घुबडाने आग्रह केला - हे माता लक्ष्मी ! मी तुम्हाला या घरावर अजिबात उतरवणार नाही. भव्य सजावटीसह अनेक घरांमध्ये तुमची पूजा पूर्ण भक्तिभावाने केली जात आहे. तरीही तुम्ही तुमच्या निवासासाठी हे साधे घर निवडले आहे. शिवाय, मी काल या घरावरून उडत जाताना या घरातला मुलगा आणि सून मोठ्या आवाजात आईशी वाद घालत असल्याचे ऐकले आहे. मग या घरावर का कृपादृष्टी. मला जाणून घ्यायचं आहे, देवीमाता.'
लक्ष्मीने हसून घुबडाची शंका सोडवली - 'घुबडा, तू घुबड ते घुबडच राहशील.वेडा कुठला. या घरात सुरू असलेला वाद ऐकलास, पण वाद का झाला हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाहीस. वादाचे मुख्य कारण - या घरात आधीच एक मुलगी आहे. सून पुन्हा दुसऱ्यांदा गरोदर राहिली आहे. तिची लिंग चाचणी घेण्यावरून वादाची परिस्थिती निर्माण झाली होती.
शेवटी कठोर निर्णय घेत आईने मुलाला आणि सुनेला अंतिम निर्णय दिला की माझ्या हयातीत या घरात कोणतीही लिंग चाचणी होणार नाही आणि स्त्री भ्रूणहत्याही होणार नाही.
आईचा निर्णय ऐकून मुलगा आणि सून माफी मागत म्हणाले -' आई ! आम्हालाही तेच हवे होते. फक्त तुझं म्हणणं जाणून घ्यायचं होतं. तुला नातवाची तर इच्छा नाही ना हे पाहत होतो. आता आम्हाला खूप आनंद झाला आहे. बाबांनीदेखील तुझ्या या निर्णयालाच पाठींबा दिला आहे.आता आम्ही दोघेही निश्चिन्त झालो.' हे ऐकून घुबड शांतपणे त्या घराच्या छतावर उतरले.- मीरा जैन (अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली)
No comments:
Post a Comment