Sunday, December 11, 2011

ऑनलाइन गेम्सचा फंडा

                       एक काळ असा होता की, खेळायची इच्छा झाल्यास पहिल्यांदा वेळ आणि सोय पाहिली जायची. खेळायसाठी सकाळ किंवा संध्याकाळची वेळ योग्य मानली जायची. मुलांची टोळी एकमेकांना हाका मारत, ओरड्त ठिकाणावर पोहोचायची. मग रंगायचा दंगा-मस्तीत खेळ.
    पण आता काळ्-वेळानं मुलांना जखडून टाकलंय की जसं काही मुलं मैदानात जाऊन खेळायचं पार विसरून गेलीत. मात्र आता त्यांच्या दिमतीला ऑनलाईन गेम्स आहेत. जी कमीत कमी अभ्यासानंतर का होईना रिफ्रेश व्हायला संधी देतात.
    कॉम्प्युटरच्या अविष्कारानंतरच त्यावर खेळ खेळले जाऊ लागले. १९५० ते ६० च्या दशकात निमरॉड ( १९५१), ओएक्सओ ( १९५२), पेसवार ( १९६१) सारख्या व्हिडिओ आणि कॉम्प्युटर गेम्स लोकांना खेळायला मिळायचे. हे खेळ एकट्याला अथवा जास्तीत जस्त दोघांना मिळून एका कॉम्प्युटरवर खेळता येत असत. म्हणजे हे खेळ शेअरिंग करून खेळले जाऊ शकत नव्हते.
    १९७० च्या सुरुवातीला ' प्लोटो टाइम शेअरिंग सिस्टम' ची निर्मिती इलिनिएस विश्वविद्यापीठ आणि कंट्रोल डाटा कॉर्पोरेशन यांनी मिळून केली. याने मुलांना एकाच वेळेला अनेक लोकेशन्सशी जोडता येऊ लागले. हे स्वातंत्र्य खेळालाही उपयोगास आले. आता अनेक खेळाडू असलेले गेम्स बनण्यास सुरूवात झाली. याला ऑनलाईन शेअरिंग गेम्सची सुरूवात म्हणता येईल.
    आज ऑनलाइन गेम्सचा असा काही भरमार सुरू आहे की, बोलायची सोय राहिलेली नाही. कुठलीही साईट घ्या, ती गेम्सशिवाय पूर्णत्वास जाऊ शकत नाही. त्याच्याशिवाय या साईट स्वतः ला सेफ समजत नाहीत. मग ते ibibo.com  असो किंवा facebook.com    सगळ्याच सोशल नेटवर्किंग साईट आपल्या युजर्संना गेम्स ऑप्शन देताहेत. कारण युजर्स कंटाळू नयेत आणि खेळामुळे का असेना त्यांच्या साईटशी निरंतर जोडलेले राहतील.
    फेसबुकने आपल्या युजर्संसाठी खुपशा गेमिंग ऑपशन्स दिल्या आहेत. मुलं तर त्यांच्याशी जोडले गेल्यास भरपूर लुप्त उठवताना दिसतात. मग ' फार्माविला' असो अथवा ' क्राइम्सिटी' ! मुलं गेम खेळण्याचा मनसोक्त आनम्द लुटत असतात. या खेळाची आणखी एक खासियत अशी आहे की, लांब बसूनही एकमेकांना जोडले जाऊ शकते. 'फार्मविला' मध्ये शेती करताना भेटीदाखल फळभाज्या देता येऊ शकतात. तर ' क्राइम सिटी' खेळताना आपल्याला घर बनवताना आपल्या मित्राकडून सिमेंट मिक्सर मागवण्याची गरज पडू शकते.
    सगळे सोशल नेटवर्क गेम बनवणार्‍या कंपन्यांशी जोडले गेले आहेत.  यामुळे युजर्संना गेम्सच्या अनेक ऑपशन्स मिळत राहतात. तुम्ही आवडीच्या गेमवर क्लिक करता, तेव्हा लागलीच तुम्ही गेम प्रोवाइडरशी जोडले जाता. मग जितके हिट त्या गेमला मिळतील, तितकी ती गेम पॉप्युलर होत जाते. फेसबुक तर आपल्या युजर्संना आजकाल कुठल्या गेम्स पॉप्युलर आहेत आणि कुणाला किती हिटस मिळताहेत, हे सांगत राहते. काही तर निव्वळ गेमिंग साईट्स आहे. उदा.  Zapak.com  सारख्या. इथे ढिगानं ऑनलाईन गेम्स तुमची वाट पाहात आहेत.
    पण मुलानों, या गेम्सच्या काही खासियत तर आहेतच पण काही धोकादायकही आहेत. या गेमच्या नादात त्यातच डुंबून जाऊन वास्तव भान विसरून जाता कामा  नये.  यामुळे एकाकीपणा कमी होण्यापेक्षा वाढत जातो. अचानक लाईट गेल्यास किंवा सिस्ट्ममध्ये काही बिघाड झाल्यास चिडचिडेपणा वाढतो. त्यामुळे काही कारणाने गेम अर्धवट राहिल्यास गेमचा विचार तिथेच सोडून खुल्या वातावरणात स्वतःला आणा. मनाने फ्रेश व्हा. पण एक आहे, या गेम्स तुम्हाला एखादी वस्तू शेअर करायला प्रवृत्त करतात.
    सध्या ऑनलाइन गेम्सचेसुद्धा अनेक प्रकार आहेत. पजल गेम, प्लॅश गेम, वार गेम, कार गेम, सुडोकू, बाइक गेम्स आणि अशा आणखी किती तरी गेम्स आपल्या दिमतीला आहेत. इथे काही साईटस दिल्या आहेत. इथे जाऊन मनसोक्त  काही गेम खेळता येतात.  हां पण एक ध्यानात ठेवा, गेम्स फ्री आणि सेफ आहेत का ते पहा. काही साइटस गेमच्या बदल्यात पैशांची डिमांड करतात. अशा साइटसपासून दूर राहा. नाही तर तुम्हाला मिळणार्‍या पॉकेटमनीवर पाणी सोडावे लागेल. मम्मी-पप्पा यांच्या रागावण्यालाही सामोरे जावे लागेल.                                                             - मच्छिंद्र ऐनापुरे
Game sites
Freeonlinegames.com
Ibibo.com
Zapak.com
Onlinegames.net
Miniclip.com
Bigfishgames.com/ online-games/index.htm
Onlineealgames.com
Car Games
Gamesfreak.net
Carracinggamess.com

No comments:

Post a Comment