Tuesday, August 30, 2022

माणूस पुन्हा एकदा चंद्राकडे


अमेरिकेतील विज्ञान जगतात सध्या आनंदाची लहर उसळली आहे.  अमेरिकन अंतराळ संस्था नासा तब्बल पन्नास वर्षांनंतर पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर उतरवण्याच्या तयारीत आहे. या मोहिमेची पहिली टेस्ट फ्लाइट आर्टेमिस-1 फ्लोरिडाच्या स्पेस कोस्टहून प्रक्षेपित करण्यात येत आहे. या रॉकेटचे 29 ऑगस्टच्या सायंकाळी 6 वा.च्या सुमारास प्रक्षेपण होणार होते. पण रॉकेटच्या चार इंजिनांपैकी एका इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे त्याच्या प्रक्षेपणाची उलटगणती रद्द करण्यात आली. आता या प्रक्षेपणाला विलंब होणार आहे. नासाने अद्याप लॉन्च संदर्भात नवीन अपडेट दिलेले नाही.

आर्टेमिस-1 एक मानवरहित मोहिम आहे. या मोहिमेच्या माध्यमातून संशोधक अंतराळपटूंसाठी चंद्रावरील स्थिती योग्य आहे किंवा नाही हे तपासून पाहणार आहेत. तसेच ते चंद्रावर गेल्यानंर सुरक्षित पृथ्वीवर परत येतील की नाही हे याद्वारे तपासून पाहण्यात येणार आहे. नासाच्या माहितीनुसार, नवी स्पेस लॉन्च सिस्टम मेगारॉकेट व ओरियन क्रू कॅप्सूल चंद्रावर पोहोचेल. सामान्यत: क्रू कॅप्सूलमध्ये अंतराळपटू असतात. पण, यावेळी ते रिक्त असेल. ही मोहीम 42 दिवस 3 तास व 20 मिनिटांची आहे. त्यानंतर 10 ऑक्टोबर रोजी कॅप्सूल पृथ्वीवर परत येईल. स्पेसक्राफ्ट एकूण 20 लाख 92 हजार 147 किलोमीटरचे अंतर कापेल. युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो बोल्डरचे संशोधक जॅक बर्न्‍स यांच्या मते, आर्टेमिस-1 रॉकेट हेवी लिफ्ट असून, त्यात आतापर्यंतच्या रॉकेट्सच्या तुलनेत सर्वात शक्तीशाली इंजिन लागले आहे. ते चंद्रापर्यंत जाईल, काही छोट्या उपग्रहाना त्यांच्या कक्षेत सोडेल, त्यानंतर स्वत: कक्षेत प्रस्थापित होईल. 2024 च्या आसपास आर्टेमिस-2 च्या प्रक्षेपणाची योजना आहे. यात काही अंतराळपटू जातील. पण ते चंद्रावर पाऊल ठेवणार नाहीत. ते केवळ चंद्राच्या कक्षेत फिरून परत येतील. पण याचा अवधी थोडा जास्त असेल. त्यानंतर आर्टेमिस-3 ही अंतिम मिशन रवाना होईल. त्यातील अंतराळपटू चंद्राच्या पृष्ठभागावर उतरतील. ही मोहीम २0३0 च्या आसपास प्रक्षेपित होईल. या मोहिमेच्या माध्यमातून प्रथमच महिलांचा चांद्र मोहिमेत समावेश होईल. बर्न्‍स यांच्या माहितीनुसार, 'पर्सन ऑफ कलर'चाही (श्‍वेत वर्णियांहून वेगळ्या वर्णाचा व्यक्ती) क्रू सदस्यांत समावेश असेल. सर्वजण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाऊन पाणी व बर्फाचा शोध घेतील.

  1972 पासून एकही माणूस चंद्रावर गेला नाही, कारण त्याची गरज भासली नाही.  शीतयुद्धाच्या काळात चंद्रावर जाण्याची शर्यत शिगेला पोहोचली होती.  अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत युनियन युद्धात गुंतले होते, पण चंद्रावर एखादी वस्तू पोहोचवण्यात सोव्हिएत युनियनला यश आले असेल, पण अमेरिकेने आपल्या 17 प्रवाशांना चंद्रावर फक्त पोहचवलेच नाही तर त्यांना सुखरूप परत आणले.अमेरिकेच्या इतक्या मोठ्या यशानंतर सोव्हिएत युनियनने मानवी मोहिमेतून माघार घेतली आणि त्यानंतर कोणत्याही देशाला चंद्रावर जाण्याची गरज भासली नाही.

यावेळी वापरले जाणारे रॉकेट खूप शक्तिशाली आहे.  कॅप्सूलचा वापर अत्याधुनिक आहे.  कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील एरोस्पेस अभियंता लुईस जिया म्हणतात, "आम्ही अंतराळ-उड्डाण विज्ञान संशोधनाच्या नवीन युगात प्रवेश केला आहे. चंद्रावरील बर्फाचा शोध, किरणोत्सर्गाचा मानवी शरीरावर होणारा परिणाम याचाही शोध घेण्यात येणार आहे.  जपानचा एक लँडरही चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करेल, हा आतापर्यंतचा फक्त 700 ग्रॅमचा सर्वात हलका लँडर आहे.  जपानसाठी हे मोठे यश असेल.  नासाच्या मोहिमेला आर्टेमिस असे नाव देण्यात आले आहे, हे नाव ग्रीक पौराणिक कथेतून आले आहे, आर्टेमिस ही अपोलोची जुळी बहीण आहे. हे नासाच्या यशस्वी अपोलो कार्यक्रमाचा आधुनिक अवतार असल्याचे दर्शविते.  अपोलो कार्यक्रमांतर्गत मानव प्रथमच चंद्रावर उतरला.  योजनेनुसार, आर्टेमिस-2 अंतराळवीरांना चंद्राच्या कक्षेत घेऊन जाईल आणि एक फेरी काढेल.  त्यानंतर आर्टेमिस-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अंतराळवीरांचा एक दल उतरवेल.  2025 मध्ये किंवा त्यानंतर पहिल्यांदाच एक महिला चंद्रावर उतरणार आहे.

नासाने मानवाला चंद्रावर उतरवण्याची योजना आखली आहे जिथे पाणी किंवा बर्फ असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  खरंच, चंद्रावर पाण्याची व्यवस्था केली, तर मानवाला तेथे अधिक दिवस राहण्याची संधी मिळेल.  चंद्रावर हायड्रोजनच्या रूपात पाण्याचा शोध सुरू आहे.  7 डिसेंबर 1972 नंतर कोणीही मानव चंद्रावर उतरला नसल्यामुळे पुढचा माणूस जो चंद्रावर उतरेल तो नवा इतिहास घडवेल.पन्नास वर्षांपूर्वी नऊ मोहिमा चंद्रावर पोहोचल्या होत्या, त्यापैकी सहा मोहिमा मानवाने केल्या होत्या.  त्यानंतर चंद्रावरील माणसाची आसक्ती अचानक कमी झाली.  आता जगातील भारतासह किमान सहा देशांच्या अंतराळ संस्थांना चंद्रावर असं काही तरी शोधायचे आहे जेणेकरून मानवाला पुन्हा पुन्हा चंद्रावर जाण्याचे निमित्त मिळेल. जपान, युरोपीय अवकाश संस्था, भारत, चीन, इस्रायल हे सगळे देश पुन्हा चंद्राच्या प्रेमात आहेत, पण त्यामागे हेतू वेगळे आहेत. मंगळ किंवा इतर दूरच्या ग्रहांवर जाण्यासाठी चंद्राचा थांबा म्हणून वापर करण्याचा त्यांचा इरादा आहे. तेथील खनिज संपत्ती मोठी आहे. आपले इंधनाचे प्रश्न सोडवण्यासाठी मुबलक असा हेलियम 3 तिथे आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

9423368970

No comments:

Post a Comment