महाराज दशरथांनी राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा विवाह लावला. ते खूप खूष होते. पण त्यांना एक भीती सारखी सतावत होती. स्वयंवर जिंकण्यासाठी रामने भगवान शंकरांचा दिव्य धनुष्य तोडला होता. हा धनुष्य परशुरामला खूप प्रिय होता. परशुराम धनुष्य तोडल्याबद्दल धमकी देईल हे त्यांना माहित होते.
आणि तेच घडलं. श्री रामांनी जनकपूरमध्ये भगवान शंकरांचा दिव्य धनुष्य तोडला आहे, ही बातमी कळताच परशुराम संतापले. आकाशमार्गे ते श्रीरामांना गाठले. परशुरामांच्या दोन्ही खांद्यांवर धनुष्य लटकावले होते. तर हातात तळपणारी कुराड होती.
महाराज दशरथाने त्यांना नमस्कार केला.परशुराम आशीर्वाद देऊन म्हणाले, "दशरथ, मी तुझ्या मुलाला- रामला भेटायला आलो आहे."
राम आपल्या भावांसोबत परशुरामांजवळ पोहोचला. परशुरामच्या पायाला स्पर्श करून सर्वजण शांतपणे उभे राहिले. रामाला पाहून परशुराम संतापले आणि म्हणाले, "तर तू राम आहेस! तू माझे गुरु भगवान शंकरांचा धनुष्य तोडला आहेस."
"महर्षि, जर मला आव्हान दिले गेले नसते तर मी धनुष्याला स्पर्शही केला नसता. यासाठी मी तुमची क्षमा मागतो." श्रीरामांनी हात जोडून उत्तर दिले.
"मला काही माहित नाही. तू माझ्या भगवान शिवचा धनुष्य तोडला आहेस. मी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. चल, माझ्याशी युद्ध कर." परशुरामांनी कुराड उगारत आव्हान दिले.
लक्ष्मण गरम स्वभावाचा होता तो म्हणाला, "जनकजींनी आव्हान दिले नसते तर दादाने धनुष्य तोडला नसता. तुम्हाला युद्धच करायचे असेल तर ते जनकजींशी करा."
परशुराम लक्ष्मणवर झडप घालणार तोच श्रीराम मधे आले. ते आपले हात जोडून म्हणाले, "महाराज, तुम्ही एक पूजनीय आणि तपस्वी ब्राह्मण आहात. मी ब्राह्मणांचा सेवक आहे. मी तुमच्याशी लढा देण्याचे धाडस कसे करू शकतो?"
परशुराम रागाने पुढे सरकले. पण अचानक त्यांची दृष्टी श्रीरामच्या छातीवर पडली. छातीवरील भृगुपद चिन्ह पाहून त्यांना धक्का बसला. त्यांच्या लक्षात आले, महर्षी भृगु यांचे चिन्ह फक्त नारायणाच्या छातीवर असायला हवे.
परशुराम समजून चुकले की भगवान शंकरांचा धनुष्य तोडणारी ही कोणी सामान्य व्यक्ती नाही. त्यांनी रामाकडे काळजीपूर्वक पाहिले. वाटले जणू, साक्षात नारायण उभे आहेत. परशुरामांनी आपली शंका दूर करण्यासाठी आपल्या खांद्यावरून धनुष्य उतरवले. मग ते श्रीरामाला म्हणाले, "तुम्ही याची प्रत्यंचा (दोरी) चढवू शकता का? " त्यांना माहीत होतं की, भगवान विष्णूकडून दिलेल्या धनुष्याची प्रत्यंचा केवळ स्वतः नारायणच चढवू शकतात."
"मी प्रयत्न करतो." असे म्हणत रामने धनुष्य घेतले. त्याने लगेच धनुष्यावर बाण ठेवला आणि प्रत्यंचा ओढला. परशुरामला धक्काच बसला. श्री राम म्हणजे साक्षात नारायण आहेत, याची त्यांना खात्री पटली.
श्रीराम परशुरामांचा अहंकार दूर करण्यासाठी म्हणाले, "महर्षि, मी आधीच धनुष्यावर बाण ठेवला आहे तेव्हा, मला याचा कुणावर तरी वापर करावा लागेल. तू म्हणतोस तर, तुझ्या उडण्याची शक्ती नष्ट करू का?"
परशुरामच्या डोळ्यात अश्रू आले. ते खजील झाले. ते नम्रपणे म्हणाले, "स्वामी, मला क्षमा करा. मी माझी शक्ती तीर्थक्षेत्राच्या भेटीसाठी वापरतो. मी तुमचा भक्त आहे. तुम्हाला मला जी शिक्षा करायची ती करा." परशुराम भगवान श्री रामांची प्रार्थना करू लागले.
श्रीराम पुढे सारसावले. त्याने परशुरामांना आलिंगन दिले. परशुरामच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहू लागले. (शिव पुराण)
No comments:
Post a Comment