एक गरीब लाकूडतोड्या आपल्या पत्नी आणि सात मुलांसह एका छोट्या गावात राहत होता. घरात अठराविश्व दारिद्य असल्याने त्याचे दिवस मोठ्या हलाकीत जात होते. दिवसरात्र काबाडकष्ट करूनही तो मुला-बाळांना पोटभर अन्न देऊ शकत नव्हता. मुले मोठी होत होती, तशी त्याची परिस्थिती आणखीच बिकट बनत चालली होती. कधी कधी त्यांना अन्नही मिळत नव्हते. मुलांची तब्येतही वाळलेल्या काट्क्यासारखी दिसू लागली होती. लाकूडतोड्याला त्यांची दशा पाहवत नव्हती.
त्याने एक दिवस आपल्या पत्नीने सांगितले की, 'यापेक्षा सगळ्या मुलांना जंगलात सोडून येऊ. तिथे ते आपल्या जगण्याचा काहीतरी मार्ग शोधतील.' लाकूडतोड्याच्या पत्नीच्या डोळ्याम्त अश्रू दाटले. पोटच्या पोरांना आपल्यापासून वेगळे करण्याची कल्पनाच तिला सहन होत नव्हती. तिने त्याला खूप विरोध दर्शविला. पण शेवटी लाकूड्तोड्याच्या समजवण्यावरून ती तयार झाली. शेवटी ती तरी काय करणार होती, बिच्चारी! भुकेने तडफडून आपल्या डोळ्यांदेखत त्यांनी दम तोडण्यापेक्षा जंगलात काहीतरी खाऊन जगतील, असे तिला वाटले.
लाकूडतोडयाचे बोलणे थोरला मुलगा सोमनाथ लपून ऐकत होता. सकाळी लाकूडतोड्या सातही मुलांना घेऊन जंगलाच्या दिशेने निघाला, तेव्हा सोमनाथने आपल्या खिशात पुष्कळसे लाल खडे ठेवले.सगळे जंगलात पोहचले, तेव्हा सोमनाथने खिशातला एकेक खडा खिशातून काढून रस्त्यावर टाकू लागला. काही वेळाने लाकूडतोड्या दाट जंगालात आत आला. पाणी शोधण्याचा बहाणा करून मुलांना एका ठिकाणी थांबायला सांगून लाकूडतोड्या घरी माघारी परतला. मात्र तो मनोमनी खूप दु: खी होता.
सोमनाथ काही वेळाने आपल्या भावंडांसह रस्त्यावर टाकलेल्या लाल खड्यांच्या मदतीने पुन्हा घरी आला. लाकूडतोड्याला मुले घरी आल्याचे पाहून खूप आश्चर्य वाटले. शिवाय खूप दु:खही झाले. त्याला काय करावे समजेना! त्याने दुसर्यादिवशी पुन्हा मुलांसह जंगलचा रस्ता धरला. या खेपेला सोमनाथ घाईगडबडीत खिशात लाल खडे ठेवायचे विसरला. त्याला वाटेत एक भाकरीचा तुकडा दिसला. तो त्याचेच तुकडे करून रस्त्यात टाकू लागला. सातही मुलांना जंगलात सोडून लाकूडतोड्या माघारी परत आला.
सोमनाथ भावंडांसह घरचा रस्ता शोधत शोधत माघारी येऊ लागला. पण अचानक तो रस्ता चुकला. कारण रस्त्यात टाकलेले भाकरीचे तुकडे पक्षांनी वेचले होते. त्यामुळे तो घरी जाणारा रस्ता ओळखू शकला नाही. अशा प्रकारे सातही भावंडे जंगलातच हरवली. काही दिवसांनी राजनाथसिंह नावाची व्यक्ती लाकूडतोड्याच्या घरी आली. त्याने फार पुर्वी घेतलेले खुपसे धन व्याजासह लाकूडतोड्याला परत केले. आता त्याच्या घरात सर्वकाही होते. पण, त्यांना आता आपल्या मुलांची खूप आठवण येऊ लागली. त्यांची उणीव भासू लागली. त्यांना केल्या गोष्टीचा पश्चाताप होऊ लागला. लाकूडतोड्या आणि त्याच्या पत्नीने आपल्या सातही मुलांच्या शोधासाठी संपूर्ण जंगल पालथे घातले, परंतु त्यांची मुलेही काही सापडली नाहीत. आपल्याला कधी तरी आपली मुले भेटतील, या आशेवर लाकूडतोड्या आणि त्याच्या पत्नीने सारे आयुष्य जंगलात काढले.

No comments:
Post a Comment