Monday, February 5, 2018

गुणकारी संत्र्याची साल


     बाजारात संत्री दिसू लागताच ती खरेदी करण्याचा मोह अनेकांना होतो. रास्त भाव असल्याने चांगला उठावही आहे. घरोघरी संत्री खाल्ली जात आहेत. पण बरेचदा संत्र्याचा ज्यूस काढून साली टाकून दिल्या जातात. खरे तर या सालींच्या रूपाने अनेक लाभकारक तत्वेच कचर्‍यात मिसळली जातात. हे टाळायला हवे. संत्र्यांच्या सालींचे उपयोग जाणून घेतले तर आपण किती बहुमोल खजिना वाया घालवतोय याची जाणीव होईल.
1. प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधांमध्ये संत्र्याच्या सालींमधील रोगनाशक तत्वांचा लाभ घेतला जाताना दिसतो. कोलेस्टेरॉल कमी करणार्‍या बहुसंख्य औषधांमध्ये संत्र्याच्या सालींचा उपयोग केलेला असतो. यातील उपयु द्रव्य शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्याच्या कामी येतात. 

2. स्वस्थ पेशींमधील ऑक्सिजन चोरणारे मुक्त कण दूर करणारे गुणधर्म या सालींमध्ये आहेत. यातील गुणधर्म पेशींचे विभाजन आणि कर्करोगाचा प्रसार रोखण्याचे काम करतात.
3. हार्टबर्न ही अनेकांना छळणारी समस्या आहे. मात्र संत्र्याच्या सालींमध्ये याचे नैसर्गिक औषध दडलेय. यातील सक्रिय रसायन हार्टबर्नपासून मुक्त देते. सलग वीस दिवस संत्र्यांच्या सालीचा काढा घेतल्यास हा त्रास कमी होतो.
4. संत्र्याच्या सालीत फायबरची मात्रा जास्त असते. १00 ग्रॅम सालींमध्ये कमीत कमी १0.६ ग्रॅम फायबर असते. शरीरामध्ये फायबरची पर्याप्त मात्रा असल्यास बद्धकोष्ठता, पोट फुगणे, करपट ढेकर आदी समस्या दूर होऊन पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
5. संत्र्याच्या सालींमध्ये व्हिटॅमिन सीची उपलब्धता असते. हे व्हिटॅमिन श्‍वसनासंबंधीच्या तक्रारी दूर करते. म्हणजेच ब्रोंकायटिस, सर्दी, खोकला, फ्लू, अस्थमा आणि फुफ्फुसाच्या कर्करोगापासून रक्षण होते.
6. संत्र्याच्या साली नैसर्गिक एअरकंडिशनरचे काम करतात. या सालींची पावडर करून त्यात चंदनासारखे एखादे सुगंधी द्रव्य मिसळावे. हे मिर्शण पाण्यात मिसळून फवारल्यास वातावरण सुगंधी होण्यास मदत होते.
7.दातांवरील पिवळी झाक नाहिशी होण्यासाठी संत्र्याच्या सालींचा उपयोग होतो. संत्र्याच्या सालींची पावडर दातांवर लावून ठेवावी. काही वेळाने चूळ भरावी. हा उपाय नियमितपणे केल्यास दात पांढरेशुभ्र आणि किडमुक्त होतात


No comments:

Post a Comment