थंडी आल्हाददायक असली तरी काहींना हे दिवस परीक्षा
पाहणारे वाटतात. या लोकांना थंडी जरा जास्तच त्रास देते. बाकीचे थंडीची मजा लुटत
असताना हे स्वेटर आणि शालींचं ओझं बाळगत घरात बसून राहतात. आपल्याला अन्य
लोकांपेक्षा जास्त थंडी वाजणं, थंड वातावरणाचा
जास्त त्रास होणं हे शरीरात लोहाची कमतरता असल्याचं लक्षण आहे. लोहाच्या
कमतरतेअभावी शरीरातील सर्व भागांपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकत नाही, परिणामी थंडीचा जास्त त्रास होतो. म्हणूनच ही समस्या असेल तर आहारात
उष्णता वाढवणार्या काही घटकांचा आवर्जून समावेश करायला हवा. या प्रयत्नात खजूराचा
वापर महत्त्वाचा ठरतो.
खजूरामध्ये लोहाबरोबरच फायबरची मात्राही असते. त्यामुळे बद्धकोष्ठता
दूर होण्यास याची मदत होते. बीटरुट मध्ये लोह आणि फोलिक अँसिडची पर्याप्त मात्रा
असते. त्याचप्रमाणे याच्या सेवनाने रोगप्रतिरोधक शक्ती वाढते. थंडीत आवळ्याचं
सेवनही लाभदायक ठरतं. थंडीत चहा-कॉफी ऐवजी गरमागरम सूप घेणं फायदेशीर ठरतं.
ल्लथंडी आल्हाददायक असली तरी काहींना हे दिवस परीक्षा पाहणारे वाटतात. या लोकांना
थंडी जरा जास्तच त्रास देते. बाकीचे थंडीची मजा लुटत असताना हे स्वेटर आणि शालींचं
ओझं बाळगत घरात बसून राहतात. आपल्याला अन्य लोकांपेक्षा जास्त थंडी वाजणं, थंड वातावरणाचा जास्त त्रास होणं हे शरीरात लोहाची कमतरता असल्याचं लक्षण
आहे. लोहाच्या कमतरतेअभावी शरीरातील सर्व भागांपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकत
नाही, परिणामी थंडीचा जास्त त्रास होतो. म्हणूनच ही समस्या
असेल तर आहारात उष्णता वाढवणार्या काही घटकांचा आवर्जून समावेश करायला हवा. या
प्रयत्नात खजूराचा वापर महत्त्वाचा ठरतो.
खजूरामध्ये लोहाबरोबरच फायबरची मात्राही असते. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास याची मदत होते. बीटरुट मध्ये लोह आणि फोलिक अँसिडची पर्याप्त मात्रा असते. त्याचप्रमाणे याच्या सेवनाने रोगप्रतिरोधक शक्ती वाढते. थंडीत आवळ्याचं सेवनही लाभदायक ठरतं. थंडीत चहा-कॉफी ऐवजी गरमागरम सूप घेणं फायदेशीर ठरतं.
खजूरामध्ये लोहाबरोबरच फायबरची मात्राही असते. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास याची मदत होते. बीटरुट मध्ये लोह आणि फोलिक अँसिडची पर्याप्त मात्रा असते. त्याचप्रमाणे याच्या सेवनाने रोगप्रतिरोधक शक्ती वाढते. थंडीत आवळ्याचं सेवनही लाभदायक ठरतं. थंडीत चहा-कॉफी ऐवजी गरमागरम सूप घेणं फायदेशीर ठरतं.
प्रसाधनं वापरताना..
सुगंधाची न्यारी दुनिया
आपल्याला लुभावते. पण, सुगंध दीर्घकाळ
टिकावा यासाठी प्रसाधनांमध्ये अल्कोहोल घातलं जातं हे विसरता कामा नये. शँपू,
क्रिम, लोशन्स, टोनर्समध्ये
सुगंध दीर्घकाळ टिकण्यासाठी अल्कोहोल मिसळलं जातं. यामुळे त्वचा कोरडी पडणं,
खाज येणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अल्कोहोल फ्री
उत्पादनं घेण्यावर भर द्या. अल्कोहोल नसलेलं प्रॉडक्ट मिळत नसेल तर कमीत कमी
अल्कोहोल असलेलं प्रॉडक्ट घ्या.
साध्या टिकल्या, सिंदूरसोबतच मस्कारा, आयलायनर यातही घातक रसायनं असतात. पारा हा त्यातला एक महत्त्वाचा घटक असतो. आयलायनर, मस्कारातल्या पार्यामुळे डोळ्यांभोवती खाज सुटणं, पापण्या पातळ होणं यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. हेअर कलर आणि हेअर डायमध्ये अमोनिया हे घातक रसायन असतं. यामुळे त्वचा बाधित होऊ शकते. याव्यतिरिक्त आरोग्यविषयक इतर काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अमोनिया फ्री हेअर डाय आणि सल्फेट फ्री शँपू वापरण्याला प्राधान्य द्या. फेअरनेस तसंच इतर फेस क्रिम्समध्ये हायड्रोक्विनॉन असा एक घटक असतो. ब्लीचसाठी वापरण्यात येणार्या या घटकामुळे त्वचेला अँलर्जी होऊ शकते. या घटकाच्या अतिरिक्त वापरामुळे त्वचेवर पांढरे डाग पडू लागतात. म्हणूनच काळजी घ्यावी.
No comments:
Post a Comment