Wednesday, April 4, 2012

सध्याचा काळ संक्रमणाचा

शिक्षणाच्याबाबतीत सध्याचा काळ संक्रमणाचा आणि जागरुकतेचा म्हटला पाहिजे. गेल्या दहा वर्षात पालक आपल्या पाल्याविषयी अधिकच जागरूक झाल्याचा दिसत आहे. शिवाय आयआयटीसारख्या वेगवेगळ्या आधुनिक शिक्षणामुळे निर्माण झालेली संधी पाहता पालक वर्ग आता पारंपारिक शिक्षणापासून परावृत्त होत आहे. मुलाला चांगले, दर्जेदार,  आधुनिक, वाढत्या इंग्रजीच्या धर्तीवर शिक्षण मिळावे, यासाठी पालकाची धडपड चालली आहे. टीवीवरील संगीत, गायन आणि नृत्य आदी कलांवरील आधारित रिऍलिटी शोजमुळे पारंपारिक शिक्षण पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. खासगी शाळा अथवा इंग्रजी शाळा पालकांचा हा ओढा लक्षात घेऊन या अदर ऍक्टीव्हीटीजवर भर देऊ लागला. खासगी शाळांमध्ये शिकत असलेल्या पाल्याचे पालक सुशिक्षित, पैसेवाले असल्याने शाळा सांगतील, त्या वस्तू पालक मुलांना घेऊन देऊ लागले. त्यामुळे या शाळांमध्ये या ऍक्टीव्हीटींजवर अधिक भर दिला जाऊ लागला. या उलट सरकारी शाळांमध्ये तीच पारंपारिक शिक्षण पद्धतीचा वापर होत राहिला. शिक्षक कलागुणांनी संपन्न असले तरी पालकांच्या गरीबीमुळे या ऍक्टीव्हीटीज ज्या भारदस्तपणाने, उत्साहाने  व्हायला हव्यात तेवढ्या आर्थिक चणचणींमुळे होत नाहीत. खासगी शाळांच्या या झकपकपणाला पालक भुलला आणि आपली मुले खासगीत घालायला धडपडू लागला. याच गोष्टींवर पालक सरकारी शाळांमध्ये खर्च करायला तयार होत नाही. असला तरी सगळ्याच मुलांची तितकी चांगली परिस्थिती नसते. त्यामुले मर्यादा येतात. आज  इंग्रजी स्पेलिंग, पाढे पाठांतर यातच अजूनही सरकारी शाळा निव्वळ अधिकार्‍यांच्या बुरसटलेल्या विचारामुळे अडकून पडल्या आहेत. वास्तविक आज मुले एसएमएस पाठवणं, मोबाईल हाताळणं सहजपणे करतो. आज शॉर्ट इंग्रजीमुळे इंग्रजी स्पेलिंग पाठांतराचे दिवस संपले आहेत. असे असतानाही तीच पारंपारिक पद्धती अवलंबली जात आहे. ही पद्धती आता नाकारायला हवी, सरकारी शाळांना भौतिक सुविधा झाल्या आता कला, शा.शि, व्यवसाय शिक्षक द्यायला हवेत आणि महत्त्वाचे म्हणजे शिक्षकांची अशैक्षणिक कामे थांबवायला हवीत. खासगी शाळांप्रमाणे क्लार्क, शिपाईंची भरती सरकारी शाळांमध्ये व्हायला हवी.

No comments:

Post a Comment