खोटी स्तुती
गरुड आणि घुबडाची
भाडणं संपली
मित्रत्वाने वागण्याची
शपथ त्यांनी घेतली
एकमेकांच्या पिलांची
काळजी घ्यायची
नजर ठेवायची
नाही शिकार्याची
घुबड म्हणाले, गड्या
माझी पिलं छान
देशील ना मग
मित्रत्वाला मान
एके दिवशी
पिलं सापडली
गरुडाला मग
खुशी झाली
पिले होती
कुरूप घाणेरडी
विचार आला
नसावी ती घुबडाची
गरुडाने मग ती
गट्टम केली
घुबडाला खोट्टीस्तुती
अंगलट आली
सापळा
जंगलचा राजा सिंह
मरण पावला
आता राजा कोण?
प्राण्यांना प्रश्न पडला
राजा निवडीची
सभा झाली
वानराने पशूंस रिजवून
राजगादी मिळवली
कोल्होबाला गोष्ट ही
भलतीच खटकली
वानराची खोड मोडण्याची
डाळ त्याने शिजवली
एकदा कोल्होबाच्या
सापळा दृष्टीस पडला
'तिथे खूप खोबरे आहेत'
वानराकडे जाऊन म्हणाल
ऐकून वानराच्या तोंडाला
सुटले हो पाणी
दोघेही धावले
तिकडे लगोलगी
कोल्होबाने सापळ्यातले
खोबरे दाखवले
वानराने हात घालताच
कोल्ह्याने चाप खेचले
इच्छा झाली पुरी!
आईचा डोळा चुकवून
एकदा चांदोबा उतरला खाली
पृथ्वीवरच्या गमती-जमती पाहून
त्याची मती झाली खुळी
रंगी-बेरंगी भिंगर्या पाहून
एक भिंगरी त्याने खेचली
दगड घेऊन पाठी लागलेल्या
भिंगरीवाल्याने पाठ शेकवली
कण्हत चांदोबा नुसताच भटकला
भुकेच्या व्याकुळीने भेळगाडीशी थांबला
भेळपुरी पोटभर चरली,
पण पैशाअभावी पुन्हा पाठ शेकली
खजिल चांदोबा रस्त्यावर आला
गाड्यांच्या दुराने बेजार झाला
रडकुंडीला येऊन चांदोबा
आकाशात आईकडे पाहू लागला
चांदोबा सुटला आईकडे
म्हणाला, नको या गमती-जमती
आपण आहोत तिथे बरे
फिरण्याची हौस बाबा फिटली
गरुड आणि घुबडाची
भाडणं संपली
मित्रत्वाने वागण्याची
शपथ त्यांनी घेतली
एकमेकांच्या पिलांची
काळजी घ्यायची
नजर ठेवायची
नाही शिकार्याची
घुबड म्हणाले, गड्या
माझी पिलं छान
देशील ना मग
मित्रत्वाला मान
एके दिवशी
पिलं सापडली
गरुडाला मग
खुशी झाली
पिले होती
कुरूप घाणेरडी
विचार आला
नसावी ती घुबडाची
गरुडाने मग ती
गट्टम केली
घुबडाला खोट्टीस्तुती
अंगलट आली
सापळा
जंगलचा राजा सिंह
मरण पावला
आता राजा कोण?
प्राण्यांना प्रश्न पडला
राजा निवडीची
सभा झाली
वानराने पशूंस रिजवून
राजगादी मिळवली
कोल्होबाला गोष्ट ही
भलतीच खटकली
वानराची खोड मोडण्याची
डाळ त्याने शिजवली
एकदा कोल्होबाच्या
सापळा दृष्टीस पडला
'तिथे खूप खोबरे आहेत'
वानराकडे जाऊन म्हणाल
ऐकून वानराच्या तोंडाला
सुटले हो पाणी
दोघेही धावले
तिकडे लगोलगी
कोल्होबाने सापळ्यातले
खोबरे दाखवले
वानराने हात घालताच
कोल्ह्याने चाप खेचले
इच्छा झाली पुरी!
आईचा डोळा चुकवून
एकदा चांदोबा उतरला खाली
पृथ्वीवरच्या गमती-जमती पाहून
त्याची मती झाली खुळी
रंगी-बेरंगी भिंगर्या पाहून
एक भिंगरी त्याने खेचली
दगड घेऊन पाठी लागलेल्या
भिंगरीवाल्याने पाठ शेकवली
कण्हत चांदोबा नुसताच भटकला
भुकेच्या व्याकुळीने भेळगाडीशी थांबला
भेळपुरी पोटभर चरली,
पण पैशाअभावी पुन्हा पाठ शेकली
खजिल चांदोबा रस्त्यावर आला
गाड्यांच्या दुराने बेजार झाला
रडकुंडीला येऊन चांदोबा
आकाशात आईकडे पाहू लागला
चांदोबा सुटला आईकडे
म्हणाला, नको या गमती-जमती
आपण आहोत तिथे बरे
फिरण्याची हौस बाबा फिटली
No comments:
Post a Comment