आपण आपले घर स्वच्छ व नीटनेटके ठेवतो. स्वता: च्या वैयक्तिक स्वच्छतेबाबतही आपण जागृत असतो. पण आपला परिसर आणि सार्वजनिक ठिकाणांबाबत मात्र आपण निष्काळजी असतो. परंतु वैयक्तिक स्वच्छतेबरोबर सार्वजनिक स्वच्छता राखणे तेवढेच महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. सार्वजनिक रुग्णालये, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, बागबगिचा, चित्रपट्-नाट्यगृहे, मंदिरे या ठिकाणी प्रचंड अस्वच्छता असते. त्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात आपला सतत वावर असतो. हा परिसर स्वच्छ राहिल्यास डास, माशा अथवा अन्य रोग जंतूंचा फैलाव होणार नाही. रोगाचा प्रसार होणार नाही. त्यामुळे हा परिसरसुद्धा स्वच्छ राखणे आपले कर्तव्य आहे. अनेकदा आपण अनावधानाने खाद्यपदार्थांची पाकिटे, कागद, खराब झालेली फळे जिथल्या तिथे टाकत असतो. आपल्याजवळचा टाकाऊ पदार्थ जाग्यावरून उठून कचराकुंड्यांमध्ये टाकल्यास केरकचरा होणार नाही, सार्वजिक जागा स्वच्छ राहतील. त्यामुळे आपल्याच मनाला प्रसन्न वाटेल. त्यामुळे थोडे कष्ट पडत असतील, तर घ्यायला हरकत नाही. नागरिक म्हणून ते आपले कर्तव्य आहे. काही महाभाग मात्र तिथेच पान, गुटखा आणि मावा-तंबाकू खाऊन थुंकतात. परिसर तर घाण होतोच शिवाय एक नकोशी दुर्गंधीही पसरते. थुंकताना अनेकांच्या अंगावर शिंतोडे उडतात. याची अजिबात फिकीर न करणारी माणसे आहेत. अशा मंडळींना नागरी कर्तव्याची जाण आणून देण्याची गरज आहे. बसमध्ये अथवा अन्य वाहनांमध्ये बसलेली थुंकेबाज मंडळी मागे-पुढे न पाहता सरळ खिडकी बाहेर थुंकत असतात. सरकारने सार्वजिक धुम्रपान, नशापानबंदीची काटेकोर अंमलबजावणी करायला हवी. अशा मंडळींना सिक्षा झाल्याशिवाय अद्दल घडणार नाही. सार्वजनिक ठिकाणी काही स्वतःला नियम घालून घ्यायला हवेत. सार्वजनिक स्वच्छतेचे भान ठेवायला हवे. विश्रांती घेताना स्वच्छतेचे भान ठेवत नाहीत. तेथे बसूनच थुंकणे, शिंकरणे, धूम्रपान करणे, विड्यांचे थोटके टाकणे, काही खाल्ल्यास खरकटे, कॅरिबॅग कागद तेथेच टाकणे. टाईमपास करण्यासाठी बसणे, विचित्र हावभाव करणे आदी गोष्टी केल्या जातात. महिला लहान मुलांना तिथेच शौचास, लघुशंकेस बसवतात, असे कार्यक्रम तेथेच जवळपास पार पाडले जातात. मोबाईलवर जोरजोराने बोलून इतरांना उपद्रव करणे. नाकात, कानात, दातात किळसवाणे बोटे घालणे इत्यादी प्रकार करतात.
काही मंडळींना दुसर्याला त्रास देण्यात, दुसर्याच्या झालेल्या फजितीवर मनमुराद हसने, आसुरी आनंद मिळवण्यात मजा येत असते. मात्र त्यांनी आपल्यावरसुद्धा असा प्रसंग येऊ शकतो, याचे भान ठेवायला हवे. कागदाच्या एका बाजूला काहीतरी लिहायचे आणि त्याचे दुसरे बाजूला च्यूइंगमसारखे चिकट पदार्थ लावून बेंचवर ठेवतात. अनवधनाने एखादी व्यक्ती त्यावर बसली व त्याचे पार्श्वभागाला कागद चिकटून गेल्यावर त्यात आनंद मानणारी विशेषतः युवा मंडळी असतात. नागरी शिस्तीचे, कर्तव्याचे आणि नियमांचे आपल्याला भान असले पाहिजे. सार्वजनिक मालमत्ता आपलीच संपती आहे, असे मानून स्वच्छतेच्या संबंधातील आपलीही जबाबदारी लक्षात घ्यायला हवी. - मच्छिंद्र ऐनापुरे, जत

No comments:
Post a Comment