Thursday, February 8, 2018

जासूस शेरलॉक नोम्स


     
मुलांनो,तुम्हाला अॅनिमेटेड किंवा कार्टून चित्रपट पाहायला फार आवडतात ना! टीव्हीवरचा तर तुम्ही एकही कार्टून कार्यक्रम सोडत नाही, हे आम्हाला ठाऊक आहे. पण आता तुमच्यासाठी फारच मनोरंजक असा चित्रपट येणार आहे,त्याचं नाव आहे, जासूस शेरलॉक नोम्स! हा चित्रपट ब्रिटीश, अमेरिकन 3 डी कॉम्प्युटर अॅनिमेटेड असून यात फँटसी,कॉमेडी आणि रहस्य यांचा अगदी खजिना पाहायला मिळणार आहे. या कार्टून चित्रपटाचे दिग्दर्शन जॉन स्टीवसन यांनी केले आहे. हा कार्टून चित्रपट म्हणजे 2011 मध्ये आलेल्या नोमियो अँड ज्युलियटचा सिक्वल आहे. यात असलेल्या कार्टून पात्रांना हॉलिवूड कलाकार जसे की, जेम्स मॅकावॉय, एमिली ब्लंट, जॉनी डेप इत्यादींनी आपला आवाज दिला आहे.यात मुख्य पात्र आहे ते नेमियो आणि ज्युलिएटचे! रहस्यमयरित्या अदृश्य झालेल्या आपल्या कुटुंबातील सदस्यांचा आणि मित्रांचा शोध घेण्यासाठी जासूस शेरलॉक नोम्सची नियुक्ती करण्यात येते. शेरलॉक नोम्सचे पात्र शेरलॉक होम्सशी मिळते-जुळते आहे. शेरलॉक त्यांना शोधून काढण्यात यशस्वी होतो की नाही, ते तुम्हाला मार्च महिन्यात समजून येईल.

No comments:

Post a Comment