आपल्या मोहक हास्याने आणि
अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी हिदी चित्रपट अभिनेत्री मधुबाला हिचे खरे नाव
मुमताज जहान बेगम दहलवी. बेबी मुमताज म्हणूनही ती ओळखली जायची. मधुबाला लौकिक
अर्थाने शिकलेली नव्हती. मधुबालाने इंग्रजी संभाषणाचे धडे सुशीलाराणी पटेल
यांच्याकडून घेतले होते. मधुबालाचा व चित्रपटसृष्टीचा संबंध हा फारच जवळचा. मुंबईत
झालेल्या गोदीच्या स्फोटात त्यांचं घर उद्ध्वस्त झालं, मात्र मधुबालाचं कुटुंब वाचलं ते केवळ चित्रपट पाहायला
गेल्यामुळे. घरच्या परिस्थितीने अवघ्या नवव्या वर्षीच तिला चित्रपटात काम करावं
लागलं. अभिनय करण्याकरिता नव्हे तर केवळ अर्थार्जन करण्यासाठी मधुबाला या
चित्रपटसृष्टीत आली.
बालकलाकार म्हणून १९४२ साली आलेला 'बसंत'
हा तिचा पहिला चित्रपट. अभिनेत्री देविका रानी यांनी तिचे काम
पाहिले. तिच्या कामाने प्रभावित होऊन त्यांनीच तिला मधुबाला हे नाव दिले. बालवयातच काम करायला सुरुवात केल्यामुळे
मधुबाला कधी शाळेत जाऊ शकली नव्हती. तिला उर्दू भाषा येत होती, परंतु इंग्रजीचा एकही शब्द तिला बोलता येत नव्हता. मधुबालावर तिच्या
वडिलांचा पगडा खूप जास्त होता. वडिलांच्या कडक शिस्तीमुळे मधुबाला कधीही पार्टी,
प्रीमिअरमध्ये दिसली नाही. १९४२ साली आलेल्या ‘बसंत’ या
सिनेमाद्वारे त्यांनी बालकलाकाराच्या रुपात पहिल्यांदा पडद्यावर एन्ट्री घेतली.
त्यावेळी त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे. तर अभिनेत्री म्हणून १९४७ मध्ये ‘नीलकमल’
या सिनेमात त्या पहिल्यांदा झळकली होत्या. याचवर्षी त्यांचा आणखी एक चित्रपट रिलीज
झाला होता. ‘दिल की रानी’ हे दुस-या सिनेमाचे नाव. १९४८ मध्ये मधुबाला यांचा
‘अमर प्रेम’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सर्व सिनेमात मधुबाला राज कपूर
यांच्यासोबत झळकली होती. या सिनेमानंतर मधुबाला यांनी बॉम्बे टॉकीजच्या ‘महल’
सिनेमात काम केले होते. ‘महल’ला मिळालेल्या यशानंतर त्यांनी कधीही मागे वळून
पाहिले नाही. याच वर्षी तिचे एकापाठोपाठ एक
चित्रपट यशस्वी झाले. आल्या आल्या मधुबाला ही रसिकांच्या मनाची राणी झाली.
मधुबालाने कोणत्याही एका साच्यात अभिनय केला नाही. आपल्या सत्तरहून अधिक
चित्रपटांच्या कारकिर्दीत मधुबालाने जवळजवळ सर्वच प्रकारच्या जॉनरचे चित्रपट केले.
त्यात ग्लॅमरस होते, विनोदी होते, गंभीर
होते, शोकांतिकाही तशाच होत्या. महल, बरसात
की एक रात या चित्रपटातल्या तिच्या भूमिका असोत की मिस्टर अँण्ड मिसेस ५५, चलती का नाम गाडी, यांसारख्या सर्वच चित्रपटांमधल्या
तिच्या भूमिका रसिकांना आजही आपल्याशा वाटतात. काळातील आघाडीच्या अभिनेत्यांसह मधुबालाने काम केले होते. अशोक
कुमार, दिलीप कुमार, देवानंद या आघाडीच्या अभिनेत्यांसह मधुबालाने स्क्रिन स्पेस शेअर केली
होती. आपल्या करिअरमध्ये त्यांनी एकुण ६६ सिनेमांमध्ये प्रमुख अभिनेत्री म्हणून
काम केले होते. त्यानंतर किशोर कुमार यांच्यासह मधुबालाचे लग्न झाले.हॉलिवुडमध्ये
जसा मर्लीन मन्रोने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिचा काळ गाजवला, तसाच बॉलिवुडमध्ये लावण्यवती मधुबाला यांनी बॉलीवूड मध्ये गाजवला.
भारतातच नव्हे पण हॉलीवुडपर्यंत मधुबाला यांच्या सौंदर्याची कीर्ती गेली होती.
जगप्रसिद्ध दिग्दर्शक मा.फ्रँक काप्रा यांनी भारतात येऊन मधुबाला यांना
हॉलीवुडमधील चित्रपटात चमकविण्याचे प्रयत्न केले होते.. पण त्यांच्या वडिलाच्या
मुळे ते शक्य झाले नाही. काप्रामुळे तिच्याबद्दल तेथील माध्यमांनी यामुळे खूप
लिखाण केले.
१९५२ च्या तेथील एका नियतकालिकात असे म्हटले गेले की,
“Madhubala ~~ The biggest star in the world and she is not in Beverlie Hills.” नर्गिस यांच्या नंतर भारतीय टपाल खात्याने १८ मार्च २००८ ला मधुबाला यांचे तिकीटा काढून मान दिला होता. अतिशय अल्पायुशी असणारी ही अनुपम सौंदर्यवती आपल्या गुणांमुळे मात्र
चिर:कालपर्यंत बॉलिवूड कलाकार आणि सिनेप्रेमींच्या मनात स्वत:चे स्थान अबाधित
राखून आहे, यात शंकाच नाही. २३ फेब्रुवारी १९६९
रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले.
No comments:
Post a Comment