Sunday, April 29, 2012

रावणाची मंदिरे

     अन्य देवतांप्रमाणे रावणसुद्धा पूजनीय दैवत आहे.वाचून आश्चर्य वाटले असेल ना? परंतु रावणालासुद्धा देवता मानणार्याची संख्या कमी नाही.काही भक्तांना रामायणसारख्या महाकव्यातील रावण खलनायक वाटत नाही. उलट रावण त्यांना अराध्य दैवत वाटते.
     मध्यप्रदेशात एक गाव आहे.त्याचं नाव आहे,रावणगाव! विदिशा जिल्ह्यातील या छोट्याशा गावात दसर्याच्या दिवसातील भाविकांचा उदंड प्रतिसाद पाहिला कि आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. इथे रामायणातील रावण खलनायक नाही. तो भक्तांचा देवता आहे. ते श्रध्देने रावणाला बाबा म्हणतात.भाविक 'रावण बाबा नमः' चा जप करत त्याची पूजाअर्चा करतात. रावणराज या नावाने बनलेल्या येथील मंदिरात आपल्याला पहुडलेल्या स्थीतीतील रावणाची एक ऐतिहासिक मूर्ती दृष्टीस पडते.स्वतःला रावणाचे वंशज समणारे येथील कान्यकुब्ज ब्राम्हण यांचं म्हणणं असं कि, रावण अतिप्रचंड असा विद्वान होता.त्याच्यामध्ये असे काही विलक्षण गुण होते कि ते अनेकांना प्रेरणादयी होते. त्यामुळेच त्याची प्रतिकृती बनवून ती जाळणे योग्य नाही. या भावनेतूनच येथील भक्त खीर प्रसाद बनवून त्याच्या प्रतिमेला अर्पण करतात.
     रावणगावाशिवाय अशी आणखी काही ठिकाणं आहेत कि जिथे रावणाची मंदिरं आहेत. आणि तिथे त्याची मोठ्या श्रध्देने पूजा करतात. नेपाळ्,इंडोनेशिया,थायलंड्,कंबोडिया आणि श्रीलंकेतील लेखकांनी आपल्या रामायणात लिहिलं आहे कि रावण राक्षस्त्वाचा अतिरेक असला तरी त्याच्या चांगल्या गुणांकडे दुर्लक्ष करता येत नाही.रावणाची आई कैकसी राक्षसमुलगी होती. त्यामुळे तिच्या मुलात राक्षस गुण येणं स्वाभविक आहे.परंतु रूषीपुत्र असल्यामुळे त्याच्यात कुबेर गुण येणंही साहजिक आहे.त्यामुळे त्याला मूल्यसंस्कारसुध्दा आपोआप मिळाले.तो वडिलांप्रमाणेच भगवान शंकराचा परमभक्त होता.विद्वान, महातेजस्वी, पराक्रमी आणि रूपवंत होता.वाल्मिकी यांनीही त्याला चारी वेदांचा अभ्यासक मानले आहे.त्यांनी असंही लिहिलं आहे कि, 'अहो रूप्महो धैर्यमहोत्सव्महो द्युति:| अहो राक्षसराजस्य सर्वलक्षणयुक्तता ||' अर्थात रावणाला पाहून रावण मंत्रमुग्ध झाला होता.रूप-सैंदर्य,धैर्य्,कांती अशा सर्व लक्षणांनीयुक्त आहे.म्हणूनच काही लोकांना रावणाच्या गुणांचा गैरव केला पहिजे, त्याचे पूजन केले पाहिजे असे वाटते.त्याचा पुतळा जाळणे बरोबर नाही. यामुळेच त्याची पूजा करण्याच्या उद्देशाने काही ठिकाणी रावणाची मंदिरे उभारली गेली आहेत.
     मध्यप्रदेशातीलच मंदसोर जिल्ह्यातल्या रावणरुंडीमध्येसुद्धा पस्तीस फुटाच्या दहातोंडी रावणाच्या भव्य मूर्तीची २००५ साली प्रतिष्ठापना केली होती.दरवर्षी दसर्याच्यादिवशी त्याची मनोभावे पूजा येथील नामदेव वैष्णव समाज करतो.त्यांच्याम्हणण्यानुसार रावणाची पत्नी मंदोदरी इथलीच होती. या भावनेतून ते रावणाला आपला जावई मानतात्.या  समाजातील स्त्रिया मंदिर परिसरात चेहर्यावर पदर ओढून वावरतात्.राजस्थानातील जोधपूर मध्येही रावणाचे मंदिर आहे.येथे देव ब्राम्हणांची संख्या मोठी आहे. ते स्वतःला महर्षी मुद्गल समाजाचे मानतात्.महर्षी मुद्गल रावणाचे आजोबा महर्षी पुलस्त्य यांचे नातेवाईक होते. त्यामुळे त्यांची रावणावर मोठी भक्ती आहे. त्यांनीच इथे रावणाचे मंदिर बांधले आहे.असं म्हणतात कि,रावणाची पत्नी मंदोदरी मंडोर्ची होती. मंडोर जोधपूरची प्राचीन राजधानी होती.इथे एक मंडप आहे.याच मंडपात रावणाचा मंदोदरीचा विवाह झाला होता.त्याला रावणाची चंवरी म्हणून ओळखले जाते.जोधपूरच्या चांद्पोल येथील महादेव अमरनाथ आणि नवग्रह मंदिर परिसरात रावणाची मूर्ती आहे.

No comments:

Post a Comment