Saturday, October 12, 2013

स्मार्टफोन बाळगणार्‍या स्मार्ट दोस्तानों, जरा इकडे लक्ष द्या


      आजकाल स्मार्टफोन अनेकांचा जीवाभावाचा सखा झाला आहे. काही जण तो हातात असल्याने स्वत:ला स्मार्ट समजू लागले आहेत. स्वत:ला अप-टू-डेट आणि सगळ्यांशी टचमध्ये असल्याचे मानू लागले आहेत. परंतु, त्याचा वापर तितकाच स्मार्टपणे केला नाही तर नुकसानदेखील हो ऊ शकतं हे जाणून घेतलं पाहिजे.
      स्मार्टफोननं माणसाचं अख्खं आयुष्यचं बदलून  टाकलं आहे. कॉलेजमध्ये जाणार्या युवावर्गांमध्ये तर तो हमखास रुळला आहे, पण कमाई करणार्या आजच्या नव्या पिढीच्या हाताचाही त्याने ताबा घेतला आहे. कित्येकदा ऑफिसातल्या पीसी वर सोशल नेटवर्कद्वारा मित्रांशी संपर्कात राहणार्या या मित्रांच्या हातात स्मार्टफोन आल्याने चोवीस तास ही माणसं सगळ्यांशी संपर्कात आहेत. अगदी भरल्या मिटिंग्जमधूनही बसल्या बसल्या मित्रांना जोक पाठवले जाताहेत. तर कधी कधी दोस्तांबरोबर गप्पा मारल्या जात आहेत. ऑफिसमधल्या फावल्या वेळात तिथल्याच पीसीवर मेल चेक करणारे आता केंव्हाही आणि कुठेही मेल तपासताहेत. मेल सेंड करताहेत. कित्येकांना या स्मार्टफोनमुळं सगळ्यांशी टचमध्ये राहावं, असं वाटत असतं. परंतु, आजकालच्या अधिक विचार  न करणार्या या पिढीला यामुळं आपलं नुकसान होतं आहे, याची कल्पनाच नाही. स्मार्टफोनमुळे आपण अधिकाधिक लोकांच्या संपर्कात राहत असलो तरी त्यामुळे आपले लक्ष कुठल्या एका गोष्टीवर केंद्रित होत नाही. याचा अर्थ आपण कुठल्या एकाही व्यक्तीला शंभर टक्के वेळ देऊ शकत नाही. आपल्या कम्युनिकेशनमध्ये तितकी गहराई नसते. त्यांच्यात आपण फार इनव्हॉल्व होत नाही.
      यामुळं आपण फारसा विचार करत नाही. परिणाम  काहीही लिहिलं जातं आणि बोललं जातं. टिवटरवर सेंकदा सेंकदाला ट्वीट येत असतात. एखाद्या पोस्टवर लोक बिनदास्त, बेशक कमेंटस करत असतात. या अशा दौडीत आपणही सामिल हो ऊन विनाकारण आपण आपली ऊर्जा घालवत असतोते करण्यापेक्षा कुठलाही एक विषय समजावून घेऊन त्यावर विचारपूर्वक कमेंट करा. खरे तर नाती बनवायची आणि टिकवायची असतील तर तिथे शब्दांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे कुठेही घाईगडबडीने प्रतिक्रिया द्यायला जाऊ नका.
      सोशल साईटस किंवा या  स्मार्टफोनने आपल्याला बोलायला अनेक  व्यासपीठं दिली आहेत. पण इथल्या व्यासपीठांवर प्रत्येक गोष्ट ऐकली जाते  असे नाही. अचानकच एखादी गरजेची नसलेली, व्ह्यायात गोष्ट मोठी हो ऊन बसते. हा सगळा परिणाम विचार न केल्याचा आहे. त्यामुळे आपणही त्यात न गुरफटून एखाद्याच विषयावर तेही महत्त्वाच्या विषयावर , मतावर ठाम राहा. आपणही एखाद्याच्या सांगणार्याचे विचारपूर्वक समजून घ्या आणि तितक्याच हुशारीने त्याला उत्तर द्या.

      सोशल साईट्स आणि स्मार्टफोन्सच्या ऍप्समुळे आपल्या भरपूर म्हणजे भरपूर वर्चु अल फ्रेंड्स दिले आहेत.त्यांच्याशी आपण तासनतास गप्पा मारत असतो. पण इतके करूनही आपल्या मनाचे समाधान झालेले नसते.मात्र एखाद्या खास दोस्ताशी थोडा वेळाच बोला, पण मनाला समाधान देऊन जाते. अशा वर्चु अल जगात आपला किंमती वेळ घालवण्यापेक्षा अशा थोड्याच मित्रांशी आपले कम्युनिकेशन जोडा, ज्यांच्याशी बोलल्याने तुम्हाला आनंद, समाधान वाटेल. आणखी विषयांमध्ये किंवा व्यासपीठावर आपण वावरत राहिलो तर आपले मनदेखील कन्फ्युज हो ऊन जाते, गोंधळून जाते. त्याच्याने आपल्यालाच त्रास होतो. वेळ वाया जातो. त्यामुळे कुठली समस्या आधी महत्त्वाची आहे, त्यावर मन एकाग्र करा. तो स्वॉल्व झाला की, दुसर्याकडे वळा. स्वत: ला गोंधळून टाकून दुसर्यालाही गोंधळात टाकू नका.  

No comments:

Post a Comment