यमाच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने स्वर्गलोकात दरबार भरला होता.सगळे देवलोक आपाअपल्या सिंहासनावर विराजमान होते. त्याचवेळी मृत्युलोकातून तीन जिवात्मे दरबारात आले. आणि आपल्याला स्वर्ग मिळेल का नरक याचा लेखाजोखा पाहण्यासाठी वाट पाहत उभे राहिले. यातील एक सावकाराचा जिवात्मा होता.तर दुसरा सराफाचा आणि तिसरा एका चोराचा जिवात्मा होता.
यमराज म्हणाले, आज माझा आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे सगळ्यांच्या इच्छा पुर्ण होतील. मग यातला कोणी पापी असेल अथवा सज्जन. सगळ्यांना त्यांच्या मागणीनुसार सारे काही मिळेल्.सावकार म्हणाला , मी खाली दहा लाख सोडून आलो आहे, पुढच्या जन्मी मला ते दसपट मिळाले तर बरं होईल.यमराजने हात उंचावत म्हटले ,तथास्तू.सराफ दुकानदार म्हणाला, मला जास्त काही नको, पण मी सोडून आलेले सोनेनाणे, हिरे-मोती मला पुन्हा मिळावे एवढीच माझी इच्छा आहे.
तुझ्या मनासारखं होईल, असे म्हणत यमराजने चोराकडे पाहिले.चोर म्हणाला, मला अजिबात काही नको, फक्त या दोघांचे खरेखुरे पत्ते द्या.

No comments:
Post a Comment