सध्या चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा मेसेज सोशल मिडियावर फिरत आहे. कुठल्या तरी अख्ख्या गावाने चिनी वस्तूंवर बहिष्कार घातले असल्याचे त्यातून
सांगितले जात आहे. जरा विचार केला तर खरेच यातून आपण घेऊ शकतो.
सध्या भारतीय बाजारपेठेत चिनी वस्तूने धुमाकूळ घातला आहे. स्वस्त वस्तू म्हणून त्याची आपण खरेदी करत आहे. पण यातून
आपण आपला पैसा चीनला देतो आहे. त्यामुळे साहजिकच त्यांची अर्थव्यवस्था
आपण बळकट करत आहोत. वास्तविक चीन आपला मित्रदेश कधीच राहिला नाही.
आपल्या देशाची प्रगती त्याला खुपते आहे. त्यामुळे
अनेक स्तरावर तो देश आपल्या भारताला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो आहे. अशा देशातील वस्तू खरेदी करून आपण त्यालाच पाठबळ देत आहोत. देशात, राज्यात जाती-धर्मासाठी
लोक एकत्र येत आहेत. मोर्चे काढत आहेत. एकीचे प्रदर्शन करत आहेत. याच लोकांनी देशासाठी एकी दाखवून
चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा. देशातील एकजुटीचे प्रदर्शन दाखवावे.
चीनने
1962 साली आपल्याशी युद्ध केले. त्यावेळी आपली
सैन्य संख्या उत्तरभागात तोकडी म्हणजे
10 ते 12 हजार होती. ती संख्या चीनच्या विशाल 80 हजार सैन्यासमोर फारच छोटी
होती. युद्धात आपले 1047 सैनिक घायाळ झाले
तर 1383 सैनिकांना वीरगती प्राप्त झाली. 1269 सैनिक बेपत्ता झाले तर 3968 सैनिक बंदी झाले.
युद्धात आपला पराजय झाला. परिणामी चीनने तिबेट
काबीज केला व आपला बराचसा भूभाग बळकावला. त्या युद्धात आपण धडा
घेतला.पुढे पाकिस्तान-भारत यांच्यात सहा
वर्षांनी म्हणजे 1971 मध्ये युद्ध झाले. तेव्हा मात्र पूर्व पाकिस्तान नष्ट झाला. त्यावेळी पंतप्रधान
इंदिरा गांधींनी बांगला देश घोषित केला. तेव्हापासून पाकिस्तान
भारतावर अधिकच आक्रमक होत गेला. भारताचा सर्वनाश हा एकच उद्देश
लक्षात ठेवून त्याने चीनचे सहाय्य घेतले व स्वत: अण्वस्त्रधारी
बनला.
आजही पाकची मदत घेत आहे. पूर्व पाकिस्तानचा बदला घ्यायचा
आहेच. तेव्हा काश्मीर हे भारतापासून वेगळे केल्याशिवाय गत्यंतर
नाही. याच भूमिकेत पाकिस्तानात सरकार कार्यरत असते. आजही त्याच्या कुरबुर्या सुरूच आहेत. यात चीन त्याला सहाय्य करतो आहे. पाकिस्तानने चीनला पाकव्याप्त
काश्मीरमधील काही भूभाग दिला आहे. तिथे चीन रस्ते बांधत आहे.
चीनला सीयाचीनच्या वरच्या भागातून पाकिस्तामध्ये प्रवेश मिळतो.
तो बलुचिस्तानमार्गे जातो. म्हणजे या मार्गाने
प्रवेश करून अरबी समुद्रात त्याला स्वत:च्या युद्धनौका प्रस्थापित
करून तिथे स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे म्हणून पाकिस्तान-चीन मैत्री दिसून येते. भारताच्या वाढत्या प्रभावावर
चीन खूष कसा राहणार? म्हणून भारताच्या युनोमधील स्थायी सदस्यावर
चीनचा नेहमी आक्षेप असतो. एवढेच नव्हे तर मध्ये (एनएसजी) एन.एस.जी. च्या मुद्यावरसुद्धा सगळे अण्वस्त्रधारी देशभारताला
पाठिंबा देत असताना चीनने विरोधच केला. न्युक्लीअर सप्लाय ग्रुप
मध्ये फक्त निवडक देश आहेत अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन यांच्या भारताला पाठिंबा आहे.
आता नुकतेच पाकिस्तानने काश्मीरमध्ये
उरी कॅम्प मध्ये दहशतवादी हल्ला करून 18 भारतीय सैनिक मारले.
या भ्याड हल्ल्याच्या विरोधात केंद्र सरकारने भूमिका घेतली होती की
’खून और पानी एकसाथ बहाया नहीं जायेगा’ म्हणजे
काश्मीर मधून सिंधू नदीचे ज ेपाणी पाकिस्तानला फुकट जाते त्या पाण्यावर सिंधू कराराप्रमाणे
अंकुश घालण्यात यावा. कराराप्रमाणे भारताच्या हिस्स्यातील
20 टक्के पाणी भारत रोखू शकतो. पाकिस्तान घाबरला.
परंतु त्याला लगेच चीनने साथदिली. चीनने ब्रह्मपुत्रेचे
पाणी रोखले. हा चीन भारताचा कधीच मित्र म्हणून राहिला नाही.
भारत व चीन लोकसंख्येने आता जवळ
जवळ आले आहेत. भारत हा विकसनशील म्हणून झपाट्याने प्रगती करत
आहे. भारत म्हणजे मोठी व्यापारपेठ आहे. जगाच्या बाजारपेठेच्या मानाने भारताची मोठी बाजारपेठ म्हणून गणल्या जाते.
येथे अमेरिका, चीन, जापान,
सारखे देश वस्तू पाठवून पैसा कमवतात. चीनची सुद्धा
अर्थव्यवस्था भारताच्या बाजार पेठेवर काही प्रमाणात नक्कीच अवलंबून आहे. अशा वेळी आपण सारे नागरिक मिळून चीनची अर्थव्यवस्था खिळखिळी करू शकतो.
चीनच्या वस्तू स्वस्त मिळतात म्हणून आपण वापरतो. चायनीज वस्तूंवर पूर्णणे बहिष्कार टाकणे, ही प्रत्येक
भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. विद्युत उपकरणे, मोबाईल, बॅटरी, फटाके, डेकोरेशन, खेळणी वगैरे कितीतरी वस्तू बाजारात दिसतात.
यासर्व गोष्टींवर बंदी आणायला हवी. आपले सैनिक
रात्रंदिवस चीनच्या सीमेवर पहारा देतात. एवढया थंडीत,
पाण्यात, बर्फात ते कुटुंबापासून दूर राहून स्वत:चा जीव धोक्यात टाकून आपले रक्षण करतात. त्यांच्यामुळेच
आपण सुखी जीवन जगत असतो. याची जाणीव प्रत्येक नागरिकाला व्हायला
पाहिजे.
आता दसरा-दिवाळी जवळयेत आहे. आपण दरवर्षीप्रमाणे आपले घर रंगवून
सजावट करतो. विद्युत रोशणाई करतो. त्यावेळी
प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे की चीनच्या वस्तू गांभीर्याने नाकारायला हव्या.
रोशणाईसाठी भरपूर चायनीच दिवे बाजारात असतील. दोन
दिवे कमी वापरले तरीही चालेल पण चीनच्या बनावटीचे दिवे नको, ही
भूमिका घ्यायला हवी. याचा परिणाम नक्कीच होईल. चीनलासुद्धा वाटायला पाहिजे की भारतात त्याच्याविरुद्ध लाट आहे. या लेखाचा उद्देश हाच की मोठया व्यापारांनीच याची दखल घ्यायला हवी.
म्हणजे चीनी वस्तू खुल्या बाजारात उपलब्ध राहणारच नाहीत. ही एकप्रकारची देशसेवाच होय. चीनी वस्तूंवर बहिष्कार
म्हणजे आपण आपल्या सैनिकांना आतून सहाय्य करतो. याउलट चीनी वस्तूंचा
वापार म्हणजे आपल्या सैनिकांचा अपमान करण्यासारखे होईल. हे प्रत्येकाने
लक्षात घ्यायला हवे.
No comments:
Post a Comment