Wednesday, May 30, 2012

हसत जगावे ६


किती वाजले?
आत्माराम मित्रांना परदेश प्रवासातल्या गोष्टी सांगत होते. अचानक म्हणाले," अरे हो, एक गोष्ट तर साम्गायची विसरलोच." असे म्हणून ते आपल्या आतल्या खोलीत गेले आणि एक भिंतीवर्चे घड्याळ आणले. ते भिंतीवर टांगत म्हणाले," हे घड्याळ जर्मनीत घेतलंय. याला कुकू क्लॉक म्हणतात. याची खासियत अशी की, दर तासाला एक चिमणी बाहेर येते आणि टाईम सांगून पुन्हा आत जाते.तिथल्या दुकानात या घड्याळाची किंमत खूपच महाग होती. एका फिरस्त्याकडून घासाघीस करून स्वस्तात हे घड्याळ आणले आहे. .... अरे! आता पाच वाजताहेत......"
सर्वांच्या नजरा घडयाळावर खिळल्या. काही वेळातच हलकेसे संगीत वाजले. आणि एक चिमणी बाहेर आली. तिने इकडे-तिकडे पाहिले आणि विचारले," किती वाजले?"                           -मच्छिंद्र ऐनापुरे, जत 



कुत्र्याचा भाऊ
"तुम्ही त्या दिवशी सांगत होतात की, तुमचे शेजार्‍याशी लांबचे नाते आहे म्हणून..."
" हो. हो, बरोबर! त्याचे काय आहे, आमचा कुत्रा ना त्यांच्या कुत्र्याचा भाऊ आहे."   



व्यायामाचे साहित्य
निधनानंतर काही दिवसांनी एका व्यापार्‍याच्या मृत्यूपत्राचे वाचन करण्यात आले. त्यात लिहिले होते- 'पत्नीच्या नावावर घर आणि बॅंकेतला सगळा पैसा, दोन गाड्या आणि माझा बिझनेस माझ्या एकुलत्या एक मुलाने सांभाळावा. नोकर गोविंदाने माझी ३० वर्षे सेवा केली आहे. त्याला पाच लाख रुपये देण्यात यावेत. आणि माझ्या मेव्हण्याला माझे व्यायामाचे साहित्य म्हणजे डंबेल्सट्रॅड मिल, योगासन करताना अंथरायचे बस्कर आणि मालिशचे तेल. कारण तो नेहमी म्हणतो की, जीवनात पैशापेक्षा तब्येत  महत्वाची आहे.'   



घाबरू नका!
आत्माराम हॉस्पीटलच्या पायर्‍या उतरून धावतच खाली येत होते. इतक्यात त्यांना तुकाराम भेटले. त्यांनी त्यांना अडवत विचारले," का रे, काय झाल? आणि असा धावत कुठे निघालास? आणि आज तर तुझे ऑपरेशन आहे ना?''
आत्माराम म्हणाला," अरे तुक्या सांगू तुला! आता नर्स सांगत होती की, घाबरू नका. छोटंसंच ऑपरेशन आहे. सगळं व्यवस्थित होईल."
"ती बरोबरच सांगते. यात घाबरण्यासारखं काय आहे." तुकाराम म्हणाला.
आत्माराम म्हणाला," ती मला नाही. डॉक्टरला म्हणत होती."    



बाँम्ब
पाकिस्तानातल्या एका माणसाने पोलिसांना फोन केला," मी इथल्या पार्कमध्ये बेंचवर बसलोय. आताच मी पाहिलं, इथे  माझ्यापासून काही अंतरावर एक बॉम्ब पडला आहे.मला सांगा, आता मी काय करू?"
पोलिस म्हणाला," बॉम्बवर लक्ष ठेवा. एक तासभर वाट पाहा. कोणी नेले नाही तर तुम्ही घेऊन जाऊ शकता."
                                                                                                             

No comments:

Post a Comment