कावळेमामा
कावळेमामांनी विचार केला
आपण आता सिनेमात जाऊ
सार्यांना गाणे ऐकवून
खूपसा सन्मान मिळवू
खरेच! त्याचं नशिब पालट्लं
एका सिनेमात काम मिळालं
त्याचं गाणं ऐकून
जग सारं बुचकाळ्यात पडलं
शेवटी रहस्य उमगलं सार्यांना
जे गाणं त्यानं होतं म्हटलं
कोकिळेच्या गोड स्वरात
डायरेक्टरनं चित्रीत होतं केलं - मच्छिंद्र ऐनापुरे, जत
सांगा पाहू कोण?
काळा लांब एक चोर
चालता चालता गायब होतो
सभोवताली लाकडी पेहराव
सांगा पाहू कोण तो ? ( पेन्सिल)
लहान- मोठे तीन भाऊ
दिवस-रात्र फिरत असतात
मात्र बाहेर ते पड्त नाहीत
जग त्यांचं चारभिंतीच्या आत ( घड्याळ )
काचेचा एक महाल
त्यात जळते एक मशाल
यात ना राजा- राणी
सांगा पाहू कोणता माल ( बल्ब)
एका चोराचं शरीर हो पांढरं
डोकं आहे हिरवंगार
अर्धानिम्मा गाडला जातो
मार देतो तिखटजार ( मूळा) - मच्छिंद्र ऐनापुरे, जत
टीव्ही
उंदराने दिला सल्ला
थांबा , माकड्मामा जरा
ऐका गोष्ट माझी
सोडा आता ड्रामा सारा
कुठवर राहता सडे एकटे
ते तरी आज सांगा मला
गोष्ट सांगतो भल्याची
छानशी मामी आणा मला
माकड म्हणाले, उंदीर बाळा
कशी आणू रे मामी
सारा पैसा जोडून जोडून
कालच आणला टीव्ही - मच्छिंद्र ऐनापुरे, जत
उंदीरमामाची करामत
हत्ती तलावात
डुंबत असतो
मजेत तुषारे
झेलत असतो
इतक्यात उंदीरमामा
येतात बापुडे
म्हणतात हत्तीदादा
या इकडे
हळूच हत्तीदादा
बाहेर येतात
मामा म्हणतात,
काही नाही जा परत
काय झालं रे ?,
हत्तीदादा पुसतात
हरवलेली चड्डी शोधतोय,
उंदीरमामा म्हणतात - मच्छिंद्र ऐनापुरे, जत
बालकविता खरंच जर ... . !
खरंच जर
चमत्कार अस्ता झाला
खूप झाडाला लकडला पैसा
तोडून घ्यायचे
मजेत राहयचे
खूप सारे जग फिरायचे
तर्हेतर्हेची
खेळ- खेळणी
आणले अस्ते भरभरूनी
खूप सुंदर
बालपण अस्ते
उणिवांना जागा नस्ते
मम्मी पप्पा
रागावले नस्ते
आपले स्वप्न भंगले नस्ते - मच्छिंद्र ऐनापुरे
झाड
दाट झाडाची
अदभूत छाया !
कडक उन्हात
आमचं रक्षण
थकल्या पाथकास
त्याचं निमंत्रण
हिरवीगार त्याची
त्याची काया !
सगळ्यांना ते
उपयोगी पडते
फळा-फुलांनी
छान दिसते
देव समान
त्याची माया! - मच्छिंद्र ऐनापुरे, जत
No comments:
Post a Comment