अनेकांना आला दिवस कसा घालवायचा
असा प्रश्न पडलेला असतो. ज्येष्ठ व्यक्तींपुढे हा प्रश्न आ वासून उभा राहिला
असतो. या मंडळींना हा प्रश्न तर चांगलाच सतावत असतो.
आला दिवस आनंदात जावा, एकाकिपणा येणार नाही, याची त्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.मानसिकता ढळू नये, यासाठी प्रयत्न हवा. आपले जीवन आनंदी जगण्यासाठी स्वतःला व्यस्त ठेवणे
गरजचे आहे. त्यामुळे एकाकीपणा येणार नाही. जर आपण स्वतःला एकाकी मानत असाल,
तर एक गोष्ट नियमित करू शकता, की येणारा
प्रत्येक दिवस हा उत्साहानेच सुरू झाला पाहिजे. ङ्गिरायला जाणे, नवीन ओळखी वाढवणे, छंद जोपासणे, नियमित पत्रव्यवहार ठेवणे, तसेच काहीना काही
आयुष्याच्या बाबतीत सकारात्मक ठरवत राहणे हे आयुष्याला नवीन दिशा देतात. इंटरनेटवर
तर संबंधित विषयाची माहिती भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. आपले लक्ष आकर्षित करणारी
प्रत्येक गोष्ट आत्मसात करावी. छोट्याछोट्या गोष्टीतही स्वतःला व्यस्त ठेवता येते.
जगातील सर्व आनंदी लोक हेच करतात. म्हणजेच जे आनंदी दिसतात ते स्वतःला व्यस्त
ठेवायला शिकलेले असतात. जर तुम्ही एकाकी असाल तर स्वतःला तुमच्या समाजात समाविष्ट
करून घ्या. एखादे मंदिर किंवा त्याच प्रकारची ठिकाणे ज्या ठिकाणी प्रार्थना केली
जाऊ शकते अशा ठिकाणी नियमित जात जावे. स्वतःबरोबरच इतरांचेही एकटेपण दूर करण्याचा
सतत प्रयत्न केला पाहिजे. यात तुम्हालाच जास्त ङ्गायदा आहे.. जगात असे भरपूर लोक
आहेत की ज्यांना मदतीची नितांत गरज आहे. जरी तुम्ही एकाकी असला तरी जास्त झोप
काढणे, अती टीव्ही पाहणे धोकादायक आहे. कारण त्यामुळे आपण
स्वतःला अपराधी गृहीत धरायला लागतो. स्वतःच्या या अवस्थेला स्वतःच जबाबदार
असल्याचे मानू लागतो. कदाचित यामुळे नैराश्यही येऊ शकते. स्वतःला मद्यपाशात अडकवू
नका. अपयशाशी झुंज देऊन दुःखांवर मात करा. आनंदाने सद्य:परिस्थितीचा स्वीकार करा.
नैराश्याने काहीच साध्य होणार नाही हे जाणून घ्या. जर एखादा मद्यपी एखादा स्वमदत
गट आपलासा करून आपला मद्यपाश सोडवू शकतो, तर आपण अशाच
प्रकारच्या स्वमदत गटाच्या आधारे आपल्या नैराश्यावर मात का करू शकणार नाही?
इतरांची मदत घ्या. स्वत:ला प्रेरणा देण्यासाठी चांगले संगीत,
कविता, विनोद आणि ग्रंथालयाची पुस्तके
यांसारख्या सकारात्मक साधनांचा वापर करा. आध्यात्मिक जागी जायला हवे विचार करा,
जागे व्हा, आपले विचार जगापुढे मांडा, सभोवतलचा विचार करा आणि स्वतःबद्दल जास्त विचार करणे टाळा, अन पाहा आपला एकटेपणा आपोआप नाहीसा होईल
No comments:
Post a Comment