एक दिवस माकड माणसाला म्हणाले," भावा, लाखो वर्षांपूर्वी तुसुद्धा माकडच होतास. मग आज एक दिवस पुन्हा एकदा माकड होऊन दाखवशील ना?"
ऐकून पहिल्यांदा माणसाला मोठं आश्चर्य वाटलं, पण नंतर म्हणाला," चल ठीक आहे. एक दिवसासाठी मी माकड बनायला तयार आहे."
माकड म्हणाले," तर मग तुझे कातडे मला दे. अनायसे मीसुद्धा एक दिवसासाठी माणूस बनेन." यावर माणूस तयार झाला.
माणूस झाडावर चढला आणि माकड ऑफिसला निघून गेला. संध्याकाळी माकड आले आणि म्हणाले," भावा, माझे मला कातडे परत दे. मला एका दिवसातच माणसाचा मोठा उबग आला."
माणूस म्हणाला," हजारो- लाखो वर्षांपासून मी माणूसच आहे, आता फार नाही, पण निदान शंभर वर्षे तरी तू माणूस म्हणून राहून दाखव."
माकड रडू लागले. -" भावा, इतका क्रूरपणे माझ्याशी वागू नकोस." पण माणूस तयार झाला नाही. तो झाडाच्या एका फांदीवरून दुसर्या फांदीवर, दुसर्यावरून तिसर्या, तिसर्यावरून चौथ्या असे करत तो अदृश्य झाला.
हताश होऊन माकड माघारी परतले.
आणि तेव्हापासून प्रत्यक्षात माणूस माकड आहे आणि माकड माणूस. ( अनुवाद- 'हिंदुकुंज' वरून)
No comments:
Post a Comment