चित्रपट कलाकारांसाठी लग्न आणि घटस्फोट या गोष्टी खूप सामान्य आहे. मात्र त्यांचे चाहते मात्र या गोष्टी फारच मनावर घेतात. साहजिकच आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटावर सोशल मीडियावर खूप प्रतिक्रिया आल्या. अनेक टिप्पण्या इतक्या जोरदार आणि कडवट होत्या की अमिरखानला पुढे येऊन चाहते आणि लोकांना त्यांच्या खासगी गोष्टींचा आदर करण्यास सांगावे लागले. ज्यावेळेला आमिर खान किरण रावच्या नवीन चित्रपटाची निर्मिती करताना दिसला तेव्हा गोष्टी सामान्य झाल्या.
आपल्या देशात क्रिकेट आणि बॉलिवूड सिनेमाचा चाहतावर्ग मोठा आहे. पूर्वी क्रिकेटचे सामने असले की लोक टीव्हीसमोर खिळून राहायचे. कार्यालये ओस पडायची. आता मोबाईल आल्याने टिव्हीवरचा ताण कमी झाला असला तरी क्रिकेट वेड काही थांबलेले नाही. तसेच सिनेमांचे आहे. पूर्वी सिनेमा रिलीज झाला की चित्रपट गृहासमोर हाऊसफुल्लचे बोर्ड लागायचे. चित्रपट कित्येक आठवडे आणि महिने चित्रपट गृहात राहायचे. मात्र टीव्ही, मोबाईल यांचा जमाना आल्याने चित्रपटगृहांवरची गर्दी कमी झाली असली तरी चित्रपटांची कमाई कमी झालेली नाही. शेवटी वेड ते वेडच. पूर्वी चाहते नाराज होऊ नयेत म्हणून नायिकेची कामं करणाऱ्या अभिनेत्री लवकर लग्न करत नसत. कारण त्यांना करिअर धोक्यात येईल,याची भीती होती. मात्र नंतर प्रेक्षकांनी अभिनेत्रीची लग्ने स्वीकारली. त्यामुळे आता नायिका म्हणून काम करणाऱ्या अभिनेत्री विवाहानंतर चित्रपटात काम करताना दिसतात. दीपिका पादुकोन, करीना कपूर आणि आता कॅटरिना कैफ ही काही उदाहरणे आहेत.
मात्र लोकांना चित्रपट कलाकारांच्या खासगी आयुष्याविषयी कमालीची उत्सुकता असते. कोण काय करतो, कोणाशी डेटिंग करतो, कोण काडीमोड घेतो याकडे त्यांच्या बारीक नजरा असतात. आता कित्येक कलाकार स्वतःहून आपले खासगी आयुष्य मोकळ्या मनाने खुले करताना दिसतात. कलाकार आता थेट चाहत्यांशी संवाद साधताना दिसतात. त्यामुळे चाहते त्याच्या चांगल्या- वाईट गोष्टींवर लगेच प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात. अमिरखान आणि किरण राव यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा लोकांच्या खूपच प्रतिक्रिया आल्या. त्याला धार्मिक वळणही मिळाले. दोघांनी घटस्फोट घेतला असला तरी ते अजूनही एकत्र काम करत आहेत. आमिरने आपल्या खासगी आयुष्याचा सन्मान करण्याची चाहत्यांना विनंती केली. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाची चर्चा थांबली.
मात्र अलिकडे हिंदी चित्रपटसृष्टीत घटस्फोटाचे प्रमाणही वाढले आहे. ताजे प्रकरण धनुष आणि ऐश्वर्या (रजनीकांत यांची मुलगी) यांचे आहे. यापूर्वी जेव्हा दोघांनी वेगळे होण्याची घोषणा केली तेव्हा धनुषच्या चाहत्यांना धक्काच बसला होता. दोघांनी जाहीर केले की ते 18 वर्षे एकत्र होते आणि आता ते वेगळे होत आहेत. दोघांनीही माध्यमांना त्यांच्या खासगी गोष्टींचा आदर करण्याचे आवाहन केले. दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि ऐश्वर्याने सोमवारी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत ते दोघे विभक्त होत असल्याची घोषणा केली. १८ वर्षांच्या सुखी संसारानंतर त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर धनुष सर्वत्र चर्चेत आला आणि ट्विटरवरही तो ट्रेंडमध्ये होता. धनुष आणि ऐश्वर्याच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. यादरम्यान राम गोपाल वर्मा यांनी या दोघांच्या घटस्फोट प्रकरणात उडी घेतली असून त्यांनी ट्विटद्वारे लग्न ही पूर्वजांनी लादलेली वाईट प्रथा असल्याचं म्हटलं आहे. राम गोपाल वर्मा यांनी पहिल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘घटस्फोटाचा आनंद संगीत ठेऊन साजरा करण्यात यावा. कारण यामुळे आपण एका बंधनातून मुक्त होतो. आणि दुसरीकडे लग्न हे गुपचूप केलं पाहिजे. कारण ते एकमेकांच्या धोकादायक गुणांची चाचणी करण्याची प्रक्रिया असते’.मात्र यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
मध्यंतरी मणिरत्नमच्या 'दिल से' मधील 'छैय्या छैय्या... ' या गाण्याने बॉलिवूडमध्ये आपला प्रवास सुरू केलेल्या मलायका अरोरा हिच्याही घटस्फोटाची चर्चा आयटम डान्ससाठी ओळखली जाते. 2010 मध्ये आलेल्या 'दबंग' चित्रपटातील 'मुन्नी बदनाम हुई...' या गाण्यावरील तिचे शेवटचे लोकप्रिय नृत्य. सोनी टीव्हीच्या इंडियाज बेस्ट डान्सर शोमध्ये जज म्हणून सक्रिय असलेली मलायका अरबाज खानपासून घटस्फोट आणि अर्जुन कपूरसोबतच्या जवळिकीमुळे चर्चेत आली. आता मलायका आणि अर्जुन कपूर एकमेकांपासून दूर होणार असल्याच्या चर्चा कानावर येत आहेत. मलायकाने याचे खंडन केले असले तरी ही चर्चा थांबायला तयार नाही. तिच्याकडे सध्या एकही चित्रपट नसल्याने तिच्या चाहत्यांना तिच्या आयटम सॉंगची प्रतिक्षाच करावी लागणार आहे.
'महाभारत' मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका केलेल्या नितीश भारद्वाज आणि स्मिता गाते बारा वर्षांच्या संसारानंतर विभक्त झाले आहेत.स्मिता गाते या सनदी अधिकारी आहेत. या दोघांनी 2019 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिणेकडील सुपरस्टार अभिनेता चिरंजीवी याच्या मुलीने म्हणजेच श्रीजा अभिनेता पती कल्याण हे दोघेही घटस्फोट घेणार असल्याचे चर्चा आहे.याआधी समंथा रुथ आणि प्रभू या अभिनेत्रींनीही वेगळे होण्याची घोषणा केली होती. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment