Monday, February 12, 2018

1रोज नवे नवे ... हवे हवे


आईसाठी आरोग्यदायी आहार 
 मातृत्व ही सर्वोत्तम देणगी असली तरी बाळंतपणानंतर स्त्रीच्या शरीराची मोठय़ा प्रमाणावर झीज होते. म्हणूनच बाळाला जन्म दिल्यानंतर आईने आरोग्यदायी आहार घेणं गरजेचं असतं. त्यामुळेच आहारात काही पदार्थांचा समावेश करावा. 
लहान बाळ स्तनपान करतं. त्यामुळे आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करता येईल. यामुळे आईला पोषण मिळू शकेल. गरोदरपणाच्या काळात वाढलेलं वजन कमी करावंसं वाटतं. पण लगेच वजन कमी करू नये. यामुळे दुधाच्या निर्मितीवर परिणाम होऊ शकतो. आहारात ब्राऊन राईसचा समावेश करा. यामुळे आईच्या दुधाचा दर्जा सुधारेल. 
प्रथिनांची गरज भागवण्यासाठी आहारात अंड्यांचा समावेश करता येईल. अंड्याच्या सेवनामुळे आईच्या दुधातल्या फॅटी अँसिड्सचं प्रमाण वाढतं.  सुरमई माश्यात अनेक पोषक घटक असतात. बाळाच्या मज्जासंस्थेची वाढ होण्यासाठी आवश्यक असणार्‍या डीएचए या घटकाचं प्रमाण सुरमईमध्ये असतं पण या माश्यात पार्‍याचा अंश असल्याने त्याचं सेवन किती प्रमाणात करावं हे डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवावं लागेल. मूग आणि बीन्स यांचा समावेश आहारात करता येईल. मुगात प्रथिनांचं प्रमाण बरंच जास्त असतं.

मुरुमांचा त्रास?
 अनेकांना चेहर्‍यावरील मुरुमांचा त्रास होत असतो. त्यावर उपचारही घेतले जातात. पण हा त्रास काही केल्या कमी होत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. असे असताना एक सोपा उपाय योजता येईल ज्याद्वारे हा त्रास काही अंशी कमी होऊ शकतो. यासाठी गरम-गार पाण्याचा शेक उपयुक्त ठरतो. आधी गरम आणि नंतर गार पाण्याचा शेक घ्यावा. यामुळे रंध्रांत अडकलेली धूळ, घाण बाहेर पडते आणि संसर्ग टळून मुरुमं येण्याचं प्रमाण कमी होतं.

(बोधकथा) दृष्टिकोन
 शेतकर्‍याने शेताच्या राखणीसाठी एक कुत्रा पाळला होता. लहानपणापासूनच त्या कुत्र्याला शेताचं रक्षण करण्याचं विशेष प्रशिक्षण देण्यात आलं होतं. त्यामुळे या कामात तो तयार झाला होता. तो कोणालाही शेतात घुसू देत नसे. त्याच्या दहशतीने शेतात पाऊल टाकण्याची कोणाची हिंमत होत नसे. हा कुत्रा शेतात घुसलेल्या जनावरांवरही धावून जात असे. त्याच्या या हल्ल्याने त्यांची पळता भुई थोडी होई. या चांगल्या कामगिरीमुळे मालकाचा त्याच्यावर भरवसा होता. असंच एकदा त्या शेतात एक ससा शिरला. त्याचा वास येताच कुत्रा त्याच्यामागे धावला. ससा पुढे आणि कुत्रा मागे अशी शर्यत सुरू होती. शेवटी कुत्रा थांबला आणि मागे परतला. ते पाहून शेजारी चरणार्‍या बकर्‍या म्हणाल्या, कुत्रा केवढा मोठा आणि ससा किती लहान पण शेवटी ससा जिंकला. ते ऐकून कुत्रा म्हणाला, मी रोजीरोटीसाठी धावत होतो तर ससा प्राण वाचवण्यासाठी धावत होता. मी कर्तव्य निभावण्यासाठी धावत होतो तर ससा जीव वाचवण्यासाठी धावत होता. धन्यासाठी काम करणं आणि स्वत:साठी काम करणं यात फरक असणारच.
तात्पर्य - काम तेच पण, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा.

  करा संगीतात करिअर 
 डीजेच्या तालावर ढिनचॅक नाचायला सगळ्यांनाच आवडतं. म्हणूनच संगीताची आवड आणि या क्षेत्रात काही तरी वेगळं करण्याची इच्छा असणार्‍या तरुण-तरुणींना डीजे म्हणून करिअर करण्याच्या मोठय़ा संधी आहेत. यासाठी जगभरातल्या संगीताची जाण असावी लागते. लोकांची नस पकडण्याचं कौशल्यही असावं लागतं. हे गुण असतील तरच तुम्ही प्रथितयश डीजे बनू शकता. डीजेच्या क्षेत्रात दररोज नवं तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर येतं. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही तुम्ही अपडेट असणं गरजेचं असतं. 
संगीताच्या क्षेत्रात डीजेंना प्रचंड मागणी आहे. या क्षेत्रात येणार्‍यांना अनेक पर्याय उपलब्ध असतात. चांगला पैसाही मिळतो. पुरेशा अनुभवानंतर स्वत:ची अकादमीही सुरू करता येते. अनुभव, कौशल्य आणि प्रसिद्धी यावर डीजेचं उत्पन्न अवलंबून असतं. कॉन्सर्ट किंवा पार्टीसाठी सुरुवातीला एका रात्रीचे ३0 हजार ते ७0 हजार रुपये मिळू शकतात. वर्षाला तीन ते सहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न अगदी सहज मिळतं. त्यामुळे आवड असेल तर डीजे म्हणून करिअर घडवायला काहीच हरकत नाही. आपल्याकडे डीजेचे पूर्णवेळ प्रशिक्षण देणारी कॉलेजेस नाहीत. 
तसंच डीजेचा विशिष्ट असा कोणताही अभ्यासक्रम नसतो. पण, खासगी संस्था तसंच प्रशिक्षण केंद्रांमध्ये तुम्हाला डीजेचं प्रशिक्षण मिळू शकतं. मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता या महानगरांमध्ये डीजेचं प्रशिक्षण देणार्‍या बर्‍याच संस्था आहेत.डीजेच्या तालावर ढिनचॅक नाचायला सगळ्यांनाच आवडतं. म्हणूनच संगीताची आवड आणि या क्षेत्रात काही तरी वेगळं करण्याची इच्छा असणार्‍या तरुण-तरुणींना डीजे म्हणून करिअर करण्याच्या मोठय़ा संधी आहेत. यासाठी जगभरातल्या संगीताची जाण असावी लागते. लोकांची नस पकडण्याचं कौशल्यही असावं लागतं. हे गुण असतील तरच तुम्ही प्रथितयश डीजे बनू शकता. डीजेच्या क्षेत्रात दररोज नवं तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर येतं. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही तुम्ही अपडेट असणं गरजेचं असतं. 
संगीताच्या क्षेत्रात डीजेंना प्रचंड मागणी आहे. या क्षेत्रात येणार्‍यांना अनेक पर्याय उपलब्ध असतात. चांगला पैसाही मिळतो. पुरेशा अनुभवानंतर स्वत:ची अकादमीही सुरू करता येते. अनुभव, कौशल्य आणि प्रसिद्धी यावर डीजेचं उत्पन्न अवलंबून असतं. कॉन्सर्ट किंवा पार्टीसाठी सुरुवातीला एका रात्रीचे ३0 हजार ते ७0 हजार रुपये मिळू शकतात. वर्षाला तीन ते सहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न अगदी सहज मिळतं. त्यामुळे आवड असेल तर डीजे म्हणून करिअर घडवायला काहीच हरकत नाही. आपल्याकडे डीजेचे पूर्णवेळ प्रशिक्षण देणारी कॉलेजेस नाहीत. 
तसंच डीजेचा विशिष्ट असा कोणताही अभ्यासक्रम नसतो. पण, खासगी संस्था तसंच प्रशिक्षण केंद्रांमध्ये तुम्हाला डीजेचं प्रशिक्षण मिळू शकतं. मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता या महानगरांमध्ये डीजेचं प्रशिक्षण देणार्‍या बर्‍याच संस्था आहेत.

  अशा वेळेला घ्या डॉक्टरांचा सल्ला 
  आजकाल छातीत थोडं दुखलं तरी हृदयविकाराशी संबंध जोडला जातो. पण हे चुकीचं आहे. व्यायामाच्या अभावामुळे किंवा स्थूलतेमुळे, जास्त दमणूक झाली तरी छातीत दुखू शकतं. अर्थात अशी काही समस्या नसताना छातीत दुखू लागलं तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अगदी थोड्या हालचालीनेही दमल्यासारखं वाटत असेल तर नक्कीच काळजीचं कारण आहे. डोकेदुखी हासुद्धा एक दुर्लक्षित विषय. वेदनाशामक औषधं घेऊन किंवा काही काळ झोपून आपण डोकेदुखीला विसरून जातो. पण डोकं दुखण्याची पद्धत बदलत असेल म्हणजेच प्रत्येक वेळी डोक्याच्या वेगळ्याच भागात वेदना जाणवत असतील किंवा नव्यानंच हे दुखणं मागे लागलं असेल तर तपासणी करून घ्यावी. त्याचप्रमाणे बरेचदा पाठीच्या दुखण्याकडेही आपलं दुर्लक्षच होतं. बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे ही समस्या जाणवते आणि अशी पाठदुखी आपोआप बरीही होते. वेदनाशामक औषधं घेऊन काही काळ बरं वाटतं. पण पाठदुखीची तीव्रता तीव्र असेल आणि औषधं घेऊनही दुखणं थांबत नसेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. मानेच्या वरच्या भागाचं दुखणं स्पॉडीलायसिसचं लक्षण असू शकतं. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावं.

स्मार्ट फोन विकण्यापूर्वी...
बाजारात नवा स्मार्टफोन आला की आपला फोन आउटडेटेड वाटू लागतो. अशावेळी नवीन फोन घ्यायचा तर आधीचा स्मार्टफोन विकणं गरजेचं असतं. पण स्मार्टफोन विकण्याआधी फॅक्टरी रिसेट करण्याची दक्षता घेतली असेलच. ही काळजी घेतली तर कोणीही आपला पर्सनल डाटा मिळवू शकत नाही. मात्र कोणीही अधिक डोकं लढवून डाटा रिकव्हर करू नये यासाठी आणखीही काही दक्षता बाळगा. त्यासाठी काही टिप्स लक्षात घ्या.
* फोन विकण्याआधी त्यातील जीमेल आणि सर्व सर्व्हिसेस लॉग आऊट करा.
* त्यानंतर सेटिंग्जमध्ये स्मार्टफोन इन्क्रिप्ट हा पर्याय निवडा. तुमचा डाटा इन्क्रिप्ट होईल.
* यानंतर कोणी तुमचा डाटा रिकव्हर केला तरी तो इन्क्रिप्टेड असेल. तो कोणीही वाचू शकणार नाही.
* इन्क्रिप्शन केल्यानंतर फोन फॅक्टरी रिसेट करा. 
* यासाठी तुम्ही अँटी थेफ्ट अँप डाऊनलोड करून घेऊ शकता. याद्वारे स्मार्टफोनमधील डाटा डलीट करता येतो. 
*  डबल सिक्युरिटी हवी असेल तर रिसेट केल्यावर फोनमध्ये जंक फाईल्स सेव्ह करा आणि पुन्हा फाईल्स इन्क्रिप्ट करा. यानंतर फॅक्टरी रिसेट करा. यामुळे एखाद्याने डाटा रिकव्हर केला तरी त्याला केवळ जंक फाईल्सच मिळतील.

वाढवा सामान्यज्ञान
 1) औद्योगिक व्यवसायांना उपयुक्त असणार्‍या पिकांना काय म्हणतात?
2) वनस्पतींची वाढ मोजणार्‍या यंत्राला काय म्हणतात?
3) 'आनंदवन' ही संस्था कोणासाठी काम करते?
4) 'ए लाँग वॉक टू फ्रीडम' ही कादंबरी कुणी लिहिली आहे?
5) विधानसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहेत
उत्तर: 1)नगदी पीकं 2)क्रेस्कोग्राफ 3)कुष्ठरोगी 4) नेल्सन मंडेला 5) उत्तर प्रदेश 
(अनिकेत फीचर्स,जत)

No comments:

Post a Comment