Friday, November 30, 2012

सलमानपाठोपाठ अजय सलग '१०० कोटी क्लब'चा मेंबर

  अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार'ने १०० कोटीचा व्यवसाय केल्याने आता तो सलमान खान पाठोपाठ सलग शंभर करोड क्लबमध्ये सामिल होणारा अभिनेता ठरला आहे. यापूर्वी  सलमानच्या पाच चित्रपटांनी लागोपाठ कमीत कमी १०० कोटीचा बिझनेस केला आहे.  यात वाँटेड (२००९), दबंग (२०१०), बॉडीगार्ड आणि रेडी (२०११) आणि या वर्षीचा एक था टायगरचा समावेश आहे.  मात्र लागोपाठ हिट चित्रपट देणारा आता  तो एकमेव कलाकार राहिला नाही. त्याला जबरदस्त मुकाबला द्यायला अजय देवगण सरसावला आहे. त्याचे सलग चार चित्रपट १०० करोड क्लबमध्ये सामिल झाले आहेत. २०१० मध्ये गोलमाल ३, २०११ मध्ये सिंघम आणि बोलबच्चन तर आता सन ऑफ सरदारने १०० कोटीचा आकडा पार केला आहे. या सगळ्याचा परिणाम असा की, अजय देवगणला मागणी वाढली आहे. ज्या चित्रपटांची अपेक्षा केली गेली नव्हती, त्या चित्रपटांनीही शंभर कोटीचा आकडा पार केला आहे. परवाच प्रदर्शित झालेल्या 'सन ऑफ सरदार'चेच उदाहरण घ्या. यश चोप्रा यांच्या 'जब तक हैं जान' समोर अजय देवगणचा हा चित्रपट टिकणार नाही, अशीच अटकळ सगळ्यांनी बांधली होती. प्रारंभीचा थंडा प्रतिसाद पाहता सगळ्यांचीच खात्री झाली होती. पण तरीही या चित्रपटाने १०० कोटीचा आकडा पार केलाच. 'फूल और काँटे' या ऍक्शन आणि प्रेम कथेवर आधारलेल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे चित्रपट शौकिनांच्या गळ्यातला ताईत बनलेल्या अजयची ऍक्शन सगळ्यांना भावतेय, असेच म्हणायला हवे.
     बॉलीवूडच्या यशाची गणिते बदलली आहेत. १०० कोटीचा गल्ला कमावणारा चित्रपट आता हिट समजला जात आहे. शंभर करोडची भाषा आता सर्रास बोलली जाऊ लागली आहे. दिवाळीच्या दरम्यान रिलिज झालेले शाहरुख ऊर्फ बादशहा खान आणि अजय देवगण यांचे अनुक्रमे 'जब तक है जान' आणि 'सन ऑफ सरदार' या दोन्ही चित्रपटांनी १०० कोटीची सीमा ओलांडली आहे. सुरुवातीला त्यांना मिळालेला धिमा प्रतिसाद सगळ्यांनाच कोड्यात आणि चिंतेत टाकणारा ठरला होता. शिवाय अगोदरच थिएटर सोडण्यावरून दोघांमध्ये वादही रंगला होता. मात्र दोघांनीही शंभर करोडी आकडा पार केल्याने एक नवाच विक्रम प्रस्थापित झाला आहे. दोन चित्रपट एकत्रित हिटचा आकडा पार करू शकतात, हे आता सिद्ध झाले आहे.

1 comment:

  1. दिवाळीत बिचार्‍या काजोल चे दुख कोणाला दिसले नाही
    एकीकडे नवरा तर एकीकडे जिवलग मित्र , आवडते प्रोडक्शन हाउस
    थोडक्यात इकडे आड तिकडे विहीर
    आमच्याकडे जर्मनी मध्ये स्काय फोल ला स्क्रीन वरून फोल करायला लावले शाहरुख ने
    बॉंड ह्या ब्र्यांड पेक्षा एस आर के हा ब्र्यांड जर्मनीत लोकप्रिय आहे.

    ReplyDelete