एके दिवशी एक उंचापुरा माणूस दरबारात आला. तो म्हणाला, "माझे नाव धर्मा आहे. तीर कमान चालवण्यात माझा हात कोणी धरणारा नाही. तुम्ही आज्ञा दिली, तर मी माझी कला दाखवू शकतो."
दुसर्या दिवशी धर्मा त्याच्या धनुर्विद्येचे प्रदर्शन करणार होता. राजवाड्यासमोर विशाल मैदानात शामियाना उभारण्यात आला. राजा कृष्णदेवराय आणि दरबारी मंडळींसाठी खास आसनांची व्यवस्था केली गेली.
समोरच्या झाडावर पांढर्या रंगाची चांदीने बनवलेली सुंदर आणि चमकदार पाने टांगली गेली होती. तिरंदाज धर्मा त्यांना लक्ष्य करणार होता. त्याचा खेळ पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती.
धर्मा ठरलेल्या वेळी व्यासपीठावर हजर झाला. त्याने निशाणा साधत बाण सोडला. निशाणा एकदम अचूक लागला. चांदीचे पान आपल्या जागेवरून उडून अदृश्य झाले. अशाप्रकारे धर्माने दुसरे निशाण साधले.
त्याने एक एक करत सहा पानांवर अचूक निशाणा साधले आणि पाने गायब केली.
आता धर्माने आणखी एक बाण हातात घेतला. तो धनुष्यावर चढवला. आणि निशाणा साधू लागला. सगळेजण बाण सुटण्याची उत्कटतेने वाट पाहू लागले. आता सातवे पानही बाणाने छेदले जाईल, अशी सर्वांची खात्री होती. पण अचानक धर्मा पाठमोरी वळला आणि त्याने राजा कृष्णदेव रायवर निशाणा धरला. सगळे स्तब्ध! आता राजाचा जीव जाणार, हीच भीती उपस्थितांमध्ये बसली. पण तो बाण निशाणा साधणार तोच अचानक त्याच्यावर कोणाचा तरी हात पडला. धर्मा धनुष्य बाणासह खाली जमिनीवर कोसळला.
तो उठून पळ काढणार तोच पण विजयनगरच्या जागरुक सैनिकांनी त्याला जेरबंद केले. कळलं की, तो शत्रूचा गुप्तहेर होता. विजयनगरमध्ये गोंधळ माजवण्यासाठी आला होता.
राजाने धावत जाऊन तेनालीरामला मिठी मारली. राजा म्हणाला, "खरोखरच तेनालीराम, आज तू नसतीस तर ...!"
"महाराज, कसा नसणार?" तेनालीराम हसला आणि म्हणाला, " जिथे तुम्ही, तिथे तुमचा हा दास! मला कालच याची युक्ती कळाली होती. त्याच्या तंबू बाहेर फिरण्याच्या बहाण्याने येरझाऱ्या मारत होतो. त्याने आपल्या सहकाऱयांना जे सांगितले ते मी ऐकले होते आणि मग सगळी व्यवस्थाही केली."
प्रसन्न होऊन राजा कृष्णदेवरायने तेनालीरामला आपली हिऱ्याची अंगठी बहाल केली.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत
No comments:
Post a Comment