गोष्ट खूप जुनी आहे. एकेकाळी एका गावात एक व्यापारी राहत होता. त्याच्याकडे एक गाढव होते. गाढव निर्बुद्ध होताच, पण हलक्या कानाचाही होता. दुसर्याने सांगितलेल्या गोष्टींवर पटकन विश्वास ठेवायचा. व्यापार्याला मात्र त्याचा फार मोठा त्रास व्हायचा.
एके दिवशी शेजारी राहणारा घोडा त्याला म्हणाला," मित्रा, तुझा मालक किती रे खतरुड आहे. सारखा तुला घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा कामाला जुंपलेला असतो. त्याचे काम कधी संपतच नाही."
त्यावर गाढवसुद्धा दु:ख व्यक्त करत म्हणाले," होय रे बाबा, पण काय करू नाईलाज आहे."
" माझे ऐक, उद्यापासून अजिबात काम करू नकोस. तुझा मालक आपोआप वञ्हणीवर येईल." घोड्याने त्याचे कान भरले. झाले! दुसर्यादिवशी गाढव कामासाठी तयारच झाला नाही. व्यापार्याला चार हळदीची पोती शहरात पोहचवायची होती. गाढव मालकाने सांगूनही उठले नाही, तेव्हा मालकाने हातात काठी घेतली. चार जोराचे रट्टे दिले. मग मात्र गाढव कण्हत कण्हत उठून उभे राहिले. मालकाने चारही पोती त्याच्या पाठीवर लादली. त्याला काठीने बडवत म्हणाला," चल, गाढव लेकाचा."
गाढव सावकाशपणे पावले टाकत निघाले. काही अंतर चालून गेल्यावर गाढव धाडकन खाली कोसळले. 'पाणी पाणी' म्हणू लागले. गाढवाच्या मालकाने कोठूनसे पाणी आणून पाजले, तेव्हा कुठे तो चालण्यालायक झाला. वाटेत त्याला त्याचा शेजारी मित्र घोडा भेटला. त्याच्या पाठीवरसुद्धा चार मोठ्या गोण्या होत्या. गाढवाने त्याला विचारले," मित्रा, काय घेऊन चालला आहेस?"
घोडा म्हणाला," मीठ आहे रे! शहरात रघूनाथ शेठला द्यायचे आहे. मला अजिबात चालवत नाही. जवळच्या नदीवर जरा डुबकी मारणार मग पुढे जाणार. त्यामुळे पाठीवरचं ओझंही हलकं होईल."
दोघे बोलत बोलत निघाले. इकडे त्यांचे मालकही गप्पा मारत निघाले. नदी आली. गोडा नदीत उतरत म्हणाला," व्वा! काय मज्जा येतेय. मस्त वाटतं आहे." त्याने पाण्यात एक डुबकी मारली. आणि आनंदाने ओरडला," अरे व्वा! एका झटक्यात अर्धे ओझे कमी झाले. " गाढवाने विचार केला. आपल्या मित्राचे ओझे एका डुबकीत अर्धे कमी झाले. तेव्हा मी दोन- चार डुबक्या मारल्या तर बरंच ओझं कमी होईल. मग निवांत चालता येईल."
गाढव नदीत उतरले आणि डुबक्या मारू लागले. काही वेळाने घोडा मात्र अंघोळ करून बाहेर पडला. गाढवाला आपला मालक येत असल्याचे दिसले. तसा तो पटकन नदीबाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला. पण हळदीच्या गाठी फुगून भारी जड झाल्या होत्या. गाढवाला पाठीवर डोंगर लादला असल्यासारखे वाटू लागले. तो कसा तरी बाहेर पडला खरा! पण लगेचच धाडकन खाली पडला. मालकाच्या सारा प्रकार लक्षात आला. तोही कपाळाला हात मारत खाली बसला.

No comments:
Post a Comment