Wednesday, April 29, 2020

(बालकथा) घोड्याचा व्यवहार

शाम नावाचा एक शेतकरी होता.  तो आपल्या शेतात भाजीपाला पिकवत असे.  आणि हा भाजीपाला दररोज जवळच्या शहरात नेऊन विकत असे. त्याच्याकडे गाढव किंवा बैलगाडी असं काही नव्हतं. तो भाजी पाटीत भरायचा आणि डोक्यावर घेऊन विकायला जायचा.  पण डोक्यावर भाजी नेऊन तो कंटाळला. शिवाय पाटीत फार जास्त काही भाजीपाला नेता येत नव्हता.

Tuesday, April 28, 2020

(बालकथा) जयललिताची सासू

खूप खूप वर्षांपूर्वीची  गोष्ट आहे. जयललिता कारापूर जंगलाजवळील खेड्यात राहत होती.  लग्नानंतर ती सासरी आली. सासूने तिला मायेने जवळ घेतले. आईसारखं प्रेम दिलं, पण काही दिवसातच सासूला कळलं की सूनबाई घरातल्या कामात फारच अडाणी आहे.  सासूला प्रश्न पडला, आता काय करावं? एक दिवस तिने सुनेला बोलावून सांगितलं 'जयललिता, मला विचारल्याशिवाय काहीच काम करायचं नाही, नाहीतर देवीचा शाप लागेल."

Monday, April 27, 2020

(बालकथा) मूर्ख निलम्मा

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. गंगावती नगरचा राजा एकदा शिकार करायला बाहेर पडला. शिकारच्या शोधात  संध्याकाळ झाली.  पण एकही शिकार मिळाली नाही. शेवटी माघारी फिरणार तोच त्याला रानडुक्कर दिसले. राजाने घोड्याला टाच मारली आणि डुक्कराचा पाठलाग सुरु केला.  थोड्या वेळातच सूर्य मावळला आणि दाट अंधार पसरू लागला. डुक्करही दाट झाडीत  गायब झाले. राजाने  आजूबाजूला पाहिले.

(बालकथा) अन्न तुमचे,पुण्य तुमचे आणि ...

एकदा राजा कृष्णदेव रायला तेनालीरामची मस्करी करायची लहर आली.  त्याने तेनालीरामला दरबारी मंडळींना  मेजवानी देण्यास सांगितले.  पण तेनालीरामला समजले की यात काहीतरी काळेबेरे आहे. पण त्याने तसे आपल्या चेहऱ्यावर दाखवले नाही. तो म्हणाला, "महाराज, उद्या सकाळी सर्व दरबारी मंडळीसमवेत तुम्हीही माझ्या घरी जेवायला या. आताच सगळ्यांना भोजनाचे आमंत्रण."

Sunday, April 26, 2020

बालकविता

मांजराची फजिती

 एका मांजराची झाली फजिती
 कशी ओ, कशी ओ?
 ऐका, ध्यान देऊन घडली घटना
 अशी ओ, अशी ओ

 एक दिवस मांजराने  केला विचार
 पाहून येऊ पिक्चर
 तिकिटाशिवाय घुसला
गपचिप  सिनेमाघर

(बालकथा) प्रजेचे प्रेम

एकदा इजिप्तच्या बादशहाने त्याच्या एका सरदाराला एका सुब्याचा  सुबेदार म्हणून नेमले. बादशहाने सरदारला बोलावून नियुक्ती पत्र देऊन आवश्यक ती माहिती व सूचना दिल्या.
  सरदार कृतज्ञतेपूर्वक बादशहासमोर झुकला आणि आभार व्यक्त करणार, तेवढ्यात एक लहान मुलगा धावत धावत तिथे आला. त्याने बादशहाला सलाम केला.

(बालकथा) उपहार


एकदा शेजारील देशाचा एक दूत विजयनगरमध्ये  आला. येताना त्याने राजा कृष्णदेवरायसाठी अनेक अनमोल असा  नजराणा आणला होता.
शेजारील देशाच्या दूताचे भव्य स्वागत करण्यात आले. त्याचा यथायोग्य असा पाहुणचार करण्यात आला.   तिसर्‍या दिवशी तो जाऊ लागला, तेव्हा राजा कृष्णदेवराय यांनीही शेजारच्या राजाला अनमोल अशा भेटवस्तू दिल्या.  राजा दूताला म्हणाला, " तुलाही काही देण्याची आमची इच्छा आहे.  सोने, चांदी, रत्ने इत्यादी जे हवे ते माग."