अलीकडेच, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांनी अंतराळात वाढत चाललेला कचरा साफ करण्यासाठी प्रभावी प्रयत्न सुरू केले आहेत. इस्रोने उपग्रह प्रक्षेपण यान (सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल -पीएसएलवी सी 56) प्रक्षेपित केले आणि सिंगापूरचे सात उपग्रह अवकाशाच्या उच्च कक्षेत स्थापित केले. यासोबतच या रॉकेटचा निरुपयोगी भाग 300 किमीपर्यंत खालच्या कक्षेत आणण्याच्या प्रयत्नात इस्रोला यशही मिळाले आहे. यामुळे अवकाशातील जंक कमी होण्यास मदत होईलच, शिवाय उपग्रहांच्या हालचालीतील अडथळेही दूर होतील.
भारताची कामगिरी कौतुकास्पद:पीएसएलवी हे चार भागांचे बनलेले असे रॉकेट आहे, ज्यातील पहिले तीन भाग लक्ष्य साधल्यानंतर समुद्रात कोसळतात आणि शेवटचा भाग पीएस4, उपग्रह अवकाशाच्या कक्षेत सोडल्यानंतर स्वतःच कचऱ्यामध्ये बदलतात आणि उच्च कक्षेतच प्रदक्षिणा घालत राहतात.पण इस्रोच्या या यशानंतर रॉकेटचा हा भाग खालच्या कक्षेत पोहोचल्यानंतर उच्च कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहांच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण करत नाही. अंतराळातील कचरा नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी हे एक अनोखे तंत्र आहे.या यशामुळे भारताने अंतराळातील कचरा कमी करण्याची आपली वचनबद्धता पूर्ण केली आहे. न्यू स्पेस इंडियाचे अध्यक्ष डी. राधाकृष्णन यांनी म्हटले आहे की, “मला वाटत नाही की या मोहिमेच्या यशापासून यापेक्षा आणखी चांगल्या गोष्टीची अपेक्षा करता आली असती.'
स्पेस जंक मोठ्या प्रमाणात: पृथ्वीभोवती सध्या सुमारे 2,000 उपग्रह फिरत आहेत. त्याच वेळी, 3,000 हून अधिक निष्क्रिय उपग्रह अवकाशात कचरा पसरवण्याबरोबरच नव्याने प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांच्या कक्षेत अडथळा ठरत आहेत. ज्यामुळे ते एकमेकांवर आदळण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, सुमारे 34,000 स्पेस जंकचे तुकडे आहेत जे 10 सेंटीमीटरपेक्षा मोठे आहेत. एवढेच नाही तर असे लाखो छोटे तुकडे अवकाशात तरंगत आहेत, जे कोणत्याही वस्तूशी आदळल्यास विनाशकारी ठरू शकतात. अलीकडेच, ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर असा बेलनाकार स्पेस रॉकेटचा कचरा सापडला आहे, ज्याचे वर्णन भारतीय रॉकेटचा टाकाऊ भाग असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच अवकाशातील उपग्रहांचा कचरा संपूर्ण जगासाठी संकट बनत आहे.
ते कधीही पृथ्वीवर पडू शकतात. 2016 मध्ये सहा टन वजनाचा यूआरए उपग्रह पृथ्वीवर पडला होता. यापूर्वी 1989 मध्ये 100 टन वजनाचा स्कायलॅब उपग्रह हिंद महासागरात पडला होता आणि 2001 मध्ये रशियाचे स्पेस स्टेशन मीर दक्षिण प्रशांत महासागरात पडले होते. मात्र, अंतराळ मोहिमेच्या इतिहासात आजपर्यंत ही जंक्स (कचरा) जमिनीवर किंवा समुद्रात पडल्याने कोणतीही मानवी हानी झालेली नाही, ही समाधानाची बाब आहे.असे असले तरी भविष्यात जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आयुष्य पूर्ण केलेले मुदतबाह्य उपग्रह परत आणण्याची मोहीम सुरू केली आहे. या क्रमाने, शास्त्रज्ञांनी मेघा टॉपिक्स 1 (MT1) उपग्रहाची अत्यंत आव्हानात्मक मोहीम पार पाडल्यानंतर पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पुन्हा प्रवेश केला आणि तो प्रशांत महासागरात पाडला गेला. या यशाचा उल्लेख करत इस्रोने ट्विटरवर लिहिले की, "उपग्रह पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा दाखल झाला आणि पॅसिफिक महासागरावर त्याचे विघटन झाले." याशिवाय भारताने उपग्रहभेदी क्षेपणास्त्र (ए सेट) तयार केले आहे आणि त्याची यशस्वी चाचणीही केली आहे. या चाचणीत एक निष्फळ ठरलेला उपग्रह नष्ट करण्यात आला. अंतराळात क्षेपणास्त्राने साधले गेलेले हे लक्ष्य एक मोठी वैज्ञानिक कामगिरी होती.
अनेक देश या दिशेने सक्रिय: मोठया प्रमाणात रॉकेट आणि सॅटेलाईट पार्ट्स जंक म्हणून अवकाशात भटकत आहेत. ही संख्या सुमारे नऊ लाख आहे जे आठ कि.मी. प्रति सेकंद, म्हणजे 25 ते 28,000 किमी. प्रति तास या वेगाने पृथ्वीच्या कक्षेत (LEO) सतत फिरत आहेत. हे असे तुकडे आहेत जे वातावरणात प्रवेश केल्यानंतर पूर्णपणे जळून राख झाले नाहीत. ते केवळ क्षेपणास्त्रांनीच नष्ट केले जाऊ शकतात. ते केवळ क्षेपणास्त्रांनीच नष्ट केले जाऊ शकतात. जपानच्या चार आणि अमेरिकेच्या नासासारख्या अनेक कंपन्या या मानवनिर्मित कचरा साफ करण्यात गुंतल्या आहेत. अनेक देशांच्या खासगी कंपन्याही या क्षेत्रात भविष्यात मोठी संधी म्हणून त्यांचे पाहत आहेत.या दिशेने पुढाकार घेत भारताने एमटी1 नष्ट करून मोठा धाक निर्माण केला आहे. हा वाढता कचरा नष्ट केला नाही तर भविष्यात हा कचरा हवा, पाणी आणि पृथ्वीसाठी मोठ्या संकटाचे कारण बनू शकेल. जपानी कंपनी एस्टोस्केलचे सीईओ नोबू ओकोडा म्हणतात की 22 मार्च 2020 रोजी कझाकस्तानमधील बायकोनूर येथून सोयुझ रॉकेटद्वारे 'एल्सा डी' उपग्रह प्रक्षेपित करून आम्ही आमची मोहीम सुरू केली आहे. हा उपग्रह खराब झालेले उपग्रह आणि यानाच्या कचऱ्याचे मोठे तुकडे काढण्याचे काम करेल. जपानचा दुसरा उपग्रह 'जॅक्सा' इलेक्ट्रोडायनामिक सारख्या वेगाने कचऱ्याच्या कक्षेत फिरण्याचा वेग कमी करेल आणि नंतर हळूहळू वातावरणात ढकलेल. हा कचरा नष्ट करण्यासाठी जर्मनीची अंतराळ संस्था 'डीएलआर' ने लेझर तंत्रज्ञान विकसित केले आहे.
अमेरिकन कंपनी नासाने 'इलेक्टो नेट' तयार केले आहे. हे एक प्रकारचे जाळे आहे, जे कचरा बांधून पृथ्वीच्या वातावरणात आणते. बहुतांश कचरा वातावरणात प्रवेश करताच स्वतः जळून नष्ट होते. अमेरिकेतील सहाहून अधिक स्टार्टअप्स या मोहिमेशी संबंधित आहेत. आता अंतराळ शास्त्रज्ञ अवकाशातून पृथ्वीच्या दिशेने पडणारा कचरा पुन्हा वातावरणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.यासाठी स्वित्झर्लंडच्या शास्त्रज्ञांनी 'क्लीन स्पेस वन' नावाचा उपग्रह तयार करण्याची घोषणा केली आहे. मौल्यवान अवकाश उपग्रहांचे कचऱ्यांच्या टक्करीपासून संरक्षण करण्यासाठी या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या तरी अंतराळातील वाढता कचरा ही पृथ्वी आणि येथे राहणार्या मानवांसाठी संकटाचे कारण बनला आहे, जे कधीही मोठ्या संकटाचे रूप धारण करू शकते, ज्याची स्वच्छता मोहीम जलद गतीने राबविण्याची गरज आहे.- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment