Monday, October 28, 2019

दररोज काहीतरी नवीन शिका...

 माणूस जन्म घेतो, जग पाहतो आणि गोष्टी शिकतो.  पण तो जसजसा मोठा होत जातो,तसतशी त्याच्या मनातून उत्सुकता कमी होऊ लागते.  आपल्याला काहीतरी मोठे करायचे असेल, यशस्वी व्हायचे असेल तर दररोज काहीतरी नवीन शिकण्याची सवय लावली पाहिजे.  प्रत्येक मनुष्याला काहीतरी नवीन आणि मोठे करावेसे वाटत असते.  यासाठी प्रत्येकजण कठोर परिश्रम देखील करतो, परंतु आपणास हे माहित आहे की मोठे स्वप्न साकारण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळे करावे लागेल, जे इतरांपेक्षा वेगळे असेल.
बर्‍याचदा या स्पर्धेच्या युगात, एखाद्या व्यक्तीला रात्रीतून यशस्वी होण्याचे स्वप्न पडते.  इतरांना पाहून त्यालाही असे वाटते की, एका झटक्यात मी यशाची चव घेऊ शकतो.' आत्मविश्वास ही चांगली गोष्ट आहे, परंतु सत्याची जाणीव ठेवणे ही वेगळी गोष्ट आहे.  एखादी व्यक्ती अचानक यशस्वी झाली असे आपल्याला वाटत असेल तर  हा आपला गैरसमज आहे,हे लक्षात ठेवा. यशाच्या मार्गावर तो आपल्याला दिशाभूल करू शकतो.  यशस्वी होण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे सतत प्रयत्न करत राहणे. यासाठी आपल्याला दररोज काहीतरी नवीन शिकत रहावे लागेल. बऱ्याचदा लोक पुढे जाण्याच्या स्वप्नाची कदर करतात, परंतु शिकणे विसरून जातात.  थोड्याशा ज्ञानाने आम्हाला वाटत असते की, आपण सर्वज्ञानी झालो आहोत.  परंतु कोणताही माणूस एका रात्रीत सर्व गुणांनी परिपूर्ण होत नसतो, यासाठी, कुतूहल, जिज्ञासा असली पाहिजे, नवीन गोष्टी शिकण्यासाठी.  काहीतरी शिकण्यासाठी आपल्याला संस्थेत प्रवेश घेण्याची आवश्यकता नाही.  आपण इच्छूक असल्यास, आपण आपल्या आसपासच्या क्षेत्रातून बरेच काही शिकू शकता.
 शिकलेली प्रत्येक गोष्ट जीवनात उपयुक्त आहे.  फक्त गोष्टींकडे लक्ष ठेवण्यासाठी, तीक्ष्ण नजर ठेवण्याची गरज आहे. जर आपण भाषा, व्यवहार, ज्ञान, तंत्रज्ञान किंवा काही नवीन शिकलात तर आपले व्यक्तिमत्त्व निखरत जाईल.  जीवनात कुठेतरी या गोष्टीचा तुम्हाला नक्की फायदा होईल.  कधीकधी आपल्याला वाटेल की, हा एक लांब पल्ला आहे, परंतु हे अवघड नाही. यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या बर्‍याच जणांची प्रयत्न केलेली 'टीप' म्हणजे ते फक्त शिकत राहिले.  सुरुवातीला ज्ञानाच्या नावावर त्याच्या जवळ थोडेफार  होते, परंतु जेव्हा स्वप्नातील आत्मविश्वासाने तो दररोज एक नवीन गोष्ट शिकत राहिला, आणि मग तो यशस्वी झाला.  आपल्याला शिकण्यासाठी एक प्रकारची भूक असावी लागते,  मग तुम्हाला यशस्वी होण्यास कोण अडवू शकणार नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121010

No comments:

Post a Comment