Monday, February 5, 2018

आर्थिक गुलामगिरीकडे जगाची वाटचाल


     अलिकडेच एक सर्व्हेक्षणाचा अहवाल वाचण्यात आला. सार्‍या जगातील गरिबांकडे जेवढी संपत्ती आहे, तेवढी संपत्ती जगातल्या अवघ्या 62 कुबेरांकडे आहे. हा अहवाल वाचला की, थक्क व्हायला होतं. जग कोणत्या दिशेला चाललं आहे, आणि भाविष्यात किती मोठा धोका जगापुढे वाढून ठेवला आहे, याचा अंदाज बांधणं अशक्य आहे.  श्रीमंत व गरिबांमधील वाढती दरी ही जगातील अनेक समस्यांपैकी एक सर्वांत मोठी आणि महत्त्वाची आणि धोकादायक समस्या आहेत्यातही आणखी चिंतेची बाब  म्हणजे दिवसेंदिवस ही दरी अधिकच वाढत चालली आहे. बाजारीकरणाच्या युगात जागतिक पातळीवर स्वीकारण्यात आलेल्या आर्थिक उदारीकरणाचे हे परिणाम आता समोर येत आहेत. भांडवलशाहीचे हे  महाभयंकर अपत्य आहे, असे आता म्हटले जात आहे. गुलामगिरीच्या मानसिक अवस्थेतून जग मुक्त झालेले असताना पुन्हा आर्थिक विषमतेतून आर्थिक गुलामगिरीकडे जगाची वाटचाल होणार की काय, अशा आता भीती व्यक्त केली जात आहे.

     काही बोटावर मोजता येतील एवढया लोकांकडेच संपत्तीचे प्रचंड केंद्रीकरण झाले आहे. एकीकडे गरिबांची अवस्था अधिकाधिक बिकट होत असताना श्रीमंतांच्या तिजोरीचे ओझे मात्र वाढतच चालले आहे. या सर्वेक्षणानुसार या जगातील अवघ्या 62 धनाढय लोकांची संपत्ती ही सुमारे अर्धा ते 1.76 खबर डॉलर एवढी वाढली आहे. गेल्या 12 महिन्यांमध्ये जगातील सर्वांत श्रीमंत आणि सर्वांत गरिबांमधील दरी सर्वाधिक वाढली असल्याने यावर विचार करण्याची गरज आहे. 2011 साली जगातील 388 श्रीमंतांकडे जगातील अध्र्या गरिबांच्या संपत्तीएवढी संपत्ती होती. पण ही दरी वाढत केली आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेल्याने पुढे अवध्या 177 श्रीमंतांकडे तेवढी संपत्ती जमा झाली. ही तङ्गावत पुढे वाढत गेली आणि 2014 मध्ये हा आकडा 80 वर आला. म्हणजे केवळ 80 श्रीमंतांकडे तेवढी संपत्ती जमली होती. गेल्या वर्षी हा आकडा 62 झाल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे. श्रीमंत व्यक्ती आपल्या हातातील सत्तेचा उपयोग संपत्ती गोळा करण्यासाठी, अधिकार गाजविण्यासाठी व संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी करीत आहे. आज ज्यांच्याकडे कसलीही पत नाही म्हणजे बँकेकडून पैसा-कर्ज मिळवण्यासाठी लागणारी गहाण-तारण ठेवण्यासाठी एकही वस्तू नसलेल्यांची संख्या जगात 30 टक्के एवढी झाली आहे. आजच्या भांडवलधारी युगात गरिबाला श्रीमंत होण्यासाठीचे हात कापून टाकले आहेत. त्यामुळे गरिंबांना सुखा-समाधानाने जगण्याचा अधिकार नाहीच का, असा प्रश्‍न पडतो.
    आर्थिक विषमता कमी झाल्याशिवाय जगामध्ये स्थायी स्वरूपात शांतता नांदणार नाही याचाही विचार भांडवलशाही समाजाने करावा लागणार आहे. निराधार, निराश्रीत, गरीब आणि कष्टकरी समाजासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून मात करण्यासाठी आपल्या कमाईतून काही भाग मोठया श्रीमंत देशांनी खर्च करावा. ज्यातून ’दारिद्रयमुक्त जग’ ही संकल्पना साकारता येईल. कारण जोपर्यंत दारिद्रय आहे, तोपयर्ंत आपण मानव या पृथ्वी ग्रहावर ताठ मानेने जगू शकणार नाही. श्रीमंत राष्ट्रांनी आपल्या तिजोरीतील काही हिस्सा दारिद्रय विषमतेची दरी दूर करण्याच्या या कामासाठी वापरायला हवा.जगातल्या या कुबेरांनी मोठा हिस्सा दारिद्र्य निर्मुलनांसाठी द्यायला हवा. सगळ्या देशांनी मिळून त्यांच्यावर दवाब आणायला हवा.शिवाय आपल्या देशासह जगातल्या नागरिकांनी  योग्य कर भरला. तर सर्व देशातील शासनांकडे दरवर्षी अब्ज डॉलरचा निधी उपलब्ध होईल. ही रक्कम जगभरातील अनेक गरीब मुलांचे आरोग्य सुधारण्यासह अन्य समस्या निराकरासाठी उपयोगाचे होईल.

No comments:

Post a Comment