सारखेपणा...!
गावही आता
शहरी वाटू लागलीत
जशी विमान प्रवासात
चांगली वाईट माणसं
शेजारी शेजारी बसतात...
मतदान केंद्रावरचा सारखेपणा
आता सर्वत्र दिसू लागलाय
दिवसेंदिवस वैशिष्ट्यहीन
होत चाललेली माणसम
सामान्यत्व आणि
विशेषत्व
विसरत चाललीत
समतेचे वारे जरूर वहावे
पण, व्यक्तिवैशिष्टाचा अस्त न व्हावा
वारीतून भक्त बाजूला पडू नये
२) टक्केवारी...!
समजत नाही
माणसम कशासाठी जगतात?
टक्केवारीने व्यापून
टाकलेल्या या जीवनात
देशासाठी, समाजासाथी अथवा
धर्मासाठी किती टक्के जगतात?
नोकरीच्या कार्यालयासाठी
किती टक्के जगतात!
बायकोसाठी किती?
पोरा-बाळांसाठी किती?
मग आत्मोन्नतीसाठी किती?
कोणत्याही हेतूच्या परिपूर्तीसाठी
जगणं नसतं तर त्या
जगण्याला अर्थ तरी किती असतो?
माणसं निदान स्वतः साठी तर जगतात का?
तेही नाही!
जगण्याची ओढ नसणारी!
माण्सम केवळ मोहाला
कवटाळून बसलीत
यात किती टक्के वाटा
आहे शरीर संवर्धनाचा!
झाडालाच किड लागली तर...
गावही आता
शहरी वाटू लागलीत
जशी विमान प्रवासात
चांगली वाईट माणसं
शेजारी शेजारी बसतात...
मतदान केंद्रावरचा सारखेपणा
आता सर्वत्र दिसू लागलाय
दिवसेंदिवस वैशिष्ट्यहीन
होत चाललेली माणसम
सामान्यत्व आणि
विशेषत्व
विसरत चाललीत
समतेचे वारे जरूर वहावे
पण, व्यक्तिवैशिष्टाचा अस्त न व्हावा
वारीतून भक्त बाजूला पडू नये
२) टक्केवारी...!
समजत नाही
माणसम कशासाठी जगतात?
टक्केवारीने व्यापून
टाकलेल्या या जीवनात
देशासाठी, समाजासाथी अथवा
धर्मासाठी किती टक्के जगतात?
नोकरीच्या कार्यालयासाठी
किती टक्के जगतात!
बायकोसाठी किती?
पोरा-बाळांसाठी किती?
मग आत्मोन्नतीसाठी किती?
कोणत्याही हेतूच्या परिपूर्तीसाठी
जगणं नसतं तर त्या
जगण्याला अर्थ तरी किती असतो?
माणसं निदान स्वतः साठी तर जगतात का?
तेही नाही!
जगण्याची ओढ नसणारी!
माण्सम केवळ मोहाला
कवटाळून बसलीत
यात किती टक्के वाटा
आहे शरीर संवर्धनाचा!
झाडालाच किड लागली तर...
No comments:
Post a Comment