Saturday, October 12, 2013

बालकथा टिंकीचा करिश्मा



      नंदनवनात परतल्यावर टिंकी  बरेच दिवस आपल्या आईच्या हातच्या स्वादिष्ट भोजनावर ताव मारत राहिली. मग  एक दिवस ती तिच्या मैत्रिणीला-किटी खारूला भेटायला बाहेर पडली. जाताना तिनं पाहिलं की, बंटी माकड कल्लू कावळ्याशी भांडत होता. फिस्सकन अंगावर जात होता आणि   तावदारू न म्हणत होता, “ तुझं  गबाळ उचलं आणि दुसर्या झाडावर जाऊन राहा. इथे माझ्याबरोबर नको. तुला कसं राहावं, याची अजिबात  अक्कल नाही.कुठलेही, कसले घाण मांसाचे तुकडे आणतोस, आणि  कुठेही, कसेही टाकतोस.त्याच्याने  परिसरात किती दुर्गंधी पसरली आहे. अरे, तुझ्यामुळे  आम्हाला  नाकपुड्या धरून वावरावं लागतं.छे... छे! तू इथे एक क्षणभरही थांबायचं नाहीस.चालता हो इथून! ”
      त्यावर कल्लू कावळा ठामपणे म्हणाला, “ आम्ही आमच्या  वाडवडिलांपासून इथे राहतो आहोत. इथून  अजिबात जाणार नाही.ङ्घ  बंटीचे पित्त खवळलेत्याने त्याच तिरीमिरीत  कल्लूच्या कानशिल्यात लगावली. तसा कल्लू तडमडत खाली पडला. त्यांचे भांडण पाहून इटुकली टिंकी  पटकन तिथे पोहचली. आणि म्हणाली,            “ नमस्कार बंटीकाका! कसे आहात? ”
      बंटी आवाज ऐकून  मागे वळला. पाहतो तर  टिंकी मुंगी  पुढचे दोन्ही हात जोडून उभीतिला पाहताच त्याचा राग कुठल्या कुठे पळाला. टिंकी होतीच तशी! सार्या  नंदनवनची  तिच्यावर मर्जी होती. तिला लहानपणापासून एक सवय होती, कुणी कितीही रागावलं तरी रागाला यायचं  नाही. आणि राग अनावर झाला तरच ती थेट तेथून उठायची आणि दुसरीकडे कुठे तरी जायचीपाणीबिणी प्यायची.   थोडावेळ  पुस्तक  वाचत बसायची.
 राग शांत  झाला की, मग ती माघारी परतायची. पुन्हा  पहिल्यासारखी हसत खिदळत  गप्पांमध्ये रमून जायची. तिच्या अशा या वागण्यामुळे जे आपल्या क्रोधाने दुसर्या पशु-पक्ष्यांना  त्रास द्यायचे, त्यांना आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप व्हायचा.
       टिंकीला पाहून कल्लूनेदेखील नमस्कार केला.ती बंटीला म्हणाली, “ काका, भांडणतंट्याने कुणाचे प्रश्न सुटले आहेत का? आणि कल्लू कावळ्याकडून काही चूक झालीच असेल तर तुम्ही त्याला अगदी शांतपणानेसुद्धा सांगू शकतामी मनोमन किती अभिमान बाळगला होता, आपल्या नंदनवनचा  आणि  इथल्या रहिवाशांचा! आपल्या नंदनवनात शहरातल्या माणसांसारखं कुणी भांडणतंटा करत नाही. अगदी प्रेमानं, गुण्यागोविंदयानं राहतात. आपले जंगल स्वच्छ आणि सुंदर ठेवतात, पण इथे तर  शहराची हवा लागली असल्याचं दिसतं.”
      टिंकीचे बोलणे ऐकून कल्लू कावळ्याला तर रडूच कोसळलं. तो रडतच म्हणाला, “ टिंकी, भांडण  मी उकरून काढलं नाही. या टिंकीमामानं काढलं. आणि मी काही जाणूनबुझून दुर्गंधी पसरवत नाही. अनावधानानं घडतं, यापुढे  काळजी घेईन, पण हे झाड सोडून जाणार नाहीइथल्या खुपशा स्मृति  हृदयात जपल्या आहेत. हे झाड मला फार आवडतं.”
      कल्लू  कावळ्याच्या डोळ्यांमध्ये पाणी पाहून बंटी माकड काहीसा नरमलाम्हणाला, “ अरे कल्लू, मी तर तुला हेच सांगत होतोआपल्या सगळ्यांनाच नंदनवन स्वच्छ आणि सुंदर ठेवायला हवं ना!   आपण जर असाच कचरा कुठेही टाकत राहिलो तर  नंदनवन किती कुरूप-विद्रुप  दिसेल. दुर्गंधीमुळे साथीचे आजार  पसरतील. काय टिंकी! मी म्हणतोय ते बरोबर ना? तू तर शहरात शिकून मोठी मॅडम होऊन आली आहेस. आता तुलाच आम्हा आडाण्यांना जगण्याची रीतभात शिकवावी लागेल. ”
      बंटीचे बोलणे ऐकून टिंकी हसत म्हणाली, “  नक्कीच काका! मी सगळ्यांना  मोठ्या आनंदान आणि  मोफत शिकवीन. आणि जे शिकतील-सवरतील, त्यांना माझ्या टीममध्ये सामिल करून घेईन. आणि  वनातल्या सर्व सानथोर  पशू-पक्ष्यांना शिकवून शिक्षित करीन. त्यांना चांगल्या ज्ञानाच्या गोष्टी सांगेन.कॉम्प्युटरदेखील शिकवीन. शेवटी आमचं  नंदनवन तरी का मागे असावंकॉम्प्युटरच्या माध्यमातून सगळी कामं  एका चुटकीसरशी  करता येतात. ”
      टिंकीचे बोलणे  बंटी आणि कल्लू कान देऊन ऐकू लागले. तिची तळमळ ऐकून ते   चकीत झाले. या दरम्यान बरेच पशू-पक्षी तिथे गोळा झाले होते. सगळेच  टिंकीचे बोलणे अगदी लक्षपूर्वक  ऐकत होते. कल्लू म्हणाला, “ टिंकी, तू तर खरंच, किती शहाणी झाली आहेस. शहरातला मधाळ गोडवा आणि  सुविचारांचा आमरस तू  ग्रहण केला आहेस.”
      यावर टिंकी पटकन म्हणाली, “ का नाही ग्रहण करणार! गोडवा ग्रहण करणं हे तर आमच्या  रक्तात आणि स्वभावातच  आहे. माणसांच्या स्वयंपाकघरात घुसतो, पण  आम्ही चटणी-मिठाला हात लावत नाही.   फक्त साखर-गुळावरच आमची नजर असते. म्हणजे, आम्हाला समाजात तिखट-मिठाचा फवारा  मारायचा नाही तर  गोडव्याचा शिडकावा करायचा  आहेहा गोडवा मला आपल्या नंदनवनातल्या  कानाकोपर्यात शिडकावयाचा  आहे. आणि या गोडव्याची कीर्ती फक्त शहरभर नव्हे तर  सार्या विश्वात पसरावयाचा आहे. ”
       तिचे हे गाेड  बोलणे नंदनवनचा राजा  सिंहराजदेखील ऐकत होता. तो टिंकीच्या ज्ञानाने ओतप्रोत भरलेल्या गोड  गोष्टीने भारावून गेला. त्याला टिंकीचा भारी अभिमान वाटला. त्याने तिला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
      आणि काय आश्चर्यकाही दिवसांतच टिंकीसोबत शिक्षित पशू-पक्ष्यांची एक फळी  सार्या नंदनवनला शिक्षित करायला पुढे सरसावली.

No comments:

Post a Comment