बॉलीवूड आणि भारतीय प्रेक्षक विदेशी बालांवर लट्टू झाल्याचं दिसतं. नाही तर या विदेशी बालांचं इतकं आयातीकरण झालं नसतं. आता प्रत्येक चित्रपटात विदेशी बाला देशी धूनवर थिरकताना दिसत आहेत. खरे तर विदेशी कलाकारांच बॉलीवूडमध्ये आयातीकरण तसं काही नवं नाही. पण आजकाल त्यात भलतीच वाढ झाली आहे. विदेशी ब्युटी तर यात आघाडीवरच आहेत. त्यांनी भारतीय प्रेक्षकांवर जादू केली असून त्यांना पसंद केलं जाऊ लागलं आहे.
'राजनीती' मधली सारा थॉम्पसन असो , अथवा ' काईट्स' ची बार्बरा मोरी. 'रॉकस्टार' मधील नर्गिस फाखरी असो किंवा 'एक था दीवाना' चित्रपटातील एमी जॅक्सन, त्यांचा तोंडावळा भारतीय वाटत असला तरी त्या परदेशातल्या आहेत. आजकाल छोट्या-मोठ्या भूमिकांसाठी विदेशी चेहरा असणं, सामान्य बाब झाली आहे. पण ऍक्ट्रेस म्हणूनही बॉलीवूडमध्ये त्यांचा वावर वाढला आहे. बॉलीवूड आता हॉलीवूडच्या वळणावर चालला असताना विदेशी ब्युटीसुद्धा बॉलीवूडमध्ये स्वतः ला एक्सपोज करायला उत्तेजित झाल्या आहेत. बॉलीवूडमधला हा बदल त्यांना मोहवून टाकत आहे.
कलाकार आणि निर्माता असलेल्या सैफ अली खानच्या गेल्याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'एजंट विनोद' मध्ये करिना कपूर लीड रोलमध्ये होती. तरीही सैफचे समाधान झाले नव्हते. त्यामुळे या चित्रपटात एक नव्हे तर दोन -दोन चेहरे त्याने आयात केले. त्यातली एक होती, इराणची मरियम जकारिया. हिने 'एजंट वोनोद' मध्ये करिनासोबत 'दिल मेरा मुफ्त का...' या गाण्यावर मुजरा डान्स केला आहे. इतकेच नव्हे तर सैफसोबत स्टंट दृश्येही दिली आहेत. दुसरी इंपोर्टेड सेक्सी एजंट म्हणजे मलिका हेडन. तिने सैफसोबत 'प्यार की पुंगी...' मध्ये डान्स केला आहे. शिवाय तिच्यावर 'आय विल डू द टॉकिंग... ' हे आयटम सॉन्गसुद्धा चित्रित करण्यात आले आहे.
कॅनडाची पोर्न स्टार सनी लियोन हिने 'डिपार्टमेंट' मध्ये आयटम सॉन्ग कारावा, म्हणून रामगोपाल वर्मा खूपच तिच्या मागे लागला होता. पण तिला पहिल्यांदा साईन केलेल्या महेश भट्ट यांनी तिला त्याचे स्वातंत्र्य दिले नाही. ती त्यांच्या 'जिस्म २' मध्ये काम करत आहे. अखेरीस ती न मिळाल्याने रामने ब्राजिलियन ब्युटी नतालिया कौरला आयटम गर्ल बनवले.
तिकडे सनी लियोन 'जिस्म २' द्वारा बॉलीवूड पडद्यावर आग लावायला निघाली आहे. 'बिग बॉस- सिझन ५' या रियालिटी शोमध्ये तिला इंट्री मिळाल्यावर ती खर्या अर्थानं प्रकाशात आली. यानंतरच तिचे पोर्न व्हिडिओ पाहायला भारतात एकप्रकारची स्पर्धा लागल्याचे सांगतात. तिच्यावर सर्वात अधिक इंप्रेस झाले होते ते, महेश भट्ट. पोर्न चित्रपटांशी ट्क्कर देऊ शकतील असे चित्रपट बनविणारे महेश भट्ट बिग बॉस-५' संपण्याची वाट न पाहता थेट 'बिग बॉस' च्या सेटवरच गेले आणि तिला 'जिस्म २' ची ऑफर देऊन टाकली. 'जिस्म२' हा बिपाशा बसूला हॉटेस्ट बनवणार्या आणि २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जिस्म'चा सिक्वल आहे. पण लियोन या चित्रपटात बिपाशाचीही मर्यादा ओलांडेल की नाही माहित नाही. मात्र तिने एका मुलाखती सांगितले होते की मी 'जिस्म २' मध्ये सेक्सी सीन करते आहे, पण सेक्स नाही. महेश भट्ट यांनी 'मर्डर २' साठी श्रीलंकन सुंदरी जॅकलिन फर्नांडिस शोधून आणली. तिच्यामुळेच 'मर्डर २' प्रदर्शनापूर्वीच हॉट बनला होता.
श्रीलंकेतून ऍक्ट्रेस आयात करण्याचा सिलसिला अजून सुरूच आहे. चंडी परेरा श्रीलंकन मॉडेल आणि ऍक्टर आहे. 'एक सिंहनी' चित्रपट केलेल्या चंडी परेराचे पालनपोषण ऑस्ट्रेलियात झाले आहे. चंडी जॅकलिनची बहीण आहे. सध्या तिचा मुक्काम मुंबईतच आहे. दुसरी एक श्रीलंकन ब्युटी आहे, ती गम्या विजयदासा ! ती २००९ ची 'मिस श्रीलंका' आहे. जॅकलिनच्या यशामुळेच ती बॉलीवूडमध्ये येण्यास उत्तेजित आहे. ती मनिष मानिकपुरीच्या छत्तीसगड नक्षलवादावर आधरित असलेल्या ' अलाप' चित्रपटात 'चढती जवानी... ' वर आयटम सॉन्ग करत आहे.
प्रसिद्ध हास्य अभिनेता चार्ली चॅपलीनची नात कियरा चॅपलीन राजश्री ओझा यांच्या 'चौराई' द्वारा भारतीय प्रेक्षकांसमोर येत आहे. कियरा 'जिक्यू' आणि 'एफएचएम' द्वारा जाहीर केल्या जाणार्या 'सेक्सी वूमन'च्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. विदेशी बालांचा ओढा पाहता आगामी काळात अशा विदेशी बालांची बॉलीवूड इंट्री अधिक असणार हे उघड आहे. शेवटी भारतीय प्रेक्षकांना त्या आवडू लागल्या आहेत. ते त्यांचे स्वागत करायला उत्सुक आहेत.

No comments:
Post a Comment