महाराष्ट्र आणि तामिळनाडू राज्याने लॉकडाऊनचा कालावधी आणखी 31 जुलैपर्यंत वाढवला आहे. महाराष्ट्र सरकारपुढे याशिवाय दुसरा कुठला पर्याय नव्हताच. जर अशाप्रकारे कोविड-19 चा संसर्ग वाढत राहिला तर आपण 'अनलॉक' ची अपेक्षाच करू शकणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारांनी लॉकडावूनच्या काळात टप्प्या-टप्प्याने व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याच्या घडीला शिक्षण संस्था सोडल्या तर जवळपास सर्वच गोष्टींना पूर्ववत मुभा दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली अर्थव्यवस्था मार्गावर आणणं खूप जरुरीचं होतं. आता ते हळूहळू पूर्वपदावर येत आहे, ही समाधानकारक बाब असली तरी दुसरीकडे कोविड-19 चा संसर्ग मात्र कमी होताना दिसत नाही.
Tuesday, June 30, 2020
Monday, June 29, 2020
शाळा महत्त्वाची की मुलांचे आरोग्य?
कोरोनाचा आपल्या देशात भडका उडाला आहे. रोजचे लागण होण्याचे प्रमाण कमालीचे झपाट्याने आणि चिंताजनाकरित्या वाढत असल्याने स्वतःची काळजी स्वतः घेणं क्रमप्राप्त आहे. सुरक्षित अंतर ,तोंडाला मास्क आणि स्वच्छता या त्रिसूत्रीच्या आधारावर कोरोना संसर्गात जगावं लागणार आहे. अशात शाळा सुरू करण्याच्याबाबतीत शासकीय पातळीसह विविध स्तरावर उलटसुलट बोललं जातं आहे. आपल्या देशात कुठलीही एक गोष्ट ठामपणे होत नाही.किंवा करता येत नाही. त्याला टोकाच्या दोन दिशा आहेत. लॉकडाऊनसारखा कमालीचा टोकाचा निर्णय घेताना जरी त्याच्या होणाऱ्या परिणामांची काळजी घेतली नसली तरी लॉकडाऊनमुळे कोरोना संसर्गाची साखळी तुटेल, याची जी अपेक्षा केली होती, तीही पूर्ण झाली नाही. या काळात जरी संसर्गाला काही प्रमाणात अटकाव घातला तरीही ,त्याला पूर्णतः नष्ट करण्यात आपल्याला यश आले नाही.
Saturday, June 27, 2020
काळे धंदेवाले,सावकारांना घ्या 'इन्कम टॅक्स'च्या रडारवर
सावकारी, काळेधंदे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणारे शासकीय घटक आणि काळेधंदे करणारे यांच्यात जे 'आर्थिक संबंध'आहेत,ते जगजाहीर आहेत. यामुळे काळेधंदेवाले आणि सरकारीबाबू यांनी आपली घरे भरून घेतली आहेत. सावकार तर गोरगरिबांच्या मुंड्या पिरघळून सुखासीन जगात लोळत आहेत. दोन नंबर करून जगणाऱ्या लोकांची इथे चलती आहे. त्यांना ना 'इन्कम टॅक्स' ची भीती ना कारवाईची! दोन नंबरच्या धंदेवाल्यांना कायद्याची बाजू सांभाळणाऱ्या लोकांना हाताशी धरले की काम झाले. मग ही मंडळी कुणाला भिकच घालत नाहीत. उलट यांची दादागिरी वाढते.
Thursday, June 25, 2020
शिक्षकांच्या पोटात भीतीचा गोळा
कोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या शाळांना 'टाळे' लागले आहेत. ही कुलपे कधी उघडली जातील, हे सांगणं सध्यातरी कठीण आहे. काही दिवसांपूर्वी रोज दहा हजारांनी वाढणारी कोविड-19 च्या रुग्णांची संख्या आता 15 हजारांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्याच्याबाबतीत शिक्षकांबरोबर पालकांनाही चिंता सतावू लागली आहे. परंतु, या सगळ्यांत शिक्षकांच्या पोटात मात्र भीतीचा गोळा उठला आहे. 'काम नाही तर दाम नाही',अशी भूमिका सरकार घेऊ शकते. त्यामुळे काही महिने आपल्यालाही विना वेतन काढावे लागतील की काय, अशी चिंता त्यांना सतावू लागली आहे. या अगोदर 75 टक्के पगार अदा करून 25 टक्के पगाराला कात्री लावण्यात आली आहे. अलीकडेच कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढावे लागणार असल्याचे सूतोवाच मंत्री जयंत पाटील यांनी दिल्याने कदाचित उद्या आपल्या पगारावर टाच आणली जाईल की काय, अशी शंका त्यांना सतावू लागली आहे. काही अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या प्रतिष्ठेची कसलीही आब न राखता त्यांना कसल्याही कामावर नेमणूक करून त्यांच्या प्रतिष्ठेचे धिंडवडे काढले.
Monday, June 22, 2020
(बालकथा) पिठलं-भाकरी
विराट सातवीत होता. हुशार पण लहरी महंमद. 'आली लहर, केला कहर',असंच काहीसं होतं त्याचं. कुणाशी बोलायचं नाही,कुणाच्यात मिसळायचं नाही. आपण, आपलं घर आणि टीव्ही हेच त्याचं विश्व. मैदानावर जाऊन खेळल्याचं त्याला कुणी पाहिलं नाही आणि काही मदत केल्याचं आईलाही काही आठवत नाही. विराटच्या तक्रारी मात्र भरपूर!डब्याला हे नको, ते नको. पायी चालत शाळेला जायला नको. परिणाम काय तर गड्याच्या शरीराचं वजन भलतंच वाढलेलं. साहजिकच आईबाबाला आपल्या मुलाची काळजी सतावायला लागली.
स्वावलंबनाचे धडे
कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला पायबंद घालता यावा यासाठी जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीने आपल्याला खूप काही शिकवलं आहे. अनेक धडे दिले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कालावधीत सगळ्यांच्या गरजा फारच कमी आल्या. घरात बसून राहिल्याने अधिक काळ हा नवीन खाद्य करण्यात आणि शिकण्यात गेला. मात्र यातून एकमात्र झाले. शिकणाऱ्या मुली छानपैकी स्वयंपाक करायला शिकल्या. त्यांना त्यांची आई किंवा विशेषतः युट्युबने साथ दिली. दहावी, बारावी किंवा कॉलेजला जाणाऱ्या मुली घरात सहसा काही काम करत नव्हत्या. त्यांच्या अभ्यासामुळे त्यांची आई त्यांना कामही लावत नव्हती. पण या कालावधीत या मुली स्वयंपाक खोलीत जाऊ लागल्या आणि आईला मदत करू लागल्या. यात बऱ्याच मुली सुगरणही झाल्या. काहींच्या आयांना मुलींचे भविष्य उज्ज्वल असल्याचा साक्षात्कारही झाला.
Sunday, June 21, 2020
लग्न करताना...
आपल्याकडे लग्न जमले की लगेच बार उडवून देण्याची घाई करतात. याला आपल्याकडे एक पद्धत म्हणूनच बघितले जाते. त्यामुळे लग्न ठरले की, आठ-पंधरा दिवसांत किंवा महिन्याभरात लग्नाचा सोहळा उरकून टाकतात. मात्र यामुळे दोन जीवांना समजून घ्यायला वेळ मिळत नाही. आजची पिढी शिकली-सवरलेली आहे. त्यामुळे त्यांनी जोडीदार कसा असावा, याची मनात एक अपेक्षा धरून ठेवलेली असते. जर का त्यांच्या अपेक्षेला तडा गेला की, पुढचं सगळं अवघड होऊन बसतं. त्यामुळे लग्न ठरल्यावर जोडीदाराला समजून घेण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. पाच-सहा महिने तरी यासाठी सहज मिळायला हवेत. या कालावधीत दोघेही एकमेकांना भेट राहतील, एकमेकांच्या घरी जातील-येतील साहजिकच घरातले लोक समजून घेता येतील, भीती कमी होईल. या कालावधीत औपचारिकता कमी झाल्याने जोडीदाराच्या, त्यांच्या घरच्या लोकांच्या रुजलेल्या प्रवृत्ती वागण्या-बोलण्यातून दिसायला लागतात.
Subscribe to:
Posts (Atom)






