Thursday, February 4, 2016

ऑस्कर विजेते ठक्कर


       सत्यजीत रे,भानु अथैय्या,रसुल पुकुटी,ए. आर. रेहमान आणि गुलजारनंतर ऑस्कर अवॉर्ड विजेत्यांच्या यादीत आणखी एक नाव आता सामिल झाले आहे. ते नाव म्हणजे मुंबईत वाढलेले राहुल ठक्कर. त्यांना चित्रसृष्टीतल्या तंत्रज्ञान उपलब्धीवर या अवॉर्डने गौरवले जाणार आहे.
      राहुल ठक्कर आपल्या मित्रांसमवेत डिनर करत होते. त्यांच्या मोबाईलवर रिंग वाजली.नंबर ओळखीचा नव्हता. त्यामुळे त्याकडे त्यांनी कानाडोळा करत पुन्हा मित्रांसमवेतच्या गप्पांमध्ये दंग झाले.पण काही सेंकदातच त्यांच्या फोनवर एक मेसेज आला. पीकअप द फोन, यु हॅव जस्ट वॉन एन ऑस्कर. (फोन उचला, तुम्ही ऑस्कर जिंकला आहात.) त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्‍वासच बसला नाही. त्यांनी तो मेसेज पुन्हा एकदा खात्रीने वाचला. आणि मग त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. आता ते देशातल्या काही मोजक्याच लोकांच्या यादीत समाविष्ठ झाले होते. त्यांनी सिनेसृष्टीतला मैलाचा दगड ठरणारा मानाचा ऑस्कर जिंकला होता. आणि त्यांना त्या अवॉर्डने सन्मानित केले जाणार होते.सिनेमाला तंत्रज्ञानाशी जोडणार्‍या अशा या व्यक्तीविषयी जाणून घेताना आपल्या काही वर्षे मागे जावे लागेल.
      7 जुलै 1984 रोजी अमेरिकेतल्या इलिनोइसमध्ये राहुल ठक्कर यांचा जन्म झाला. मात्र त्यांचे पालण-पोषण, शिक्षण वैगेरे मुंबईत झाले. त्यांची आई प्रभा ठक्कर एक शिक्षिका होती. आणि वडील चंद्रकांत ठक्कर अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक. सिनेसृष्टीशी त्यांची पहिली ओळख वयाच्या अवघ्या तिसर्‍या वर्षांपासूनच झाली होती. मुंबई टिव्ही, चित्रपट आणि रेडिओ क्षेत्रात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका निभावत असतानाच पुढे वॉइस आर्टिस्ट म्हणूनही काम केले. इथे त्यांनी मुंबई विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्सची पदवी संपादन केली. यानंतर ते ऍनिमेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात मास्टरकी मिळवण्यासाठी अमेरिकेत निघून गेले.
     1994 मध्ये राहुल यांनी न्युयॉर्कमध्ये कमर्शियलरित्या विज्युअल इफेक्टसमध्ये काम करायला सुरुवात केली. काही कालावधीनंतर ते अमेरिकी फिल्म प्रॉडक्शन कंपनीच्या ड्रीमवर्क्सवर काम करायला सुरुवात केली. ते रिसर्च अँड डेवलपमेंट टीमचा हिस्सा बनले.इथे त्यांनी आणि त्यांचा सहकारी रिचर्ड चुआंग मिळून एक डिझाईन बनवलं. आणि विशेष म्हणजे या डिझाईनमुळेच त्या दोघांना  हा मानाचा ऑस्कर जाहीर झाला आहे. सायंटिफिक ऍन्ड टेक्निकल कॅटॅगिरीतला हा पुरस्कार 13 फेब्रुवारीला दिला जाणार आहे. बाकी अन्य श्रेणीतले ऑस्कर पुरस्कार 28 फेब्रुवारीला दिले जाणार आहेत. यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली होती.त्यांनी तयार केलेल्या ग्राऊंड ब्रेकिंग टेक्नॉलॉजीचा वापर 30 पेक्षा अधिक हॉलीवूड चित्रपटांमध्ये केला गेला आहे. यात एंटज,श्रेक,मॅडागास्कर, हाऊ टू ट्रेन यॉर ड्रॅगन, कुंग फू पांडा, लिजेंड ऑफ बॅगर वान्स, फोर्स ऑफ नेचर, मिशन इम्पॉसिबल-2 यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. राहुल आणि रिचर्ड यांनी बनवलेल्या तंत्रज्ञानामुळे उच्च दर्जाचे ऍक्शन चित्रपट बनवले जाऊ शकतात. चित्रपट निर्मितीदरम्यान कोणताही शॉट हाय रिजॉल्युशनमध्ये त्याचवेळी पाहिला जाऊ शकतो. याशिवाय यात हाय क्वालिटी ऑडियो आणि स्पीड चेंज कंट्रोलसारखे फिचरदेखील अंतर्भूत आहेत.
      ड्रीमवर्क्समध्ये काम केल्यानंतर राहुल यांनी ऍनिमेशनशी संबंधित ़विविध विभागातही काम केले आहे.यात पार्टीकल इफेक्ट्स, थ्रीडी, नेटवर्क मिडिया, थिएटर डिझाईन,प्लेबॅक सिस्टम आदींचा समावेश आहे. त्यांना प्रोडाक्ट डिझाईन आणि रिसर्च क्षेत्राचा 20 वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते अमेरिकी क्लाऊड क्ंप्युटिंग कंपनीच्या ब्राइयो सिस्टमध्ये रिसर्च ऍन्ड डेवलपमेंट विभागात वाइस प्रेजिडेंट आहेत.                                 



No comments:

Post a Comment