Saturday, December 17, 2011

सेलफोनने फैलावतो बॅक्टेरिया इंफेक्शन

      सेलफोन आणि मोबाईलचा वापर ज्या गतीने वाढत आहे, तितक्याच गतीने लोकांमध्ये संक्रमणाच्या समस्यांचा ग्राफसुद्धा वाढत आहे.अस्वच्छ हातांनी सेलफोनचा वापर केल्याने आपल्या हातांबरोबरच आता मोबाइलसुद्धा बॅक्टेरियाचा वाहक बनला आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. अलिकडेच ब्रिटनच्या संशोधकांनी सेलफोन वापराबाबतचा एक सर्वेक्षण रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध केला आहे.
      लंडन युनिवर्सिटीच्या क्विन मेरी आणि लम्डन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडीसीनच्या अभ्यासकांनी ब्रिटनच्या १२ शहरांमधील ३९० सेलफोनचे आणि हातांचे  नमुने तपासणीसाठी  घेतले होते.या नमुन्यांचे प्रयोगशाळेत परीक्षण करून एनालिटिकल रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.
      नमुन्यांच्या प्राप्त परिणामांचा विश्लेषणानंतर असा  निष्कर्ष समोर आला आहे की, नमुन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विभिन्न प्रकारचे जीवाणू आहेत.    सेलफोनची तपासणी केल्यानंतर प्रत्येक सहामधील एकात हा कोलाई बॅक्टेरिया मिळून आले. ज्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते, त्यांपैकी ९५ टक्के लोक दिवसभरात फोन आणि ८२ टक्के हातांवर जीवाणू मिळून आले. यांतील जवळजवळ १६ टक्के हात आणि १६ टक्के फोनवर ई कोलाई बॅक्टेरिया सापडले. हा बॅक्टेरिया पोटाच्या तक्रारी उत्पन्न करणारा म्हणून ओळखला जातो. ज्यांच्या हातावर बॅक्टेरिया मिळून आला, त्यांच्या सेलफोनवर बॅक्टेरिया असण्याची शक्यता तिपटीने वाढली असल्याचे सांगितले आहे. बाथरुममध्येसुद्धा सेलफोनचा वापर करणार्‍या लोकांच्या फोनवर  बॅक्टेरियाची उपस्थिती दिसून आली.
      बॅक्टेरियाच्या वृद्धीसाठी सेलफोन अनुकूल ठिकाण असल्याचे लंदन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसीनचे डॉ. रॉन कटलर यांचे म्हणणे आहे. आपण जितका अधिक काळ फिनवर बोलत राहू, तितके ते अधिक गरम होत जातात. बॅक्टेरिया हातांवर आणि तेही कुठल्याही परिस्थितीत कित्येक तास जिवंत राहू शकतात. विशेषतः सूर्य प्रकाशाच्या उष्ण तापमानावर ते अधिक काळ जिवंत राहून मोठ्या गतीने वाढत असतात. हे जीवाणू दरवाजाचे हँडल, अन्न आणि सेलफोनच्या स्पर्श मध्यमातून सहजगत्या स्थलांतरित हो ऊ शकतात. पोटात गेल्यावर हेच जीवाणू डायरिया, पोटदुखी, उलटी- जुलाबसारखे आजार उत्पन्न करतात. गंभीर प्रकरणात हे मृत्यूलासुद्धा कारणीभूत ठरू शकतात. संशोधकांनुसार , दर वर्षी पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या ३५ लाख मुलांचा मृत्यू निमोनिया आणि दायरियाच्या कारनाने होतो. स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास हे प्रमाण किती तरी प्रमाणात कमी करता येऊ शकते.
      आरोग्य तज्ज्ञांनुसार शौचालयास जाऊन आल्यानंतर हात दोन्ही बाजूंनी स्वच्छ साबणाने धुणे आवश्यक आहे. हात धुताना बोटे आणि नखे यांचा आतील भाग चांगल्याप्रकारे घासून स्वच्छ धुवावा. बोटांमध्ये अंगठी किंवा आनखी काही असेल तर हात धुण्यापूर्वी ती काढून हात धुवावेत. अंगठी अथवा अन्य चिजासुद्धा स्वच्छ धुवून घ्याव्यात.
      जीवाणूंचा प्रसार कमी करण्यासाठी सेलफोन किंवा कामाची ठिकाणे अशा सेल्यूशनने स्वच्छ करावीत, ज्यात कमीत्र कमी ६० टक्के अल्कोहोल असावे, असेही आरोग्य चिकित्सकांचे म्हणणे आहे.   

No comments:

Post a Comment