Wednesday, May 23, 2012

कुटुंबांवर मालिकांचा प्रभाव

   कुटुंबांवर मालिकांचा प्रभाव  एकत्र कुटुंब पद्धती मध्यमवर्गीयांमध्ये वाढत्या शहरीकरणाबरोबर कालबाह्य होत चालली आहे. जागेची अडचण हे यामागचं वरवरचं कारण असलं तरी मी आणि माझी बायको आणि पोरंकिंवा मी आणि माझा नवराअसा कोष तयार होत चालला आहे. एकत्र कुटुंबात जे संघर्ष होतात, ते प्रामुख्याने नात्यामधल्या भावनिक व आर्थिक संघर्षाशी संबंधित असतात. मात्र या संघर्षातून माणूस आता पळ काढताना दिसत आहे. वेगळे राहिलो की जबाबदा-या कमी होतील. आर्थिक सुबत्ता होईल अशी अनेकांची भावना असते. मात्र प्रत्यक्षात वेगळे राहिल्यावर जबाबदा-या वाढतात. खर्च वाढतो आणि टेन्शन वाढते. एकत्र कुटुंब पद्धतीत जबाबदा-यांची विभागणी होते. सवड मिळते. छंदांना जागा मिळते. म्हणजे कितीतरी त्याचे फायदे आहेत. पण समाजाचे व बाह्य घटकांचे मानवी मनावर इतके घट्ट परिणाम करतात आणि की तो या एकत्र कुटुंबापासून दूर जायला विवश होतो.      समाज मनावर परिणाम करणा-यांमध्ये घरातला इडियट बॉक्सआघाडीवर आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. टीव्ही आणि त्यातल्या मालिकांनी समाजस्वास्थ्य बिघडविण्याचे कंत्राट घेतले आहे. टीव्ही मालिकांमध्ये घडणा-या गोष्टी थोड्या फार फरकाने या समाजातही घडत असतात आणि समाजातील घटनांचं प्रतिबिंब या मालिकांमध्ये दिसून येतं. एकीकडे आपल्याकडे आता पूर्वीसारखी कुटुंब व्यवस्था राहिली नाही.      असं म्हणत असताना दुसरीकडे मात्र त्यावर या टीव्ही मालिकांचे आक्रमण होतंय हे मात्र आपण नाकारू शकत नाही. कदाचित कुटुंब व्यवस्था बिघडण्याचं एक कारण या टीव्ही मालिकाही आहेत, असं म्हणायला हरकत नाही. टीव्ही टाईमपास म्हणून बघता बघता आता तो गरजेचा झाला आहे. कुटुंबातलाच एक घटक झाला आहे. त्यामुळे त्यांचे पडसाद घरावर उमटणं साहजिक आहे. पकड घेतील अशाच घटनांचा भरणा यात असतो.      वास्तविक यात वास्तवाची जाण असायला हवी. पण तसं होताना दिसत नाही. या मालिका बघणारा वर्ग सामान्य स्त्री हा आहे. पण त्यांची थोडीफार बदलू पाहणारी मानसिकता हजारो योजनेमागे टाकली जात आहे. या मालिकेत जे काही चालले आहे ते खरेच वाटते. मालिका पाहणारा वर्ग सामान्य असला तरी मालिकांमध्ये असणारे चित्रण श्रीमंती थाटाचे असते. त्याच्याने स्त्रिया भारावून जातात. राहणीमान पाहून आजच्या तरुणावर त्याचे चुकीचे पडसाद उमटतात आणि मग सुरू होतो तो कोणत्याही मार्गाने पैसे मिळविण्याचा, श्रीमंत बनण्याचा ध्यास. आजची तरुण पिढी या मालिकांतून काही चांगलं शिकायच्याऐवजी नको त्या भ्रामक कल्पनाच आपलं मानते. यामुळे ती चुकीच्या वाटेवरून जाणे स्वाभाविक असतं. खरं तर या मालिका समाज जागृतीत महत्त्वाचा हातभार लावत असतात. त्यामुळे मन वेगळ्याच कोंडीत सापडतं. गोंधळलेली मनं कुटुंब उद्ध्वस्त करायला कारणीभूत होतात.      या मालिका पाहून जीवनातील संकटाशी, पेचप्रसंगाशी मुकाबला करताना काय करावं हे कळत नाही.  वास्तविक दूरदर्शन व छोट्या मोठ्या मालिका या लोकशिक्षणाचं साधन आहे. कारण आपल्या समाजात बहुसंख्य लोक निरक्षर आहेत. पण त्याचा योग्य त-हेने उपयोग करून घेतला जात नाही. खरं तर टीव्हीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं व लोक शिक्षणाची कार्ये झाली तर समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने ते चांगलं आहे.
dainik surajya, solapur 14/5/2012

No comments:

Post a Comment