Friday, September 28, 2012

'बंद'ची व्याख्या बदलतेय! भाग 2

     बंदच्या यशापयशाच्या दाव्या-प्रतिदाव्यात काँग्रेस व विरोधक दंग असले तरी यातल्या जनसहभागाचा, न सहभागाचा फारसा विचार केला जाणार नाही. त्याचे आकलन केले जाणार नाही. पण रिटेल व्यापारात परदेशी गुंतवणूक झाल्यास भारतातल्या व्यापारावर त्याचा विपरीत परिणाम होईल, या भीतीने व्यापारी संघटनांनी मात्र बंदला साथ दिल्याचे दिसते. त्यामुळे दुकाने बंद राहिली. वास्तविक राजकीय दिशेमुळे बंद किंवा हरताळ निश्चित होत नाहीत. ते दुसर्‍याच पातळीवर ठरतात. बंद यशस्वी होण्याला कारणेही स्थानिक पातळीवरची असतात.

     सध्या केंद्रीय पातळीवर राजकीय चित्र कमालीचे अनिश्चित आहे. काय घडेल याची कुणीच खात्री देऊ शकत नाही. डिझेल, गॅस व एफडीआय लागू करण्याच्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारला समर्थन देणार्‍या ममता बॅनर्जीनी पाठिंबा काढून घेतला आहे, पण ममतांच्या बाहेर पडण्याने काँग्रेस आघाडीचे काही बिघडणार नाही हे स्पष्ट आहे. मात्र खरी मदार मुलायमसिंग यादवांच्या 'सपा' आणि मायावतींच्या 'बसपा'वर अवलंबून आहे. तूर्तास सपाचा केंद्राला बाहेरून पाठिंबा आहे, तर मायावतीही आपले पत्ते 10 ऑक्टोबर रोजी खोलणार आहेत. मुलायमसिंग यादव कमालीचे चतूर आहेत. लालकृष्ण अडवाणी यांनी या पुढचा पंतप्रधान आघाडीचा असणार आहे, असे म्हटल्यापासून मुलायमसिंग यांची इच्छा उफाळून आली आहे. सर्वाधिक संख्येने खासदार असलेल्या उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या वाटय़ाला 40 जागा आल्यास आघाडीच्या कडबोळ्य़ात पंतप्रधानपदाची माळ त्यांच्या गळ्य़ात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते अगदी सावधपणे कुणालाही न दुखवता राजकीय गणित मांडण्याच्या कामाला लागले आहेत. त्यामुळेच त्यांचा 'वेट अँण्ड वॉच'चा पवित्रा आहे. आज जरी ते काँग्रेससोबत असले तरी निवडणुकीत किंवा निवडणुकीत त्यांच्यासोबत राहतील असे नाही. मात्र त्यांनी काँग्रेस विरोधकांनाही दुखवायचे नाही, असे ठरवले आहे. काँग्रेसचा लाभ तर घ्यायचा आणि उत्तर प्रदेशात जास्तीत जास्त जागा आणायच्या यावर मात्र त्यांचा भरवसा असल्याने आपले मन साशंकता निर्माण करणारेच ठेवायचे असा त्यांचा पवित्रा आहे. सध्या ते तिच भूमिका पार पाडत आहेत.

     महागाई, भ्रष्टाचार यामुळे जनता काँग्रेसविरोधात असली तरी त्याचा उचित लाभ भाजपाला घेता येईना. तिकडे तिसर्‍या आघाडीची मोट बांधण्याचे धाटत असले तरी तिथे मुलायमसिंह यादवांचीच प्रतीक्षा अधिक आहे. पण ते तर 'वेट अँण्ड वॉच'च्या भूमिकेत आहेत. त्यामुळे तिसर्‍या आघाडीची घडी बसते का? की विस्कटते याचा अंदाज बांधणे सध्यातरी शक्य नाही. भाजपा उसळी मारण्याच्या प्रयत्नात आहे. पण त्यात ताकदच उरली नाही. त्यांच्यातल्या अंतर्गत वादामुळे ताकद क्षीण झाली आहे. भाजपाचा पंतप्रधानी चेहरा 'मोदीं'ना दाखवण्यावरून तिथे घमासान आहेच, पण एनडीएच्या घटक पक्षांनाही मोदींचा पंतप्रधानी चेहरा नको आहे. सध्या भाजपाच विस्कटलेली असल्याने त्यांना आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेता येईनासा झाला आहे. म्हणजे काँग्रेस आघाडी सरकारला जनता विटली असली तरी त्यांची जागा घ्यायला सक्षम पक्ष-आघाडी कोणीच नाही. अशा अवस्थेत मध्यावधी निवडणुका कोणाला हव्या आहेत. कारण भाजपाही पूर्ण क्षमतेने निवडणुकीला तयार नाही. या सगळ्य़ाचा अंदाज घेऊनच कदाचित काँग्रेस आघाडीने आर्थिक विकास धोरणांचे पत्ते फेकले असावेत, अन्यथा चारी बाजूंनी घेरलेल्या या पक्षात एवढी ताठरता, खंबीरपणा कसा आला, हे न उमजणारे कोडे आहे. बंद, हरताळपासून सामान्यजन लांब होत चालला आहे. यात त्यांचेच नुकसान आहे. त्याला महागाई, भ्रष्टाचार याची प्रचंड चीड आहे. पण ती व्यक्त करण्यासाठी वेळ नाही किंवा हवा तसा प्लॅटफॉर्म नाही. त्यामुळे भाजपाला बंद वगैरेच्या मागे न लागता सामान्यजनांना आपलेसे करताना त्यांना त्रास होणार नाही, त्यांची गाडी सुटणार नाही, असे काही हिताचे निर्णय घ्यावे लागतील.

Thursday, September 27, 2012

'बंद'ची व्याख्या बदलतेय!

भाग 1
     केंद्र सरकारच्या आर्थिक सुधारणांच्या निर्णयांविरुद्ध बिगर काँग्रेस पक्षांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला तसा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तिथे तर बंदचा अक्षरश: फज्जा उडाला, तर ज्या राज्यांमध्ये भाजपासह काँग्रेसविरोधी पक्षांची सत्ता आहे, तिथे मात्र बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. बिहार, उत्तर प्रदेशात तो कमालीचा यशस्वी झाला. याचा अर्थ आता 'बंद'सुद्धा लोकांच्या समर्थनावर नव्हे, तर राजकीय ताकदीवर अवलंबून राहू लागला आहे. मुळात सर्वसामान्यांना बंद वगैरेमध्ये अजिबात रस नाही. बंद पुकारण्यामागील कारण सर्वसामान्यांचे हित असले, तरी या बंदमुळे नुकसानही होते सामान्यांचेच! राजकीय लोकांना काय किंवा पक्षांना काय, बातम्यांमध्ये किंवा टीव्हीवर झळकायला मिळते इतकेच! यापुढे सर्वसामान्यांशी त्यांचे काही देणे-घेणे नसते. सत्ता मिळवणे आणि सत्तेचे लुप्त उठवणे, ही आता राजकीय पक्षांची फॅशन झाली आहे. देश, समाज विकास या केवळ गप्पागोष्टी झाल्या आहेत. नाहीत, तर कोळसा खाणी वाटपावरून पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा राजीनामा घेण्यासाठी भाजपाने काँग्रेसचे चर्चेचे प्रस्तावही फेटाळून संसदसुद्धा चालू दिली नाही. त्यामुळे देशहिताचे निर्णय पेंडिंग पडले. काँग्रेसही मुर्दाडपणे आपलाच हेका चालवत राहिली.
       वास्तविक या कोळसा खाणवाटपाची सीबीआय चौकशी सुरू झाली आहे. उशिराने का होईना यात अडकलेले मोठमोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे, पण भाजपाने संसद अडवून काय साध्य केले हे मात्र कळू शकले नाही. संसद चालली नाही तरी देश चालत राहिला. आता डिझेल, गॅस आणि एफडीआयच्या विरोधात भाजपाने 'भारत बंद'ची हाक दिली. पण त्यांच्या राज्याव्यतिरिक्त अन्य कुठे भारत ठप्प झाला नाही. त्यामुळे भाजपा पुन्हा एकदा बॅकफूटवर गेला आहे. काँग्रेस आघाडी सरकारने या बंदच्या काळात 'एफडीआय'संबंधी अधिसूचना काढून उलट भाजपाला झटका दिला. हा राजकीय खेळ चालवला असताना प्रत्यक्षात जनता इथे कुठेच नाही. जनता आपल्या रोजीरोटीसाठी धावाधाव करते आहे.

     'बंद' वगैरेसारख्या घटना म्हणजे सामान्य लोकांना 'मुसिबत'च ठरतात. यामुळे तोच अडचणीत येतो आणि सापडतो. आर्थिक फटकाही त्यालाच बसतो. ज्याच्यासाठी बंद पुकारायचा, त्यालाच वेठीस धरण्याचा प्रकार सामान्यांना कसा रुचणार बरे! रेल्वे किंवा सार्वजनिक परिवहन सेवा ठप्प झाल्याने गोची होते ती सर्वसामान्यांची! त्यामुळे सामान्यांना असल्या गोष्टीत अजिबात रस नाही. आजच्या घडीला रेल्वे असो अथवा परिवहन मंडळाच्या व्यवस्थेची तर्‍हा राजकारण्यांमुळे फारच विचित्र झाली आहे. त्याच्या तोटय़ांचा आकडा फुगतच चालला आहे. त्यामुळे मुसिबत ठरलेल्या व्यवस्था टाळण्याचा मध्यमवर्गीयांचा प्रयत्न अधिक दिसतो. स्वत:च्या वाहनाने प्रवास करण्यावर त्यांचा अधिक भर दिसतो. पण या व्यवस्थेशिवाय सामान्यांचे काहीच चालत नाही. मग ही माणसे 'बंद'च्या समर्थनासाठी कशाला रस्त्यावर उतरतील. पण राजकीय पक्षांचा बंद त्यांच्याच नावावर पुकारला जातो, हा मोठा विनोद आहे असे म्हणावे लागेल.

     सामान्यजनांची भूमिका बदलत चालली आहे. याला अनेक कारणे असली तरी सामान्यांना बंदबाबत अजिबात रस नाही, हे खरे आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील डावे पक्ष सत्तेवरून पायउतार होत असताना शेवटी-शेवटी बंदच्या विरोधात गेले होते. डाव्यांपेक्षा लोकांना लुभावणार्‍या गोष्टी करण्यात आघाडीवर असणार्‍या ममता बॅनर्जीही रॅली, बंदच्या विरोधातच आहेत, पण कालच्या 'बंद'दरम्यान डाव्या आघाडीने पुन्हा आपला रोख बदलला आहे आणि बंदला पाठिंबा दिलाच, नव्हे त्यासाठी आव्हानही केले. परंतु इथे लोकांनी ममता बॅनर्जीनाच साथ दिली आणि बंद धुडकावून लावला.


पुण्यनगरी, कोल्हापूर, नाशिक, नागपूर

Tuesday, September 25, 2012

दुष्काळ, महागाई हटू दे, बाप्पा!

     अधिक मासामुळे तू यंदा उशिरा आलास, पण भक्तांचं तुझ्यावरचं प्रेम कमी झालं असा याचा अर्थ नव्हे देवा. ते तुझी वाट पाहतच होते. तू केव्हा येणार याची हुरहूर होतीच.
पण बाप्पा, तुला निरोप देताना मात्र आमची मोठी पंचाईत झालीय. पाऊस नाही. त्यामुळं पाणी नाही. दुष्काळी भागात सरकारनं टँकर सुरू केलेत पण त्यात टँकरवाला खेपा खातोय. पाण्यासाठी आमचे मात्र हाल होतायेत. आता तुला निरोप द्यायचा म्हणजे पाणी पाहिजे. पण पाणीच नाही तर तुला निरोप कसा द्यायचा. पण  बाप्पा, काळजी करू नकोस. तुला इथंच ठेऊन घेत नाही. बादलीत, काहिलीत तुझे विसर्जन करू. पण तुला तुझ्या घरी पाठवू. नाही तर पार्वतीअम्मा रागं करील. शंभो तर आम्हाला जाळून राख करील. पण बाप्पा जाताना वरुणराजाला बरसायला सांगायला विसरू नका. पावसाशिवाय आम्ही कल्पनाच करू शकत नाही.

     बाप्पा, वातावरण कसं आहेतुला ठाऊकच आहे. पेट्रोल, डिझेल, सिलिंडर सगळं कसं महाग झालं आहे. इतकंच काय तर तुझ्या आवडीचे मोदकही महागले. तुला खायला देताना आमची पार वाताहत झाली. पण बाप्पा, आम्ही पाहुणचारात कधीच कमी पडलो नाही, आणि पडणारही नाही. भारतीय संस्कृतीची महती तुला काय सांगावी लागते.
     पण आता सारं अवघड झालंय. मासिक बजेटचा पार 'भाजीपाला' झालाय. भाजीपाल्यामुळं आठवलं ! दुष्काळामुळं भाजीपालासुद्धा गायब झालाय. डॉक्टर म्हणतात, भाजीपाला का. आजार-बिजार होणार नाही. पण बाप्पा, आडातच नाही तर पोहर्‍यात कोठून येणार? तिकडे वाहतूक खर्च वाढला अन् सगळं महागलं.  विघ्नहर्त्या, तुला वाहण्यात येणारी फुलं अन् दुर्वाही महागल्या. कसं होणार रे सर्वसामान्यांचं
     मर्यादित सिलिंडरच्या निर्णयामुळे मध्यमवर्गीयांनी धसकाच घेतलाय. घरात सात-आठ माणसं असतील तर कसं जाणार रे, एक सिलिंडर दोन महिने.  वर्षाला सहा सिलिंडर.. कसं होणार एकदंता ? वर्षाला १२ सिलिंडर देण्याची सद्बुद्धी सरकारला दे गणनायका. सर्वच तुझ्याकडे डोळे लावून बसले आहेत. सरकारला निर्णय फिरवू दे गौरीपुत्रा !
रंग, वाहतूक महाग झाल्यानं मूर्तीच्या किमती वाढल्या, तरीही निस्सीम भावनेनं सर्वांनी तुझी आराधना केली. ही साधना-ही भावना तू स्वीकारशीलच. आता तू म्हणशील एवढं सगळं होतंय नी तुम्ही गप्प कसे? करतो आम्ही कधी-कधी 'बंद'. फुटतो आमच्याही भावनेचा बांध नि बिच्चार्‍या एसटीवर भिरकावली जातात दगडं. यात नुकसान होतं आमचंच. पण बाप्पा,  'बंद'मुळं आम्हा सामान्यांनाच आर्थिक झळ बसते. आम्ही आमचा सगळा राग  एसटीवर काढतो. तीही आमचीच. आमच्या करातूनच तिची दुरुस्ती होते. कात्री शेवटी आमच्याच खिशाला लागते. त्यामुळं बंद, निदर्शनं आमच्या हिताची नाहीत.  याचीही जाण ठेवण्याची बुद्धी संबंधितांना दे रे बाप्पा!  तेवढं पाण्याचं बघ, बाबा! पाण्यावाचून आमचं, आमच्या जित्रापांचं फार हाल चाललेत. परतीच्या मान्सूनमध्ये तरी पाऊस पेर बाप्पा. आणि महागाईच समूळ नष्ट करून, गरिबाला दोन वेळचं पोटभर अन्न आणि पाणी मिळू दे गणनायका !                        .                                                                                                               
 

Thursday, September 20, 2012

AmUr~mUrMm AmYmañV§^ hmo_JmS>©Mr Cnoj

m
     JUoemoËgd Agmo AWdm AÝ` gU -CËgd . nmo{bgm§~amo~a ~§Xmo~ñVmÀ`m doiobm Amnë`mbm AmUIr H$mhr dXuYmar _mUgo ^oQ>VmV, Vr åhUOo hmo_JmS>©g. AmUr~mUrÀ`m H$mimV hr _mUgo nmo{bgm§À`m _XVrbm YmdyZ `oVmV. H$m`Xm d gwì`dñWm A~m{YV amIÊ`mgmR>r AhmoamÌ PQ>Umè`m  `m hmo_JmS>© (J¥hajH$ Xb) g§KQ>ZoH$S>o _mÌ Eadr Hw$Ur nmhmV Zmhr. emgZhr Ë`m§À`mH$S>o Xþb©j H$aV Amho. Ago Agbo Var Ë`m§Mo ho AmUr~mUrVbo Ë`m§Mo `moJXmZ AÝ` `wdH$m§Zm àoaUmXm`r Amho. H$maU hr _§S>ir XoegodogmR>r Amnbo Zoh_rMo H$m_, àm§n{MH$ AS>Mur  ~mOybm gmoSy>Z emgZmÀ`m _XVrbm YmdyZ `oVmV. Ë`m§À`m H$m`m©H$S>o Ago Xþb©j H$ê$Z MmbUma Zmhr.
     VQ>nw§Á`m _mZYZmda hr _§S>ir Xoegodm, H$m`Xm d gwì`dñWMo, gmd©O{ZH$ _mb_ÎmoMo VgoM {d{dY gU - CËgd, {ZdS>UwH$m§_Ü`o  Amnbo H$V©ì` ~OmdVmV. Ë`m§Zm am̧{Xdg nhmam Úmdm bmJVmo. Aem `m hmo_JmS>©gMr n{hbr g§KQ>Zm 6 {S>g|~a 1946 _Ü`o ñWmnZ Pmbr. 66 dfmªnydu bmdÊ`mV Amboë`m `m Bdë`mem amonQ>çmMo énm§Va AmVm _moR>çm dQ>d¥jmV Pmbo Amho. hmo_JmS©  OdmZm§Zm AnmXJ«ñV (nya, Z¡g{J©H$ AmnÎmr) , {d_moMZ, A{¾e_Z, {Z: eó `wÕ, àW_monMma, Jmoir~ma, bmR>r_ma `mgmaIo AË`mdí`H$ gd© à{ejU XoÊ`mV `oVo. `mMr gmo` _w§~BVë`m KmQ>H$mona `oWrb _Ü`dVu à{ejU H|$ÐmV H$aÊ`mV `oVo. {edm` àË`oH$ dfu COiUr à{ejU {e~ra OdmZm§Zm XoÊ`mV `oVo. Ë`mMr gmo` Ë`m Ë`m {OëømÀ`m {R>H$mUr H$aÊ`mV `oVo. `mVyZ OdmZm§Zm AË`mYw{ZH$ amhÊ`mMm n[anmR> {_iV amhVmo.
     A{bH$S>o `m g§KQ>ZoV _moR>çm à_mUmV ~oamoOJma `wdH$ -`wdVr gm{_b hmoV AmhoV. H$mhrOU `mVyZM gamd H$ê$Z nmo{bg ^aVr hmoVmZm {XgV AmhoV. hmo_JmS>© hr godm Ë`mgmR>r Mm§Jbm n`m©` åhUyZ nwT>o Ambm Amho. gÜ`m H$V©ì`mda Agboë`m ehar OdmZm§Zm 150 én`o Am{U 50 én`o Cnhma^Îmm Agm EHy$U 200 én`m§Mm ^Îmm åhUOo _mZYZ {_iVo. J«m_rU ^mJmVrb OdmZm§Zm 150 én`o Am{U 125 én`o Cnhma ^Îmm Ago 275 én`m§Mo _mZYZ {_iVo. _mÌ ~§Xmo~ñV ZgVmo, Voìhm hr _§S>ir Amnbm ImgJr H$mhr Var ì`dgm` H$ê$Z Amnbm Am{U Amnë`m Hw$Qw>§~mMm CXa{Zdm©h H$aVmV. ~§Xmo~ñVmdoir Ë`m§Zm Amnbo ImgJr H$m_ ~mOybm gmoS>mdo bmJVo. EoZdoir Ho$ìhmhr ~mobmdUo `oV Agë`mZo ì`mnmar, CÚmoOH$ AWdm AÝ` ImgJr _mbH$ Ë`m§Zm H$m_mda R>odV ZmhrV. Varhr hr _mUgo Ë`mMr ndm© Z H$aVm Amnbo H$m_ MmoI nma nmS>rV AgVmV. na§Vw, `m _hmJmBÀ`m H$mimV gm_mÝ` _mUgm§~amo~aM hmo_JmS>©hr hmoaniyZ {ZKV Amho. Ë`mbm _moR>çm à_mUmV _hmJmBbm Vm|S> Úmdo bmJV Amho. Aem n[apñWVrV emgZmbm Ë`m§Mr X`m `m`bm hdr Amho. Iao Va AmUr~mUrÀ`m doiobm emgZmMm AmYmañV§^ åhUyZ hmo_JmS>©H$S>o nm{hbo OmVo, Ë`m§Mm CËgmh dmT>{dÊ`mgmaIo H$m_ emgZmZo H$aÊ`mMr Amdí`H$Vm Amho. emgZmZo Ë`m§Mo _mZYZ dmT>dbo nm{hOo.
     Ë`mM~amo~a emgZmZo nmo{bg ^aVrdoir d BVa R>am{dH$ {R>H$mUr hmo_JmS>©_Ü`o g§KQ>ZoV  gbJ  VrZ df} `eñdr[aË`m H$m_ Ho$boë`m OdmZm§Zm Ë`m Ë`m joÌmVrb AQ>r d {Z`_mZwgma 5 Q>¸o$ AmajU {Xbo Amho. ho Iao Va Ë`m§À`m g§KQ>ZoÀ`m àm_m{UH$ XoegodoMo \$i Amho. AmVm hmo_JmS>© ñd`§godH$ åhUyZ H$m_ H$aUmè`m `wdH$m§Zm e¡j{UH$ AQ> Xhmdr CÎmrU© Ho$br Jobr Amho. AJmoXa Vr AmR>dr nmg Aer hmoVr. XhmdrMr AQ> KmVbr Joë`mZo Ë`m§Mm gaH$mar godoV emgZmbm Cn`moJ hmoD$ eH$Vmo. `mMm {dMma emgZmZo {dMma H$aÊ`mMr Amdí`H$Vm Amho. emgZmZo Ë`m§À`m {Z:ñn¥h godoMo \${bV Úm`bm hdo.  Ë`m§À`m OrdZmV ñW¡`© `m`bm hdo, BVH$sM Anojm Amho.                                                 

Wednesday, September 19, 2012

प्रचंड ऊर्जेचं गावः रावळगुंडवाडी

     दुष्काळी जत तालुक्यातलं रावळगुंडवाडी गाव सध्या राज्यात झळकतं आहे. याच वर्षी मे महिन्यात गावाला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात राज्यात पहिला क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. याअगोदर गावाने स्वच्छता अभियान, यशवंत पंचायत, तंटामुक्त अभियान, आमच्या गावात आम्ही सरकार, निर्मल ग्राम अशा अनेक योजनांची तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्य स्तरावरची बक्षीसं पटकावली आहेत. गाव नवनव्या योजना राबवायला अजिबात थकत नाही की दमत नाही. गेली सात- आठ वर्षे हे गाव 'सिस्टिमेटिकली' चाललं आहे. इथे कुणाच्यात थकवा दिसत नाही. दमणं जाणवत नाही. गाव अविरत राबतंय. प्रचंड ऊर्जा असलेलं गाव प्रगतीची एक एक शिखरे पादाक्रांत करत आहे. प्रचंड क्रयशक्ती, बक्षीसं यामुळे गावात विकासाची गंगा वाहते आहे. 'स्वावलंबनाचा पाठ' देणारे हे गाव खर्‍या अर्थानं महात्मा गांधीजींच्या स्वप्नातला गाव ठरला आहे. सध्या ऐन पावसाळ्यात जत तालुका दुष्काळाने होरपळत आहे. गावे तहानली आहेत. शेती उद्वस्त झाली आहे, असे असताना रावळगुंडवाडी मात्र दुष्काळातले 'ओआसिस' ठरले आहे. शिवकालीन पाणी साठवण योजनेमुळं गाव हिरवाईने नटले आहे. लोकांच्या ऊशाला पाणी आहे.
     आठ वर्षातला गावाचा कायापालट चकीत करणारा, थक्क करणारा आहे. गाव तसं शांततेचं भोक्तं आहे. गावातला भांडणतंटा आजपावेतो कधी पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला नाही. गावातला तंटा गावातच सोडवला जायचा आणि आजही सोडवला जातोय. इतकंच नव्हे तर ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून म्हणजे १९६६ पासून गावात कधी निवडणुका झाल्या नाहीत. एकोप्याने गावाचा राज्यकारभार चालला. गावातल्या ग्रामदैवत श्री. महादेवाचे कृपेनं आजही कसं सारं गुण्यागोविंदानं आणि आनंदानं चाललं आहे. म्हणून तर इथली सोसायटी असो किंवा शिक्षण संस्था श्री. महादेवाच्या नावानंच चालल्या आहेत.  असं हे गाव २००४- ०५ पूर्वी मात्र इतर गावांप्रमाणे दुष्काळाला, पाणी टंचाईला तोंड देत होतं. सांगली जिल्ह्यातल्या पूर्वेकडेच्या टोकाला असलेल्या जत तालुक्यावर सदा निसर्गाची अवकृपा राहिली नाही. दुष्काळी पाचवीला पुजलेला. त्यात राजकारण्यांनीही तालुक्यातल्या जनतेला आश्वासनाच्या हिंदोळ्यावर झुलवत ठेवलं. कृष्णेच्या पाण्याची आस लागून राहिलेल्या लोकांना केवळ पाण्याचा मृगजळच दाखवला. त्यामुळे इतर गावांप्रमाणे ऐन उन्हाळ्यात गावाला पाण्याचा टँकर लावलेला असायचा. नेमकी हीच नस पकडून नवख्या ग्रामसेवक कामेश्वर ऐवळे यांनी २००४-०५ मध्ये गावातल्या सरकारी इमारतींवर शिवकालीन पाणी साठवण योजना राबवली. ८० हजाराचा हा प्रकल्प गावातल्या शाळा, ग्रामपंचायत, मंदिर यांच्या इमारतींवर पडणारे पावसाचे पाणी अडवून गावाला पाणी पुरवठा करणार्‍या विहिर आणि हातपंपांच्या पायथ्याशी सोडून दिले. याचा परिणाम असा झाला की, गावाला २००५-०६ मध्ये पाण्याचा टँकरच लावावा लागला नाही. तेव्हापासून २००९-१० पर्यंत गावाला पाणी कधीच कमी पडले नाही. केवळ चार सरकारी इमारतींवरील पडणार्‍या पावसाच्या पाण्याची अडवणूक करून ही किमया साध्य झाली होती. पण या जोरावर दरम्यानच्या काळात गावाने विकासाची घोडदौड सुरू केली. अनेक योजना गावात साकारल्या. बक्षिसांची खैरात झाली.
     २००६-०७ मध्ये निर्मल ग्राम यशस्वी करून दाखवून २ लाखाचे बक्षीस मिळवले. याच काळात जलस्वराज्य योजनेत गावात पाण्याची टाकी आणि जलवाहिनीचे काम पूर्ण झाले. २००८-०९ मध्ये 'आमच्या गावात आम्हीच सरकार' ही योजना आली. यातून गावाने १० लाखाचे बक्षीस पटकावले. यातून ग्रामपंचायत सक्षमीकरणाच्या हेतूने ट्रॅक्टर खरेदी केला. १७ ठिकाणी सौरऊर्जेची पथदिवे उभारली गेली. महादेव मंदिरात २४ तास वीज उपलब्ध करून देण्यात आली. यातून सण्-उत्सवाला बहार आला तर गावातल्या शाळकरी मुलांना रात्रीच्या अभ्यासिकेची मोठी सोय झाली.
     विविध विकास योजनांमध्ये हिरीरीने सहभाग घेतानाच बक्षीस पटकवायचेच, ही जिद्द, ईर्षा ऊरात ठेवली. माणसे अविरत काम करत राहिली. भांडण तंट्यांपासून अलिप्त असलेल्या गावाला २००८-०९ मध्ये तंटामुक्त अभियानातून २ लाखाचे बक्षीस मिळाले. यातून गावातले रस्ते, गटारी व अन्य सोयी करत गावाचा कायाकल्प चालला असताना गाव हिरवाईचा शालू नेसून नटलेल्या नवरीसमान दिसू लागले. गावाचा विस्तार, लोकसंख्या वाढ म्हणा किंवा गावाला 'ग्रीन टच' देण्याच्या प्रयत्नात गावाला पाणी कमी पडू लागले. मधल्या काळात आर्थिक, सामाजिक सुबत्तेकडे वाटचाल सुरूच होती. त्यामुळे पाण्याच्या वाढत्या गरजेकडे दुर्लक्षच झाले. पण २००९-१० मध्ये गावाला भीषण पाणी टंचाईची झळ बसली तेव्हा गावाचे त्याकडे लक्ष गेले. पुन्हा सगळे पाण्यासाठी काही करण्याचा बेत करू लागले. तेव्हा २००४-०५ मध्ये राबवण्यात आलेला शिवकालीन पाणी साठवण प्रकल्प संपूर्ण गावासाठी राबवण्याची योजना आखली गेली. आणि गावातल्या प्रत्येक घरावर पडणारे पावसाचे पाणी अडवण्याचा प्रकल्प २०१०-११ ला प्रत्यक्षात साकार झाला. सगळ्या घरांवर पाणी अडवून ते पाईपलाईनद्वारा गावातल्या विहिर, कुपनलिकेच्या जवळ भूगर्भात सोडण्यात आले. कुपनलिकेजवळ दहा बाय दहा फुटाचे खड्डे काढून त्यात शोषपद्धतीने पाणी सोडणे आणि शुद्ध पाणी उचलणे असा प्रकल्प राबवला गेला. यासाठी १३ लाखाचा निधी खर्ची पडला. सरकार द्यायला दमत नाही आणि गावही घ्यायला कचरत नाही, असे चित्र राज्यात केवळ रावळगुंडवाडीत पाहायला मिळते. आता त्यामुळे गावाला पाणी कमी पडत नाही. विहिरी आणि कुपनलिकांना पाणी वरच्या पातळीवरच मिळते आहे. तालुक्यात पाण्याचा दुष्काळ आहे. १२० पैकी ९० टक्के गावे टँकरच्या पाण्यावर जगताहेत. तर काही गावातल्या लोकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. पण रावळगुंडवाडी मात्र या कटकटीतून मुक्त आहे. केवळ पावसाचे पाणी अडवल्याने आणि ते मुरवल्याने ही किमया घडली आहे.  गावाची लोकसंख्या २ हजार ३१० आहे. गावासह वाड्यावस्त्यांवर नऊ कुपनलिका आहेत. एक विहिर आणि एक आड आहे. या सगळ्यांजवळ पावसाचे पाणी सोडण्यात आले आहे.
     गाव शंभर टक्के शौचालये आहेत. रस्ते चकचकीत आहेत. सध्या गाव 'इको- व्हिलेज' मध्ये आहे. गाव आणि गावाभोवतीचा परिसर हिरवाईने नटला आहे. सांडपाण्याच्या निचर्‍यातून बागा फुलवण्यात आल्या आहेत.  गावातील रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड, सांडपाण्यावर परसबागकचऱ्यापासून खत निर्मिती आणि गावांत सतरा ठिकाणी सौरउर्जा दिवे उभारण्यात आलेत. ग्रामविकासाच्या या कामांमुळे या गावाला अनेक बक्षिसांची अक्षरशः लयलूट केली आहे.  दारूबंदी आणि व्यसनमुक्त असलेल्या या गावानं आठ उताऱ्यात पती -पत्नीची संयुक्त नोंद केलीय.
     जलसंधारणाच्या कामांमुळे रावळगुंडवाडी गावातील शेतीही संमृद्ध आहे. १८७३ हेक्टर क्षेत्रफळ असणाऱ्या या गावात शाश्वत पाण्याची सोय झाल्यानं ९३ हेक्टरवर फळबागा उभ्या आहेत. शेततळ्यामुळे शेती पिकली आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तरही उंचावलाय. या गावात १९ बचत गट आहेत. बचत गटांमुळे विकासाच्या कामाला जास्त गती मिळालीय.
     दुष्काळातल्या वाळवंटातला हा ओआसिस आता पर्यटकांच्या आकर्षणाचाही केंद्रबिंदू ठरला आहे. यशवंत पंचायत आणि ग्रामस्वच्छता अभियानात विभागीय स्तरावर प्रथम क्रमांकाची धडक मारून आलेल्या या गावाने याच वर्षी स्वच्छता अभियानात राज्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. गावाच्या प्रचंड ऊर्जेची आणि सातत्यपणाची ही पावतीच म्हणावी लागेल. खरे तर अनेक गावे बक्षीसं घेऊन फुल मुरझावे तसे मुरझून गेली पण या गावाने प्रत्येक बक्षीसामागे नवी ऊर्जा धारण केली. आणि नव्या कामाला लागत गेले. गावाला मिळालेलं यश इथल्या लोकांच्या प्रचंड ऊर्जेत आहे, असे खात्रीने म्हणावे लागेल.                                                                                                            - मच्छिंद्र ऐनापुरे, जत 

बालकथा नरकाचा दरवाजा

एकदा एका सैनिकाला वाट्लं, स्वर्ग आणि नर्क यातला फरक जाणून घ्यावा. तो एका सत्पुरूषाकडे गेला. त्यानं त्यांना विचारलं," बाबा, स्वर्ग -नर्क म्हणतात, ते वास्तवात खरंय का निव्वळ कल्पनांचा खेळ आहे." सत्पुरुषानं विचारलं,'' तू काय करतोस?'' सैनिकाने आपल्या कामासंबंधी माहिती दिली. सत्पुरूष मग त्याला झिडकारत म्हणाला," तू, आणि सैनिक? शक्यच नाही. तुला सैनिक कोण म्हणेल? तू तर मुलखाचा भित्रा दिसतो आहेस. आणि ते तुझ्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसतं आहे."
      सत्पुरुषाकडून आपला झालेला अपमान सैनिकाच्या जिव्हारी बसला.  त्याचे पित्त खवळले. त्याने झटक्यात कमरेतली पिस्तुल काढली आणि सत्पुरुषावर रोखली. सत्पुरुष पुन्हा म्हणाला," म्हणजे तू पिस्तुलही  ठेवतोस तर. आणि या खेळण्याने मला का भीती दाखवतोस? मी थोडाच भिणार आहे. अरे मूर्खा, याने लहान मूलंही घाबरत नाही. माझं तर सोडूनच दे. आता मात्र सैनिकाच्या क्रोधाचा लगाम सुटला. त्याने पिस्तुलाच्या घोड्यावर बोट ठेवले आणि तो ओढणारतोच, सत्पुरुष म्हणाला,"थांब! हाच बघ तो नर्काचे प्रवेशद्वार." सत्पुरुषाच्या बोलण्यातला मतितार्थ समजायला त्याला वेळ लागला नाही. त्याला घडल्या प्रसंगाचा पश्चाताप झाला. तो पटकन सत्पुरुषाच्या पायाशी बसला. आणि अश्रू ढाळत माफी मागू  लागला.
     त्याच्या पाठीवरून हात फिरवत सत्पुरुष म्हणाला," आणि हे स्वर्गाचे दारही उघडले बघ." स्वर्ग आणि नर्क या आनंद दु:खाच्याच अवस्था आहेत. आपण शांतपणे आपले कार्य करत राहतो, ती स्वर्गाची अनुभूती असते, तर आपण स्वतः ला विसरून  क्रोधाच्या आहारी जातो, तेव्हा नर्काची अनुभूती असते. ज्यावेळेला माणसाला राग येतो, त्यावेळेला मन अशांत होतं. अशांतता ही नरकासारखी क्लेशदायक असते. या अशांततेला आपण स्वतः च जबाबदार असतो. आणि ज्यावेळेला त्याची आपल्याला जाणीव होते, त्यावेळेला आपण स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करत असतो.                                                                                        

Tuesday, September 18, 2012

एका वर्षाने मला पुष्कळ दिले...

      माझ्या 'ब्लॉग'ला आज एक वर्ष पूर्ण झाले. दिवस कसे गेले कळले नाही. एवढ्या कालावधीत लेखनही भरपूर झाले. तीनशेच्यावर लेख 'ब्लॉग' पडले. हे सगळे पाहिल्यावर माझे मलाच आश्चर्य वाटते आहे. एवढे असूनही खास 'ब्लॉग'साठी म्हणून मुक्त स्वच्छंदी लिहिता आले नाही. किंवा नंतर ते टाळण्याचाच मी प्रयत्न केला. कारण माझ्या 'ब्लॉग'वर जे काही विविध विषयांवर लेखन आहे, ते मी खास वृत्तपत्रांसाठी केलेले आहे. आणि त्या कोषातून मी बाहेर पडू शकलो नाही. मलाही हलकं-फुलकं, दैनंदिन व्यवहारातलं लिहावं, एखाद्या विषयावर चर्चा करावी असं वाटत होतं. पण वृत्तपत्रीय लिखाणात गुंगून गेल्यानं ते राहूनच गेलं. त्यामुळेच 'ब्लॉग' वर प्रसिद्ध झालेले लेखन वृत्तपत्रीय टाईपचे झाले आहे. आणि ते साहजिकच आहे. गेल्या २० वर्षांपासून वृत्तपत्रांशी संबंधीत असल्याने त्यांच्यासाठीच लिखाण होत गेले. 'ब्लॉग' वर प्रसिद्ध झालेले लेख किंवा बालकथा, कथा किंवा विनोदी चुटके कुठल्या ना कुठल्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले आहेत.
      मुळात माझ्या 'ब्लॉग'चा जन्मही त्याचदृष्टीकोनातून झाला. लिहिलेले लिखाण कुठे तरी शाबूत राहावे, या हेतूने ते 'ब्लॉग' वर टाकले गेले. मात्र हे होत असताना वाचकांनी कुठली तक्रार न करता ते वाचले आणि आनंदाने प्रतिक्रियाही दिल्या. कदाचित वाचकांचा माझा वृत्तपत्रीय 'टोन' लक्षात आला असावा. पण त्यांचा प्रतिसाद हुरुप देणारा ठरला. एका वर्षात वाचकांनी कल्पनेपलिकडे प्रतिसाद दिला. विविध वृत्तपत्रांनी आम्ही हा लेख आमच्या दैनिकात घेतोय किंवा मासिकात घेतोय, असे सांगून घेतला. वापरला. मी लिहिलेले लेखन वाचकांसाठी असल्याने तो अधिकाधिक वाचकांपर्यंत जावा, या हेतूने विचारणार्‍यांना सहज होकार देत आलो.
      माझ्या 'ब्लॉग'मुळे माझ्यापासून दूर असलेले माझे मित्र, विद्यार्थी, हितचिंतक भेटत पुन्हा यानिमिताने जवळ आले. आम्ही एकमेकांच्या लांब असलो तरी विविध विषयांवर चर्चा होत आली. त्यामुळे मला लिखाणाला स्फुरण चढले पण ते शेवटी वृत्तपत्राच्या ढंगानेच गेले. शेवटी माझाही नाईलाज होता. कारण मला वृत्तपत्रांसाठीच लिहायचे होते. आता मात्र वळून पाहताना 'ब्लॉग' म्हणून काही लेखन व्हावे, असे मनोमनी वाटत आहे. आणि तसा प्रयत्न यापुढील काळासाठी करणार आहे.
      माझ्या 'ब्लॉग' वर फार दिवस (म्हणजे तीन -चार दिवस) काही नवे दिसले नाही की, औरंगाबादच्या मनीषा चौधरी- वाघ यांच्याकडून हमखास विचारणा होते. त्याचप्रमाणे अनिल निकम (इस्लामपूर), जी. एम. ऐवळे (दरिबडची) ही मंडळीही सतत लिहिण्याविषयी हमखास दरडावयाची. आता तुझ्या 'ब्लॉग' ची सवय लागलीय, म्हणायचे. तर असो. या माझ्या मित्रांना धन्यवाद देण्यापेक्षा त्यांच्या ऋणातच राहायला आवडेल. वृत्तपत्रीय लिखाण असताना त्या माध्यमातून तर प्रतिसाद मिळतच असतो. पण या माध्यमातून मिळणारा प्रतिसादही माझ्यासाठी फारच आश्चर्यकारक आहे. कारण इतका मोठा प्रतिसाद मिळेल, असे वाटले नव्हते. यातून आणखी एक जाणवते, ते म्हणजे संगणकाचा, मोबाईल नेटचा वापर अगदी खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे, हेच खरे! आणि माणसाने संगणक साक्षर व्हायलाच हवे. मीही एका खेड्यातला , दुष्काळी भागातला! जिथे औद्योगिकता नाही, रोजगार नाही. 'आयटी'सारख्या प्रशिक्षण संस्था  नाहीत. पण संगणकाने आपल्याला जवळ केले. हा खेड्यातला, शहरातला, देशातला किंवा परदेशातला असा कुठलाही निर्बंध राहिला नाही. जग 'एका हाकेच्या' अंतरावर असल्यासारखे भासते. कुठलीच सीमा आता राहिलेली नाही. घरबसल्या जग पाहता येतं, अनुभवता येतंयातून मला शिकागोतून मित्र मिळाला, तसाच अचकनहळ्ळीसारख्या खेड्यातून मिळाला, हे काय कमी आहे?