लहानांपासून
ज्येष्ठांपर्यंत सगळय़ांनाच आवडते सुखावणारे कौतुक करून तर पहा. कौतुक, बघा समोरचा किती आनंदी होतो.
देऊन तर पहा कॉम्प्लिमेंटस्, बघा कशी कळी खुलते समोरच्या
व्यक्तीची. कौतुकाने प्रोत्साहन मिळतं. मुलांच्या प्रगतीत कौतुकाला अनन्यसाधारण
महत्त्व आहे. पण, त्याचबरोबर अतिकौतुक होणार नाही,
चुकीच्या गोष्टींचे कौतुक होणार नाही, याची
काळजी घेतली जावी. अन्यथा ते फार घातक ठरू शकतं. अधिक मित्र हवे असतील, तर दुसर्यांच्या गुणांचे मनापासून कौतुक करा. खरं तर प्रत्येकाला
कौतुक केलेलं आवडतं.
सगळय़ांनाच आवडतं कौतुक. अगदी मुलापासून ते आजी-आजोबापर्यंत. खरंच,
कोणी प्रशंसेचे दोन शब्द बोलले की कसं छान वाटतं ना, अंगावरून मोरपिस फिरल्यासारखं. आणि कौतुक कशाचंही केलं जाऊ शकतं. अगदी
लहानसहान गोष्टीचंही. ते करण्यासाठीही फार काही महत्कृष्ट पडतात असंही नाही. दोन
चांगले शब्द बोलायला काहीच त्रास नसतो. कौतुक.. एकदम जादूई शब्द आहे ना. आणि
त्याचा इफेक्ट पण जादूच्या कांडीसारखा.मनुष्य स्वभावाचीही किती गंमत आहे ना. त्याला आपलं कौतुक केलेलं खूप आवडतं. पण तेवढीच नावडअसते दुसर्याचं कौतुक करायला हवं. पण, एकदा ही जादूची कांडी फिरवून तर पहा ना. खरंच जादू होते. तुम्हाला लगेच जाणवणार नाही कदाचित. पण, जादू नक्कीच होते. तुम्हाला एखादी गोष्टआवडली, भावली की, त्याची लगेच पोच द्यायला शिका आणि तशी सवयच करून घ्या. खूप गरजेचं आहे हे. कॉम्प्लिमेंट्स द्यायला आपण शिकलं पाहिजे असं वाटतं.
आपलं काय आपलं काय होतय ना की, एखादी गोष्टआपल्याला नाही आवडली तर ती व्यक्ती करण्याची kind of प्रतिक्षिप्त क्रियाच आपल्या हातून होत असते. तेच जर एखादी गोष्ट आपल्याला आवडली तर ते व्यक्त करायला मात्रआपण अळं-टळं करतो. त्यामुळे त्याबद्दल कॉम्प्लिमेंट्स देणं विसरूनच जातो. अगदी तुमच्या जवळच्या माणसांपासून सुरुवात करा. तुमच्या आई-बाबा, आजी-आजोबा, मुलं-मुली, पती-पत्नी यांना कॉम्प्लिमेंट्स द्या आणि बघा छोट्यामोठय़ा गोष्टींनीसुद्धा आपण दुसर्याला किती आनंद देऊ शकतो. लहान मुलांच्या बाबतीत तर कौतुक केलं जाणं खूप महत्त्वाचं ठरतं, प्रेरणादायी ठरतं. ते त्यांच्यातल्या कलागुणांना फुलविण्याचं साधंच, पण खूप परिणामकारक साधन आहे. त्यांच्या वाढीत खूप महत्त्व आहे. हे खरं आहे की नाही एखाद्या आईला विचारा. ती नक्की सांगेल.
तर असा आहे कौतुकाचा महिमा. लहानपणापासून वृद्धावस्थेपर्यंत आयुष्याच्या सर्व टप्प्यांमध्ये काही क्षण अनपेक्षितपणे सुखावणारे असतात. तर अनेक क्षण आपल्याला मनसोक्त हसवून जातात. माझ्या मते आपल्यातील प्रत्येकजण अशा सुखद क्षणांची अनिवार ओढीने वाट बघत असतो. असे म्हणतात, जे जे तुम्ही इतरांसाठी कराल, ते ते तुमच्याही वाट्याला येईल. मग ते चांगले असो अगर वाईट. जर आपण इतरांच्या चेहर्यावर आपल्या कृतीने किंवा शब्दांनी काही काळासाठी का होईना, आनंदाचे भाव किंवा समाधान फुलवू शकलो, तर त्यातून मिळणारे सुख हे वर्णनाच्या पलीकडचे असते.
माझ्या मित्रमैत्रिणींच्या टोळक्यात काहीजण विलक्षण लोकप्रिय आहेत. त्यांच्या या लोकप्रियतेचे प्रमुख कारण म्हणजे ते सतत इतरांना हसवत असतात. कधी स्वत:च्या कृतीतून, कधी फालतू विनोद सांगून किंवा कधी जाणून-बुजून वातावरण हलके करण्यासाठी मजेशीरपणे वागून! रोजच्या कटकटींना, तणावाला कंटाळलेल्या मनांना नवा उत्साह देण्यासाठी हास्याचे हे काही क्षण पुरेसे असतात. आपण कोणाच्या पोळलेल्या मनावर जर अशी फुं कर घालू शकलो, तर त्यातही एकप्रकारचे समाधान दडलेले असते. स्वत:बाहेर डोकावून इतरांच्या आयुष्यात आनंद पेरण्यात आपला व्यापक स्वार्थ आहेच! चला तर मग, आयुष्याला सुंदर करूया.
No comments:
Post a Comment