मांजराची फजिती
 एका मांजराची झाली फजिती
 कशी ओ, कशी ओ?
 ऐका, ध्यान देऊन घडली घटना
 अशी ओ, अशी ओ
 एक दिवस मांजराने  केला विचार
 पाहून येऊ पिक्चर
 तिकिटाशिवाय घुसला
गपचिप  सिनेमाघर
सिनेमा हॉलच्या पडद्यावर
 पाहिला खवा आणि पनीर
  झडप घातली पडद्यावर
 पडदा फाटला टर-टर-मच्छिंद्र ऐनापुरे, जत
उंदरीण राणी
 उंदरीण राणी खूप आनंदी
 उद्या आहे रविवार ,
 उंदरासोबत उद्या जाईल
 जंगल बाजार.
 दोन पैशांची साडी घेईल
 सहा आण्याचा हार
 चटपटीत घेऊन खाईल
 दही बातशे चार.
 मांजरी मावशीच्या दुकानातून
 बांधून घेईल पान
 दोन पान खाऊन नाचेल
 दाखवेल आपली शान -मच्छिंद्र ऐनापुरे, जत (सांगली)

No comments:
Post a Comment