Saturday, April 25, 2020

(बालकथा) पुन्हा एकदा आग्रह कर...

एका गावातील एक शाकारलेलं मातीचं घर. आई घराच्या भिंती मातीने लिंपित होती.  तिचं लिंपणे बहुतांश उरकत आलं होतं. आता फक्त एकच भिंत उरली होती. तिने पुन्हा शेण आणि माती कालवायला घेतली. ती घाई करत होती. थोड्या वेळातच तिचा मुलगा शाळेतून येणार होता. त्याला भूक लागेल, तो आल्या आल्या जेवण मागेल ,म्हणून तिची काम आटोपण्याची घाई चालली होती. काम चालू असल्याने तिचे हात शेणामातीने कोपरापर्यंत माखले होते.

(बालकथा) तीर कमान

एके दिवशी एक उंचापुरा माणूस दरबारात आला. तो म्हणाला, "माझे नाव धर्मा आहे. तीर कमान चालवण्यात माझा हात कोणी धरणारा नाही. तुम्ही आज्ञा दिली, तर  मी माझी कला दाखवू शकतो."
 दुसर्‍या दिवशी धर्मा त्याच्या धनुर्विद्येचे प्रदर्शन करणार होता.  राजवाड्यासमोर विशाल मैदानात शामियाना उभारण्यात आला. राजा कृष्णदेवराय आणि दरबारी मंडळींसाठी खास आसनांची व्यवस्था केली गेली.

Friday, April 24, 2020

( बालकथा) धनुष्य कोणी तोडलं?

महाराज दशरथांनी राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा विवाह लावला.  ते खूप खूष होते.  पण त्यांना एक भीती सारखी सतावत होती.  स्वयंवर जिंकण्यासाठी रामने भगवान शंकरांचा दिव्य धनुष्य तोडला होता.  हा धनुष्य परशुरामला खूप प्रिय होता.  परशुराम धनुष्य तोडल्याबद्दल धमकी देईल हे त्यांना माहित होते.

Wednesday, April 22, 2020

पृथ्वी वाचली तर माणूस वाचेल

आज जगात स्थलप्रदूषण, वायुप्रदूषण व जलप्रदूषण मोठय़ा प्रमाणात होतांना दिसते. कारखान्याचा विस्तार जगातील सर्वच देशांनी वाढविला आहे. यामुळे पहिला प्रहार जंगलसंपत्तीवर झाला आहे. यामुळे आज पृथ्वी डगमगतांना दिसून येते. मानवाच्या अतिरेकामुळे पृथ्वीतलावरील भूकंप, अतिपाऊस, अतिउष्णता, अतिथंडी अशाप्रकारचे विनाशाकडे नेणार्‍या घटना दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे.  २१ व्या शतकात मानव इतका पुढे गेला आहे की अनेक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अत्याधुनिक शस्त्र बनविण्याच्या शर्यती लागलेल्या आहेत.

Saturday, April 11, 2020

लॉकडाऊनमधून बाहेर पडताना रणनीती आखायला हवी

देशाने लॉकडाऊन लवकर सुरू केल्याने कोरोना संसर्गाला काही प्रमाणात आळा बसला आहे. मात्र लॉकडाऊन दीर्घकाळ ठेवणे शक्य नाही. त्यामुळे लॉकडावूनमधून बाहेर पडताना नवी रणनीती आखणे गरजेचे आहे.महत्त्वाचे म्हणजे कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर देशात पुकारण्यात आलेले लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवले जायला हवे. लॉकडाऊन उठवल्यानंतर पुन्हा संसगार्चा धोका निर्माण होऊ नये म्हणून वेगवेगळ्या स्वरूपात 'सोशल डिस्टन्सिंग'चे पालन सुरूच ठेवायला हवे. अनेक विकसित राष्ट्रांपेक्षाही भारताने कोरोनाच्या साथीचा उत्तमरित्या सामना केला आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतरही संसर्गाच्या दृष्टीने 'हॉटस्पॉट' असलेले परिसर सील ठेवले जावेत. 

Friday, April 10, 2020

लॉकडाऊन हा दीर्घ कालीन उपाय असू शकत नाही


कोरोना विषाणू टाळण्यासाठी जगातील देशांकडून लॉक-डाऊन सारखे उपाय अवलंबले जात आहेत.  लॉक-डाऊनमुळे कोरोना विषाणूचा फैलाव रोखू शकतो. सध्याच्या घडीला कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात नियंत्रित झालाही आहे.  हे खरं आहे की जगाच्या कोणत्याही देशात कोरोना विषाणूपासून दूर होणारी औषधे तयार केली जात नाही तोपर्यंत लॉक-डाऊन किंवा कर्फ्यू हा एकमेव प्रभावी उपाय आहे.  परंतु केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या लॉक-डाऊन किंवा कर्फ्यूद्वारे कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्याचा कायम किंवा दीर्घकालीन मार्ग शक्य किंवा योग्य नाही.

Friday, April 3, 2020

दारिद्रयाशी लढा देऊन बनले डॉक्टर

 डॉ.अरुणोदय मंडल
सुंदरबन, आपल्या खारफुटी आणि वाघासाठी प्रसिद्ध असलेल्या पश्चिम बंगालमध्ये अलीकडेच एका डॉक्टरांच्या औदार्य आणि गरिबांची सेवा करण्यामुळे पुन्हा एकदा देश आणि जगातील वृत्तपत्रांचे  मथळे भरून वाहिले. त्या डॉक्टरांचे नाव आहे- अरुणोदय मंडल.  सुंदरबनमधील एका गरीब कुटुंबात जन्मलेले अरुणोदय हे सध्या कोलकाताच्या लेक टाउनमध्ये सध्या राहतात, परंतु त्यांचे  66 वर्षांचे जीवन अर्थपूर्ण जीवन जगण्याची इच्छा बाळगणाऱ्या आपणा  सर्वांसाठी एक प्रेरणादायक आहे.