Wednesday, October 30, 2019

संघटनेत ताकद असते

एकदा कबुतरांचा एक गट अन्नाच्या शोधात भटकला.  बराच वेळ उड्डाण करूनही त्यांना खायला काही मिळालं नाही.  'कंटाळा आला आहे.' सगळे कबूतर म्हणाले.
 कबुतरांना धैर्य देत त्यांचा मोरक्या  कबूतर म्हणाला की, 'आणखी थोडे प्रयत्न करो. आपल्याला नक्कीच काहीतरी मिळेल.'  पुढे गेल्यावर त्यांना जंगलात पुष्कळ धान्य विखुरलेले दिसले.  सर्व कबूतर खूष झाले आणि शेतात उतरे आणि दाणे टीपू लागले.  अचानक त्यांच्यावर मोठे जाळे पडले.  ते सर्व त्यात अडकले.  त्यांना काहीच कळेना काय करावे. तेवढ्यात त्यांना एक शिकारी त्यांच्याकडेच येताना दिसला.  सर्व कबूतर घाबरून गेले.

 मोरक्या कबूतर अत्यंत हुशार होता.  तो म्हणाला ,'या शिकाऱ्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे काही तरी करायला हवे. आपण सर्वांनी  आपल्या चोचीने जाळे पकडून एकत्र उडण्याचा प्रयत्न करू या. '  सर्व कबूतरांनी तेच केले आणि काय आश्चर्य! त्या सर्वांनी शिकारीच्या डोळ्यासमक्ष जाळ्यासह उडू लागले.  शिकारी मागे धावत राहिला,पण त्याला  कबूतर  काही हाताला लागले नाहीत. 
 मोरक्या कबूतर इतरांना म्हणाला की,' माझा एक उंदीर मित्र त्या डोंगरावर राहतो.  चला सर्व त्याच्याकडे जाऊया.  या सापळ्यातून बाहेर पडण्यासाठी तो आपल्याला मदत करू शकतो.' सर्व कबूतर त्या डोंगरावर पोहोचले.  बरेच कबुतरे पाहून उंदीर घाबरुन गेला.  मोरक्या काबूतरने त्याला सर्व कहाणी सांगितली आणि जाळे कुरताडण्यास सांगितले.  त्या उंदराने काही वेळातच जाळे कुरतडून टाकले आणि कबुतरांना जाळ्यातून मुक्त केले.  राजा कबूतर त्या सर्वांना म्हणाले,' आज आपल्या सर्वांच्या ऐक्यामुळे आपले प्राण वाचले आहेत.  म्हणून संघटनेची शक्ती विसरू नका.'
 मंत्र: संघटित प्रयत्न फलदायी असतात.

No comments:

Post a Comment