Thursday, February 8, 2018

(बोधकथा) लक्ष्यावर लक्ष


   गोष्ट फार जुनी नाही. एकदा स्वामी विवेकानंद अमेरिकेच्या प्रवासाला निघाले होते. तिथे फिरत असताना काही वेळ ते तिथल्या एका पुलावर थांबले. तिथेच काही मुले उभी होती. ते सगळे पाण्यात पडलेल्या अंड्याच्या टरपलाला दगडाने नेम धरून मारत होते. पण एकाचाही नेम लागत नव्हता.ते सारखा सारखा प्रयत्न करत होते,पण त्यांचा नेम काही लागत नव्हता. ते त्यात अपयशी ठरत होते.
स्वामी विवेकानंद त्यांच्याकडे लक्ष देऊन पाहात होते. थोड्या वेळाने ते त्यांच्याजवळ गेले. त्यांच्यातल्याच एका मुलाच्या हातातला दगड घेतला आणि निशाणा साधला. नेम बरोबर लागला. यानंतर अनेकदा आपला अचूक निशाणा साधला. ते योग्य जागी लागले. हे पाहून ती मुले चकित झाली. त्यांनी स्वामी विवेकानंदांना विचारलं,' तुम्ही निशाणा कसा अचूक साधलात?'
स्वामी विवेकानंद म्हणाले,'तुम्ही एकादे काम करता, ते अगदी मन लावून करा. तुम्ही निशाणा साधत असाल तर तुमचे संपूर्ण लक्ष त्याकडेच पाहिजे. असे केलात तर मग तुम्ही अजिबात चुकणार नाही. हीच गोष्ट अभ्यासादरम्यानही लागू होते. जर तुम्ही एकादा धडा वाचत असाल तर तुमचे संपूर्ण ध्यान त्यावरच केंद्रित पाहिजे. फक्त त्याचाच विचार डोक्यात यायला हवा. मग बघा, कसे तुम्ही तुमच्या कामात यशस्वी होतात ते!'

No comments:

Post a Comment