाला 61 वा वाढदिवस साजरा केला. 1 फेब्रुवारी  हा त्याचा जन्म दिवस. जॅकी श्रॉ फ  यांचे बॉलीवूडमधल्या निवडक अभिनेत्यांमध्ये नाव घेतले जाते.त्यांनी जवळजवळ तीनदशकाहून अधिक काळ आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांमध्ये आपलं वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. जॅकी श्रॉ फने हिंदी चित्रपटांशिवाय गुजराती, तामिळ, बंगाली, मल्याळम, कन्नड, मराठी, पंजाबी आणि उडिसा अशा नऊ भाषेतल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

 जॅकी श्रॉ फचे मूळ नाव जयकिशन श्रॉ फ   आहे.त्यांनी आपल्या चित्रपटाची कारकिर्दीची सुरूवात 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या देवनंदच्या स्वामीदादा चित्रपटाने केली. या चित्रपटात त्याची छोटीच भूमिका होती. या दरम्यान सुभाष घई यांची नजर त्यांच्यावर पडली. ते त्यावेळा हिरो चित्रपट बनवण्याची तयारी करत होते. सुभाष घईंना आपल्या हिरो चित्रपटात एक रङ्गटङ्ग छबी असलेला कलाकार हवा होता. त्यांनी जॅकीला हिरो चित्रपटासाठी निवडले. 1983 मध्ये प्रदर्शित झलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशा: डोक्यावर घेतले. का चित्रपट सुपरहिट ठरला.
 1986 मध्ये जॅकीला पुन्हा एकदा सुभाष घईंच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. का चित्रपट दिलीप कुमार यांच्याच भोवतीच फिरत  होता.पण प्रेक्षकांनी या चित्रपटातल्या जॅकीच्या कामाचे कौतुक केले.या चित्रपटातील जॅकी आणि अनिलकुमार यांच्या जोडीला बेहद पसंद केले.1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या काश या चित्रपटाचा खास करून उल्लेख करावा लागेल. जॅकी केवळ मारधाड चित्रपटाम्मध्ये उठून  दिसतो, अशी काही लोकांची धारण होती. मात्र या चित्रपटात त्यांनी भावनिक शेडचे काम उत्तमरित्या केले. 1989 साल जॅकीसाठी महत्त्वपूर्ण राहिले. या सालात त्रिदेव, राम लखन आणि परिंदासारखे सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाले. सुभाष घईंच्या रामलखन चित्रपटातल्या जॅकी आणि अनिल कपूर यांच्या जोडीने पुन्हा एकदा  प्रेक्षकांची मने जिंकली.
 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या 1942 ए लव स्टोरी आणि 1995मध्ये प्रदर्शित झालेल्या रंगीला चित्रपटासाठी जॅकीला सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्याचा फिल्म  फेअर  पुरस्कार मिळाला. जॅकीच्या कारकिर्दीत मीनाक्षी शेषाद्री आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबतची जोडी खूपच पसंदकेली गेली.   


No comments:

Post a Comment