आधुनिक जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या
बदलत चाललेल्या सवयींमुळे आपला देश कुपोषण, लठ्ठपणा
आणि बिगर संसर्गरोगांनी ग्रस्त होत चालला आहे. कंप्रिहेसिव नॅशनल
न्यूट्रीशन सर्व्हे ( सीएनएनएस) नुसार देशातील
बालके आणि किशोरवयीन मुलांच्या अभ्यासादरम्यान ही माहिती समोर आली आहे. हा सर्व्हे गेल्या काही दशकातील आपल्या समाजात होत असलेल्या तीव्र आर्थिक आणि
सामाजिक बदलाच्या दिशेने बोट दाखवत आहे. सर्व्हेमध्ये बालकांच्या
खाण्यापिण्याविषयी आणि होणार्या रोगांविषयी अभ्यास करण्यात आला
आहे. पण खाणपिणं किंवा रोग बर्याच प्रमाणात
सामाजिकतेशी सबंधित असतात. यातून आर्थिक परिस्थितीदेखील समोर
येते. हा अहवाल भीतीदायक आहे कारण गेल्या काही वर्षांत बालकांमध्ये
आणि किशोरवयीन मुलांमध्ये डायबिटीज, हायपरटेन्शन आणि किडनी संसर्गाचे
रोग वाढले आहेत.
Thursday, December 5, 2019
Wednesday, December 4, 2019
मायक्रो-प्लास्टिक आणि आपण
आपण आपल्या देशातील प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी मोठे अभियान चालवत आहोत. जगभरात जवळपास सगळ्याच ठिकाणी अशाप्रकारची अभियाने चालवली जात आहेत. सध्या तरी आपला पहिला प्रयत्न एकदा वापर केला जाणार्या प्लास्टिकपासून मुक्तता मिळवण्याचा आहे. कारण ते जगाच्या प्लास्टिक प्रदूषणामध्ये मोठी भूमिका निभावत आहे. या प्लास्टिकबरोबरच आणखी एक आव्हान आपल्यासमोर उभे राहिले आहे, ते म्हणजे मायक्रो-प्लास्टिकचे! मायक्रो-प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकचे बारीक बारीक कण.सुक्ष्म कण. जे सहज डोल्यांना दिसत नाहीत. हे कण सर्वत्र आहेत. या हवेत आहेत, ज्या हवेतून आपण श्वास घेतो. त्या पाण्यात आहेत, ज्या पाण्याचा आपण वापर करतो. त्या अन्नात आहे, जे आपण खातो.
रस्ते अपघातांमध्ये घट
रस्ते अपघात आपल्यासाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात रस्ते अपघातांची आणि बळींची संख्या मोठी आहे. रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, दारू पिऊन वाहन चालवणे, बेदरकार वाहन चालवणे,वाहतुकीचे नियम मोडणे, अधिक काळ वाहन चालवणे अशी अनेक कारणे वाहन अपघातांची आहेत. अलिकडच्या काळातील तरुणाई तर वाहनांना खेळणे समजून बेदरकारपणे वाहन चाालवताना दिसत आहे.त्यांना आपल्या जीवाची तर पर्वा नाहीच,पण दुसर्याच्या जीवाचीही काळजी वाटत नाही.
न्याहारी,स्मृतिभ्रंश आणि ब्रेन सफाई
आपल्या शरीराला व्यायाम महत्त्वाचा आहे. व्यायामामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते. उत्साह येतो. ऊर्जा खर्च होते. त्यामुळे डॉक्टर मंडळी नेहमी व्यायाम करा,फिरायला जात जा असा सल्ला आपल्या रुग्णांना देत असतात. व्यायामाबरोबरच सकाळी नाश्ता केला जावा, असे सांगितले जाते. आपल्या आयुर्वेदातसुद्धा व्यायाम करण्याची वेळ सकाळी नाश्त्याच्या अगोदर योग्य असल्याचे म्हटले आहे. याला एका संशोधनाने पुष्टी मिळाली आहे. 'द जर्नल ऑफ क्लिनिकल एन्डोक्राइनोलॉजी एन्ड मेटाबोलीजम' मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधात म्हटले आहे की, व्यायाम केल्याने इन्सुलिन लेव्हल योग्य राहते आणि हार्मोन्स सुद्धा योग्यरीत्या स्त्रावतात. त्याचबरोबर ऊर्जा योग्यप्रकारे खर्च होते.
वैद्यकीय शिक्षण स्वस्त व्हायला हवे
आपल्याकडे वैद्यकीय सेवा सुविधा आणि डॉक्टरांची कमतरता असल्याने अनेकदा रुग्णांना गंभीर प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या कमी असल्याने त्याच बरोबर हे शिक्षण कमालीचे महागडे असल्याने अनेक युवकांना वैद्यकीय शिक्षण घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. यासाठी मुळात खासगी शिक्षण देणाऱ्या संस्थांना अधिक फी घेण्यापासून रोखण्याची आवश्यकता आहे. तरच डॉक्टरांची संख्या वाढण्याबरोबरच सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.
किशोरवयीन मुले आणि क्रिकेट
आपल्याला माहीत आहे, क्रिकेट हा आपल्या देशातल्या लोकांचा श्वास आहे. सर्वाधिक क्रिकेट वेडे भारतात आहेत. भारतीय क्रिकेट संघ मैदानावर असेल तर देशातले लहान थोर एक तर टीव्ही समोर असतात किंवा क्रिकेट स्कोर जाणून घेण्यासाठी सतत मोबाईलशी खेळत असतात. जिथून कोठून माहीत मिळेल,तिथून सातत्याने ती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. शाळा,कॉलेज, सरकारी,खासगी कार्यालये इथली कामकाजी यंत्रणा या काळात काहीशी सुस्तावलेली असते. पण क्रिकेटबाबत उत्साह असतो. याच क्रिकेटचे वेडामुळे भारतातील किशोरवयीन मुले इतर देशातल्या किशोरवयीन मुलांपेक्षा शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) दिला आहे.
प्रिय भक्त कोण?
एकदा नारद मुनी फिरत फिरत विष्णू लोक पोहोचले. त्यांनी विष्णू देवास विचारले,'परमेश्वरा, तुमचा प्रिय भक्त कोण आहे?' नारद मुनी यांना त्यांचे नाव घेतले जाईल,अशी अपेक्षा होती, कारण ते प्रत्येक क्षणी 'नारायण' या शब्दाचा जपमाळ करत असत. पण भगवान विष्णू म्हणाले,'पृथ्वीवर राहणारा सुखीराम नावाचा शेतकरी माझा प्रिय भक्त आहे.' सुखीराम यांचे नाव ऐकून नारद मुनी लगेच पृथ्वीवर पोहोचले. त्यांनी पाहिले, सुखराम सकाळी एकदाच देवाचे नाव घेतो आणि मग बैल घेऊन शेतात निघून जातो. तेथे तो दिवसभर शेतात नांगरतो आणि संध्याकाळी घरी येतो.
Subscribe to:
Posts (Atom)






